ETV Bharat / state

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची मुजोरी; परवानगी असतानाही शेतमाल विकणाऱ्या शेतकऱ्याचे ट्रॅक्टर पकडले

अनिल खडसे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी कृषी विभागाने दिलेला अधिकृत परवानादेखील दाखवला. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची मुजोरी; परवानगी असतानाही शेतमाल विकणाऱ्या शेतकऱ्याचे ट्रॅक्टर पकडले
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची मुजोरी; परवानगी असतानाही शेतमाल विकणाऱ्या शेतकऱ्याचे ट्रॅक्टर पकडले
author img

By

Published : May 4, 2020, 10:21 PM IST

जळगाव - महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या मुजोरीचा अजून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये शेतमाल विक्रीसाठी कृषी विभागाने फळे व भाजीपाला विक्रीचा अधिकृत परवाना दिलेला असताना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने एका शेतकऱ्याचा शेतमाल जप्त केला. परवाना असताना त्याचे दोन ट्रॅक्टर जप्त करून महापालिकेच्या आवारात आणले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने ट्रॅक्टरभर टरबूज थेट त्याच ठिकाणी फेकून देत आपला निषेध नोंदवला.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची मुजोरी; परवानगी असतानाही शेतमाल विकणाऱ्या शेतकऱ्याचे ट्रॅक्टर पकडले

लॉकडाऊन असल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाची नासाडी होण्याची भीती आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गावे तसेच शहरांमध्ये शेतमाल विक्रीसाठी परवाने दिले आहेत. असाच परवाना असलेले जळगाव तालुक्यातील उमाळा येथील शेतकरी अनिल खडसे हे आपल्या शेतातील कलिंगड ट्रॅक्टरमध्ये भरून जळगावात विक्रीसाठी आलेले होते. शहरात ते कलिंगड विकत होते. मात्र, महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथकाने त्यांच्याशी हुज्जत घातली. अशा रितीने कलिंगड विक्री करता येणार नाही, असे सांगत त्यांचे दोन ट्रॅक्टर जप्त करून ते थेट महापालिकेत आणले. अनिल खडसे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी कृषी विभागाने दिलेला अधिकृत परवानादेखील दाखवला. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही.

अनिल खडसे यांनी आपल्या शेतात टरबूज लावले आहेत. सध्या चांगला माल निघत आहे. पण लॉकडाऊनमुळे तो बाजारात नेता येत नसल्याने हा माल ते स्वतः शहरात विकत आहेत. कृषी विभागाने त्यासाठी पास दिलेले आहेत. मात्र, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांना नाहक त्रास देत आहेत, असा आरोप यावेळी खडसेंनी केला. शेतातील माल वेळीच काढला नाही तर मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. त्यामुळे जेवढा माल विक्री होईल, तेवढा विकण्यावर आपला भर आहे. जेणेकरून उत्पादन खर्च तरी निघेल, अशी उद्विग्न प्रतिक्रिया अनिल खडसेंनी दिली.

अतिक्रमण अधीक्षकाविषयी सातत्याने तक्रारी-

अतिक्रमण विभागाचे अधीक्षक एच. एम. खान यांच्याविषयी शेतकऱ्यांच्या सातत्याने तक्रारी येत आहेत. ते शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना नाहक त्रास देत असल्याचा आरोप होत आहे. त्यांची मनमानी सुरूच असून ते शेतकऱ्यांशी अरेरावी करतात. आम्ही काय दरोडेखोर आहोत का? असा सवाल देखील खडसेंनी उपस्थित केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.