ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात क्षय, कुष्ठरुग्ण शोध अभियान; 33 लाख लोकसंख्येचे होणार सर्वेक्षण - National Leprosy Eradication Program

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध अभियान 1 ते 16 डिसेंबर, 2020 या कालावधीत राबवण्यात येत आहे. कुष्ठरोग व क्षयरोग कार्यक्रम हा शासन, जिल्हा परिषद, महानगर पालिका व स्वयंसेवी संस्था यांच्या समन्वयाने राबविण्यात येत आहे.

Leprosy Patient Search Campaign Jalgaon
क्षय व कुष्ठरोग रुग्ण शोध मोहीम
author img

By

Published : Dec 3, 2020, 3:23 PM IST

जळगाव - राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध अभियान 1 ते 16 डिसेंबर, 2020 या कालावधीत राबवण्यात येत आहे. कुष्ठरोग व क्षयरोग कार्यक्रम हा शासन, जिल्हा परिषद, महानगर पालिका व स्वयंसेवी संस्था यांच्या समन्वयाने राबविण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातील 15 तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागाचे सर्वेक्षण या अभियानात करण्यात येत आहे.

समाजात लपून राहिलेले कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधून त्यांना बरे करून समाजातील संसर्गाची साखळी खंडीत करणे, क्षयरोग व कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने प्रयत्न करणे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेत एक पुरुष व एक स्त्री, असे एक पथक असून ग्रामीण भागात प्रत्येक दिवशी 20 घरे व शहरी भागात 25 घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील एकूण 43 लाख 69 हजार 966 लोकसंख्येपैकी 33 लाख 37 हजार 292 लोकसंख्येच्या सर्वेक्षणाकरीता एकूण 2 हजार 972 पथके व 630 पर्यवेक्षकांची निवड करण्यात आली आहे.

आदिवासी भागात 100 टक्के तपासणी

तपासणीसाठी येणाऱ्या पथकांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. क्षयरोग व कुष्ठरोग शोध अभियान 2020-21 मध्ये जास्तीत जास्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणून समाजातील योग्य संसर्गजन्य कुष्ठरुग्णांचे व क्षयरुग्णांचे प्रमाण कमी होण्यासाठी मोहिमेमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या पथकाकडून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन. पाटील यांनी केले.

आदिवासी भागातील वाडे, वस्त्या, डोंगरभाग, विट भट्ट्या, ऊसतोड मजूर या भागात कुष्ठरोगाविषयी स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी यांची मदत घेवून प्रभावी जनजागृती व या भागातील जनतेची 100 टक्के तपासणी करण्यात येणार आहे. असे आरोग्य सेवेचे (कुष्ठरोग) सहाय्यक संचालक डॉ. इरफान तडवी व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जयवंत मोरे यांनी कळवले.

शासकीय व निमशासकीय दवाखान्यांमध्ये उपचार मोफत

सर्व शासकीय व निमशासकीय दवाखान्यांमध्ये कुष्ठरोग व क्षयरोग उपचार मोफत दिला जातो. तरी शरिरावरील बधीर चट्टे व लालसर चकाकणारी त्वचा व जाड कानाच्या पाळ्या, हातपायावरील सुन्नपणा, बधिरता व शारीरिक विकृती यांची तपासणी करावी, असे आवाहन जळगाव जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी बी.टी. जमादार व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांनी केले.

हेही वाचा - एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादीच्या पहिल्याच बैठकीत कार्यकर्त्यांचे नाराजीनाट्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.