ETV Bharat / state

जळगावात भाजप नेते गिरीश महाजनांना धक्का; महापौर निवडीपूर्वीच भाजपचे 30 नगरसेवक 'नॉट रिचेबल' - भाजपचे ३० नगरसेवक शिवसेनेच्या गळाला

सत्ताधारी भाजपची राजकीय कोंडी करण्यासाठी शिवसेनेने ही खेळी केली असून, त्या मागे पालकमंत्री गुलाबराव पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि संपर्क नेते संजय सावंत हे प्रमुख सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेने राज्यातील सत्तेचा उपयोग महापालिका ताब्यात घेण्यासाठी केल्याचे दिसून येत असून, या माध्यमातूनच भाजपच्या नगरसेवकांना गळाला लावल्याची सूत्रांची माहिती आहे.

Jalgaon
महापालिकेची महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक
author img

By

Published : Mar 15, 2021, 7:04 AM IST

Updated : Mar 15, 2021, 12:28 PM IST

जळगाव - महापालिकेची महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक जाहीर झाली असून, या निवडणुकीपूर्वीच राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. रविवारी दुपारनंतर महापालिकेच्या राजकीय वर्तुळात जोरदार आणि धक्कादायक घडामोडी घडल्या. महापौर व उपमहापौर पदाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी बैठक घेण्यापूर्वीच सत्ताधारी भाजपचे तब्बल 30 नगरसेवक 'नॉट रिचेबल' झाले आहेत. हे सर्व नगरसेवक शिवसेनेच्या गोटात जाऊन सामील झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. भाजपचे संकटमोचक माजीमंत्री गिरीश महाजन यांना हा जबर धक्का मानला जात आहे.

शिवसेनेने काढला व्हीप-

महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेने जोरदार व्यूहरचना आखली असून, महापौरपदासाठी नगरसेविका तथा विद्यमान विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या पत्नी जयश्री महाजन यांचे नाव निश्चित केले आहे. तसा व्हीप देखील गटनेते अनंत जोशी यांनी काढला. दुसरीकडे, उपमहापौर पदासाठी शिवसेनेकडून भाजपचे नगरसेवक कुलभूषण पाटील यांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. सत्ताधारी भाजपची राजकीय कोंडी करण्यासाठी शिवसेनेने ही खेळी केली असून, त्या मागे पालकमंत्री गुलाबराव पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि संपर्क नेते संजय सावंत हे प्रमुख सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेने राज्यातील सत्तेचा उपयोग महापालिका ताब्यात घेण्यासाठी केल्याचे दिसून येत असून, या माध्यमातूनच भाजपच्या नगरसेवकांना गळाला लावल्याची सूत्रांची माहिती आहे.

4 दिवस शिल्लक असतानाच घडल्या घडामोडी-

जळगाव महापालिकेत 57 नगरसेवकांसह भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. सुरुवातीच्या अडीच वर्षांचा महापौर व उपमहापौर पदाचा कार्यकाळ 17 मार्च रोजी संपणार आहे. त्यानंतर 18 मार्च रोजी नवीन महापौर व उपमहापौर निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महापौर व उपमहापौर पदासाठी सत्ताधारी भाजपमध्ये सुरुवातीपासून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. रविवारी दुपारनंतर मात्र, धक्कादायक घडामोडी घडल्या. माजीमंत्री गिरीश महाजन हे रविवारी सायंकाळी महापौर पदाच्या नावाबाबत भाजप नगरसेवकांची बैठक घेणार होते. परंतु, त्यापूर्वीच भाजपतील तब्बल 30 नगरसेवक हे अचानक 'नॉट रिचेबल' झाले. त्यामुळे महापालिकेत मोठा राजकीय भूकंप घडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकीला अवघे 4 दिवस शिल्लक असताना या घडामोडी घडल्या. त्यामुळे भाजपच्या गोटात सन्नाटा असून, गिरीश महाजन यांच्या गटाची चिंता वाढली आहे.

महापालिकेची महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक
महापालिकेची महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक

पालकमंत्र्यांच्या फार्महाऊसवर झाली 'सांगली पॅटर्न'ची आखणी-

सांगली महापालिकेत भाजपचे बहुमत असताना त्याठिकाणी राष्ट्रवादीने भाजपचे काही नगरसेवक गळाला लावून महापौर पदावर आपला उमेदवार विराजमान केला. याच धर्तीवर जळगाव महापालिकेत देखील सत्तांतर घडवून आणण्याची खेळी शिवसेनेने केली आहे. महापौर पदाच्या निवडीला 4 दिवसांचा वेळ शिल्लक असतानाच शिवसेनेने भाजपचे 30 नगरसेवक गळाला लावल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेच्या बाजूने झुकलेले हे सर्व भाजपचे नगरसेवक रविवारी दुपारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी येथील फार्महाऊसवर जमले होते. त्या ठिकाणी राजकीय चर्चा झाली. नंतर हे नगरसेवक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह मुंबईला रवाना झाल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपच्या नगरसेवकांचा एक मोठा गट शिवसेनेच्या बाजूने झुकल्याने माजी मंत्री गिरीश महाजन यांना सायंकाळी नियोजित बैठक रद्द करावी लागल्याचीही जोरदार चर्चा आहे.

शिवसेनेकडून जयश्री महाजन यांचे नाव जाहीर-

महापौरपदासाठी शिवसेनेने नगरसेविका जयश्री जयश्री महाजन यांचे नाव जाहीर केले आहे. गटनेते अनंत जोशी यांनी त्यांच्या नावाचा व्हीप देखील रविवारी जारी केला. उपमहापौर पदासाठी शिवसेनेकडून भाजपचे नगरसेवक कुलभूषण पाटील यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. या संदर्भात शिवसेना नगरसेवकांची लढ्ढा फार्म हाऊस या ठिकाणी बैठक झाली. या बैठकीला महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर नितीन लढ्ढा, गटनेते अनंत जोशी, नगरसेवक प्रशांत नाईक, इब्राहिम पटेल आदींची उपस्थिती होती. शिवसेनेने जारी केलेल्या व्हीपचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात उपमहापौरपदाच्या नावापुढे 'कुल' असा उल्लेख करण्यात आला आहे. हा एका अर्थाने कुलभूषण पाटील यांच्या नावाकडे अंगुलीनिर्देश आहे.

भाजपत गेलेल्या अनेकांची घरवापसी?

ऑगस्ट 2018 मध्ये महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेची साथ सोडून भाजपमध्ये गेलेले अनेक नगरसेवक आता पुन्हा महापौर पदाच्या निवडणुकीचे औचित्य साधून शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. हेच भाजपवासी नगरसेवक आता शिवसेनेत घरवापसी करतील, असे सांगितले जात आहे. कुलभूषण पाटील यांच्या नावाची उपमहापौर पदासाठी चर्चा आहे. जर ही चर्चा खरी ठरली तर कुलभूषण पाटील यांची पुन्हा एकदा शिवसेनेत घरवापसी होणार असून, ते उपमहापौरपदी विराजमान होतील. शिवसेनेच्या सोबतच तत्कालीन राष्ट्रवादीच्याही काही नगरसेवकांचा त्यात समावेश असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा - मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

हेही वाचा - एनआयएने केलेली अटक फक्त संशयाच्या आधारावर, सचिन वाझे यांच्या वकिलांचा दावा

Last Updated : Mar 15, 2021, 12:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.