जळगाव : हा आहे जळगाव मधील दादावाडी श्रीराम नगर भागात राहणारा नऊ वर्षीय ईशान विजय आंबेकर. ईशान हा चौथ्या वर्गाचा विद्यार्थी शिकत आहे. शालेय शिक्षणासोबत ईशान्य आपले अनोखे कौशल्य अवगत करून आपल्या कुटुंबाचेच नव्हे तर अनेकांचे लक्ष वेधले आहे. ईशान आपल्या दोन्ही डोळ्यांवर पट्टी बांधून कोणतेही काम अगदी सहज गतीने करू शकतो. त्यामुळे ईशानच्या या अनोख्या कलेची सर्वत्र चर्चा आहे.
पट्टी बांधून हाताळतो मोबाईल : चित्रकला असो, बुद्धिबळ, विविध खेळ असो, अथवा अभ्यास असो ईशान ही सर्व कामे डोळ्यावर पट्टी बांधून करतो. एवढेच नाही तर मोबाईल सुद्धा ईशान डोळ्यावर पट्टी बांधून हाताळतो. लहानपणापासून विविध कला शिकण्याची आवड ईशानला होती. त्यातूनच ही कला आपल्या वडिलांच्या मित्राच्या माध्यमातून अवगत करत अंगीकारली आहे. ईशानला लहानपणापासूनच सात्विक आहाराची आवड आहे. त्यामुळे सात्विक विचारांची जोड कायम ठेवत अगदी या वयातच देवपूजेपासून तर आपले कौशल्य जपण्यापर्यंत ईशान अगदी सहज हे शक्य करतो. त्यामुळे ईशानच्या पालकांनाही त्याचा अभिमान आहे.
कला जपण्यासाठी प्रयत्न : ईशानचे हे अनोखी कौशल्य नक्की सर्वांसाठी आश्चर्यकारक आहे. मात्र आपल्या शालेय अभ्यासासह ही कला जपण्यासाठी ईशान प्रयत्न करतो. यातही त्याला अधिक पुढे जायचे असून शाळेतही ईशान्य आपले हे कौशल्य सादर करत अनेकांची मने जिंकली आहेत. खरंतर शालेय जीवनात शिक्षणासोबत मुलांना विविध खेळ व कला शिकण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन दिल्यास बालवयातच हे संस्कार अंगीकारले जातात व त्यातूनच अनोखी कौशल्य हे जगासमोर येते. त्याचाच प्रत्यय ईशानच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. तर ईशानला अनोखे कौशल्य हे वडील्याचे मित्र योगेश याच्याकडून मिळीले आहे. त्या डोळे बंद करून काम करताना आंनद होतो असे ईशाने सांगितले. ईशान हा डोळे बंद करून चित्र काढतो, पेपर वाचतो, कपडे ओळखतो, देव पूजा करतो, नोटा ओळखतो. त्याच्या पालकांना ईशानचा आभिमान आहे.