ETV Bharat / state

जळगावात कोण राखणार गड? उत्सुकता शिगेला... - जळगाव विधानसभा निवडणूक 2019

गेल्या 21 ऑक्टोबरला जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. यावेळी राज्यात 60.46 टक्के मतदान झाले. पावसामुळे अनेक ठिकाणी मतदानावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. 2014 च्या निवडणुकीत 63 टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. तर यावेळी 58 % मतदान झाले आहे. आता मतदार राजाने आपले मत कोणाच्या पदरात टाकले आहे, ते पुन्हा कुणाला संधी देतात हे गुरूवारी 24 ऑक्टोबरलाच कळणार आहे.

विधानसभा रणकंदन : जळगाव जिल्हा कुणाच्या पदरात?
author img

By

Published : Oct 23, 2019, 9:29 AM IST

Updated : Oct 23, 2019, 12:27 PM IST

जळगाव - गेल्या 21 ऑक्टोबरला जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. यावेळी राज्यात 60.46 टक्के मतदान झाले. पावसामुळे अनेक ठिकाणी मतदानावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. 2014 च्या निवडणुकीत 63 टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. तर यावेळी 58 टक्के मतदान झाले आहे.

2014 ची आकडेवारी -

भाजप - 6
शिवसेना - 3
राष्ट्रवादी - 1
इतर - 1
एकूण - 11

2014 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघांपैकी 6 जागांवर भाजपने विजय मिळवला होता. तर 3 जागांसह शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती. मात्र, 2014 नंतर आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे भाजपने जिल्ह्यातील वाट्याला येणाऱ्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार केल्याने चुरस निर्माण झाली. जळगाव जिल्ह्यामध्ये 11 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील प्रत्येक मतदारसंघातील 2014 आणि 2019 ची विधानसभा निवडणूक, त्यातील बदल, निवडणुकीतील परिस्थितीचा आढावा.

हेही वाचा - सजविलेल्या बैलगाडीतून येत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटलांनी केले मतदान

चोपडा - या मतदारसंघात २०१४ ला 67.34 टक्के मतदान झाले होते. यंदा ही आकडेवारी 61.29 टक्के असून टक्का घसरला आहे. मागील वेळी इथून शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत सोनवणे यांनी राष्ट्रवादीच्या माधुरी पाटील यांचा 11 हजार 935 मतांनी पराभव केला होता. यावेळेस याठिकाणी शिवसेनेचे विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी लता सोनवणे या शिवसेनेकडून रिंगणात आहेत. त्यांच्याविरूद्ध राष्ट्रवादीचे जगदीश वळवी हे मैदानात आहेत.

रावेर - या मतदारसंघात 2014 ला 66.82 टक्के मतदान झाले होते. यंदा ही आकडेवारी 65.82 टक्के असून टक्का घसरला आहे. मागील वेळी येथून भाजपचे उमेदवार हरीभाऊ जावळे यांनी 10 हजार मतांनी काँग्रेसचे उमेदवार शिरीष चौधरी यांचा पराभव केला होता. यावेळेस याठिकाणी भाजपकडून पुन्हा विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे यांना संधी मिळाली आहे. तर विरोधात पुन्हा काँग्रेसचे शिरीष चौधरी हेच रिंगणात आहेत.

भुसावळ - या मतदारसंघात 2014 ला 56.82 टक्के मतदान झाले होते. यंदा ही आकडेवारी 52.39 टक्के असून टक्का घसरला आहे. मागील वेळी इथून भाजपचे संजय सावकारे यांनी राष्ट्रवादीचे राजेश झालटे यांचा 34 हजार 637 मतांनी पराभव केला होता. यावेळेस याठिकाणी भाजपकडून विद्यमान आमदार संजय सावकारे निवडणूक लढले. त्यांच्याविरोधात पीआरपी या पक्षाचे जगन सोनवणे हे रिंगणात आहेत.

हेही वाचा - दिवस मतसंग्रामाचा : माजी मंत्री खडसेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

जळगाव शहर - या मतदार संघात 2014 ला 55.87 टक्के इतके मतदान झाले होते. यंदा ही आकडेवारी 49.14 टक्के इतकी असून टक्का घसरला आहे. मागील वेळी इथून भाजपचे सुरेश भोळे यांनी शिवसेनेचे उमेदवार आणि माजी मंत्री सुरेश जैन यांचा पराभव केला होता. यावेळेस याठिकाणी भाजपकडून विद्यमान आमदार सुरेश भोळे यांना पुन्हा संधी मिळाली. तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील हे रिंगणात होते.

Jalgaon District Assembly Elections 2019
विधानसभा रणकंदन : जळगाव जिल्हा कुणाच्या पदरात?

