ETV Bharat / state

Ladies Toilets In Jalgaon : जळगाव शहर जिल्ह्याचे ठिकाण, मात्र महिलांसाठी अवघे दोनच सार्वजनिक शौचालय..

author img

By

Published : Feb 12, 2022, 7:25 PM IST

जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण असलेल्या जळगाव शहरामध्ये महिलांसाठी अवघे दोनच सार्वजनिक शौचालयं ( Ladies Toilets In Jalgaon ) आहेत. त्यामुळे शहरात वावरताना महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या आरोग्याशी एकप्रकारे खेळच सुरु असल्याचे यावरून दिसत आहे.

जळगाव शहर जिल्ह्याचे ठिकाण, मात्र महिलांसाठी अवघे दोन सार्वजनिक शौचालय..

जळगाव : आज राज्यात सर्वत्र राष्ट्रीय महिला आरोग्य दिवस ( National Women's Health Day ) साजरा होत असताना दुसरीकडे मात्र जळगावात महिलांच्या आरोग्याबाबत प्रशासन उदासीन असल्याचे चित्र आहे. जिल्ह्याचे ठिकाण असताना जळगाव शहरात केवळ दोनच सार्वजनिक शौचालय प्रशासनास महिलांच्या आरोग्याशी खेळ खेळत असल्याचे चित्र दिसून आले ( Ladies Toilets In Jalgaon ) आहे.

आरोग्यविषयक समस्या

जळगाव शहर जिल्ह्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी विविध तालुक्यांतून गावांमधून महिला खरेदीसाठी तसेच विविध कामांसाठी येत असतात. तर दुसरीकडे शहरात मध्यवर्ती भागात चौदा वेगवेगळे मार्केट आहेत. मात्र केवळ दोनच शौचालयांची कागदोपत्री नोंद आहे. तीही प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. यामुळे मार्केटमध्ये येणार्‍या महिलांना प्रसाधनगृहासह इतर बाबींना सामोरे जाताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे लघवी रोखून धरण्यासह इतर बाबींमुळे महिलांच्या विविध आरोग्य विषयक समस्यांना सामोरे जावे लागतय. अनेक वर्षांपासून मार्केटमध्ये दुकाने लावतोय. मात्र याठिकाणी शौचालय अस्तित्वात नाहीत. जी आहेत ती हे स्वच्छ तसेच बंद आहेत. त्यामुळे प्रसाधनाची अडचण आल्यास असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागते. ज्या पध्दतीने मोठमोठे मार्केट बांधले त्या पध्दतीने या ठिकाणी महिलांसाठी प्रसाधनगृहे तसेच शौचालये उभारावेत अशी मागणी आहे. केवळ जळगावातच नव्हे तर राज्यात संपूर्ण महिलांच्या शौचालयांबाबत गंभीर वास्तव आहे. प्रसाधनगृहे तसेच शौचालयांच्या अडचणींमुळे महिला पाणी कमी पितात तर, काही वेळा लघवी रोखून धरतात. त्यामुळे मूत्रविसर्जन मार्गात क्षार जमवून अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवु शकतात.

प्रशासनाला जाग नाही

जळगावात महिलांसाठी प्रसाधनगृह तसेच शौचालय उभारावेत यासाठी संस्थेच्या माध्यमातून अनेक आंदोलन कधी माहिती अधिकारात माहिती घेतली. मात्र गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला जाग आलेली नाही. केवळ कागदोपत्रीच शौचालय अस्तित्वात आहेत. प्रमुख पदावर महिला असल्याने आता तरी जळगावात शौचालय होतील अशी अपेक्षा आहे. राज्यात महिलांविषयक अनेक बाबींसाठी प्रशासन गंभीर आहे. त्याचप्रमाणे महिलांसाठी शौचालय व प्रसाधनगृहांकडे लोकप्रतिनिधींसह अधिकार्‍यांचे लक्ष देणे गरजेचे आहे. महिलांच्या आरोग्याकडे लक्ष दिले गेले तरच महिला निरोगी राहील्या तरच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय महिला आरोग्य दिवस साजरा होईल यात शंका नाही, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.