ETV Bharat / state

Jalgaon Court on Raj Thackeray Case : जळगावच्या खटल्यात राज ठाकरेंसह तिघांची निर्दोष मुक्तता - राज ठाकरेंची निर्दोश मुक्तता जळगाव न्यायालय

उत्तर भारतीयांना केलेल्या मारहाण प्रकरणी २००८मध्ये रत्नागिरीतील खेडमध्ये राज ठाकरेंना ( Raj Thackeray Arrested Ratnagiri Khed २००८ ) अटक करण्यात आली होती. या अटकेच्या निषेधार्थ जळगावात मनसे पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढून बंद पुकारला होता. ( Jalogaon MNS March ) याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

jalgaon district session court
जळगाव जिल्हा सत्र न्यायालय
author img

By

Published : Feb 11, 2022, 8:25 PM IST

जळगाव - उत्तर भारतीयांना केलेल्या मारहाण प्रकरणी २००८ मध्ये रत्नागिरीतील खेडमध्ये राज ठाकरेंना ( Raj Thackeray Arrested Ratnagiri Khed २००८ ) अटक करण्यात आली होती. या अटकेच्या निषेधार्थ जळगावात मनसे पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढून बंद पुकारला होता. ( Jalogaon MNS March ) याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात आज राज ठाकरे यांच्यासह मनसेचे तत्कालीन प्रदेश सरचिटणीस अॅड. जयप्रकाश बाविस्कर, जिल्हाध्यक्ष अॅड. जमील देशपांडे, रज्जाक सय्यज, प्रेमानंद जाधव यांची आज निर्दोष मुक्तता करण्यात आली. जळगाव न्यायालयाने हा निर्णय दिला.

याबाबतच्या प्रतिक्रिया

जळगावातही 'त्या' घटनेचे पडसाद -

मुंबई येथे रेल्वेत मराठी मुलांची भरती करण्यात यावी, यासाठी मनसेतर्फे केलेल्या आंदोलनानंतर राज ठाकरेंना अटक करण्यात आली होती. या अटकेचे पडसाद 21 ऑक्टोबर 2008 रोजी संपूर्ण राज्यासह जळगावतही उमटले होते. याप्रकरणी राज ठाकरेंसह पाच जणांविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यात वॉरंट बजावल्यानंतर न्यायालयाने राज ठाकरेंना 15 हजारांचा जामीन मंजूर केला होता. तसेच या खटल्याच्या कामात कायमची गैरहजर राहण्याची परवानगीही दिली होती. दरम्यान, सुनवाईअंती आज जळगाव न्यायालयाने सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या खटल्यात मनसेच्या वतीने अॅड. संदीप पाटील यांनी कामकाज बघितले.

हेही वाचा - Kirit Somaiya Live : संजय राऊत सांगा कोणकोणत्या हॉटेलमध्ये मुलीच्या लग्नाचे कार्यक्रम घेतले? : किरीट सोमय्यांनी खळबळजनक पत्रकार परिषद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.