जळगाव ग्रामीण - या मतदार संघात 2014 ला 66.14 टक्के इतके मतदान झाले होते. यंदा ही आकडेवारी 60.45 टक्के इतकी आहे. मागील वेळी इथून शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांचा पराभव केला होता. यावेळेस याठिकाणी विद्यमान आमदार आणि सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना शिवसेनेने पुन्हा संधी दिली. तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या पुष्पा ज्ञानेश्वर महाजन या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

अमळनेर - या मतदारसंघात गेल्या वेळेस 64.06 टक्के इतके मतदान झाले होते. यंदा ही आकडेवारी 53.50 टक्के इतकी आहे. मागील वेळी इथून अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांनी भाजपचे अनिल पाटील पराभव केला होता. यावेळेस याठिकाणी विद्यमान आमदार शिरीष चौधरी हे यावेळी भाजपकडून रिंगणात आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणूकीत ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले होते. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे अनिल भाईदास पाटील हे रिंगणात आहेत.

एरंडोल - या मतदारसंघात गेल्या वेळेस 66.18 टक्के इतके मतदान झाले होते. यंदा ही आकडेवारी 59.31 टक्के इतकी असून टक्का घसरला आहे. मागील वेळी इथून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. सतिश पाटील यांनी शिवसेनेचे चिमणराव पाटील यांचा पराभव केला होता. तर यावेळेस देखील शिवसेनेचे चिमणराव पाटील आणि विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे डॉ. सतिश पाटील या दोघांविरोधात प्रमुख लढत आहे.

चाळीसगाव - या मतदारसंघात गेल्या वेळेस 64.95 टक्के इतके मतदान झाले होते. यंदा ही आकडेवारी 58.20 इतकी आहे. मागील वेळी इथून भाजपचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी राष्ट्रवादीचे राजीव देशमुख यांचा पराभव केला होता. तर यावेळेस भाजपकडून मंगेश चव्हाण यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे राजीव देशमुख हे निवडणूक लढवत आहेत.
गेल्या वेळेस निवडून आलेले उन्मेश पाटील हे गेल्या लोकसभेत निवडून आले आहेत. त्यांच्या जागी यावेळी मंगेश चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे.

पाचोरा - या मतदारसंघात गेल्या 65.91 टक्के इतके मतदान झाले होते. यावेळेस ही आकडेवारी 57.80 इतकी आहे. मागील वेळी इथून शिवसेनेचे उमेदवार किशोर पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिलीप वाघ यांचा पराभव केला होता. तर यावेळी देखील विद्यमान आमदार आणि शिवसेनेचे उमेदवार किशोर पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे दिलीप वाघ हे रिंगणात आहेत. मात्र, हा भाजप-शिवसेनेची युती झाल्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला गेला. त्यामुळे येथील भाजपचे उत्सुक अमोल शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. ते अपक्ष म्हणून यावेळी रिंगणात आहेत.

जामनेर - या मतदारसंघात गेल्या वेळेस 69.96 टक्के इतके मतदान झाले होते. यंदा ही आकडेवारी 60.04 टक्के इतकी आहे. मागील वेळी इथून विद्यमान जलसंपदामंत्री आणि भाजप उमेदवार गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिगंबर पाटील यांचा पराभव केला होता. यावेळेस जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात राष्ट्रवादीने संजय गरूड यांना रिंगणात उतरवले आहे.

तसेच यावेळी याच मतदार संघातील हिवरी दिगर गावातील ग्रामस्थांनी गेल्या 5 वर्षातील स्थानिक समस्या न सुटल्यामुळे मतदानावर बहिष्कार टाकला आहे. जलसंपदामंत्र्यांच्याच मतदारसंघातील लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मुक्ताईनगर - या मतदारसंघात गेल्या वेळेस 68.83 टक्के इतके मतदान झाले होते. यंदा ही आकडेवारी 60.04 टक्के इतकी होती. मागील वेळी इथून माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी शिवसेनेचे चंद्रकांत पाटील यांचा 9 हजार 708 मतांनी पराभव केला होता. यावेळेस मात्र, एकनाथ खडसे यांच्या कन्या डॉ. रोहिणी खडसे-खेवलकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.

भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केल्यावर एकनाथ खडसे यांचे नाव पहिल्याच यादीत येणे अपेक्षित होते. मात्र, एकही यादीत त्यांचे नाव आल्यावर अखेरच्या यादीत त्यांच्या मुलीचे नाव आले. त्यांच्या जागी त्यांच्या कन्या रोहिणी यांना उमेदवारी देण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात हा मतदारसंघ पुन्हा प्रकाशझोतात आला. तर दुसरीकडे भाजप-शिवसेनेची युती झाल्यावर हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरी केली आहे. ते यावेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे राज्यातील काही लक्षवेधी लढतींपैकी एक अशी ही लढत मानली जात आहे.

एकंदरीत रित्या जर पाहिले तर 2014 च्या तुलनेत यावेळी मतदानाचा टक्का घसरला आहे. तसेच प्रचारामध्ये सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांनी आपल्या 5 वर्षांचा हिशोब मांडला तर तेच दुसरीकडे विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात आश्वासनांची पूर्तता केली नाही, म्हणून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. केळी, कापूस, सिचंन, रस्ते वीज या मुद्यांवर सर्वच राजकीय पक्षांनी जोर दिला.

आता मतदार राजाने आपले मत कोणाच्या पदरात टाकले आहे, ते पुन्हा कुणाला संधी देतात हे गुरूवारी 24 ऑक्टोबरलाच कळणार आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Oct 23, 2019, 12:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.