ETV Bharat / state

कोरोनाच्या संकटात कापूस निर्यातदारांना दिलासा; भारतातून बांगलादेशात ३० लाख गाठींची होणार निर्यात

author img

By

Published : Nov 23, 2020, 5:30 PM IST

Updated : Nov 23, 2020, 5:45 PM IST

कापसाची मागणी पूर्ण करण्यासाठी बांगलादेश भारतावर अवलंबून असतो. यावर्षी कोरोनामुळे भारतीय कापसाची चीनमध्ये कमी प्रमाणात निर्यात होईल. त्यामुळे उर्वरित कापसाची सर्वाधिक निर्यात ही बांगलादेशात होण्याची शक्यता असल्याचा जाणकारांचा अंदाज आहे.

जिनिंग मिल
जिनिंग मिल

जळगाव - कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात अनिश्चितता असतानाही भारतीय कापूस निर्यातदारांना दिलासा मिळणार आहे. यावर्षी भारतीय कापसाची बांगलादेश सर्वाधिक खरेदी करणार आहे. भारतीय कापसाचा उत्तम दर्जा आणि परवडणारा वाहतूक खर्च या दोन प्रमुख कारणांमुळे बांगलादेश भारतीय कापसाला पसंती देतो. भारतातून यावर्षी बांगलादेशात सुमारे ३० लाख गाठींची निर्यात होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही वर्षांत चीनने बांगलादेशातील वस्त्रोद्योगात गुंतवणूक वाढवल्याने भारतीय कापसाला भविष्यातही बांगलादेशातून मागणी असणार आहे. जगातील प्रमुख कापूस आयातदार देश म्हणून चीनची आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात मक्तेदारी आहे. चीननंतर बांगलादेशातील कापड उद्योग मोठा आहे. जगात उत्पादित होणाऱ्या कापडात ५२ टक्के कापड हे पॉलिस्टरचे असते. पॉलिस्टर व इतर कापडाचे उत्पादनही बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यामुळे बांगलादेशाकडून कापसाला मोठी मागणी असते. कापसाची मागणी पूर्ण करण्यासाठी बांगलादेश भारतावर अवलंबून असतो. यावर्षी कोरोनामुळे भारतीय कापसाची चीनमध्ये कमी प्रमाणात निर्यात होईल. त्यामुळे उर्वरित कापसाची सर्वाधिक निर्यात ही बांगलादेशात होण्याची शक्यता असल्याचा जाणकारांचा अंदाज आहे.

भारतातून बांगलादेशात ३० लाख गाठींची होणार निर्यात

बांगलादेशकडून होते कापसाच्या १ कोटी गाठींची आयात-

आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस निर्यातीबाबत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना खान्देश जिनिंग व प्रेसिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन म्हणाले की, बांगलादेश वस्त्रोद्योगात आघाडीवर आहे. परंतु, बांगलादेशात कापसाची कुठलीही लागवड होत नाही. बांगलादेशाला दरवर्षी १ कोटी गाठींची आयात करावी लागते. तर यासोबत सुताचीदेखील बांगलादेश आयात करतो. बांगलादेशात सूतगिरण्यांची संख्या गेल्या सात ते आठ वर्षांत झपाट्याने वाढली आहे. तेथे ढाका वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध आहे. ढाकानजीक नारायणगंज भागात सूतगिरण्यांची मोठी संख्या आहे. बांगलादेशातील वस्त्रोद्योग तेथील नागरिकांसाठी रोजगाराचे मोठे साधनही बनला आहे. तेथे सुमारे सव्वा कोटी नागरिक वस्त्रोद्योग व त्याच्याशी संबंधित रोजगारावर अवलंबून आहेत. वस्त्रोद्योगाचे चक्र सुरळीत ठेवण्यासाठी बांगलादेश दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कापसाची आयात करत असतो.

वाहतूक खर्च कमी म्हणूनच भारताला पसंती-

भारतातून जेवढ्या गाठींची निर्यात गेल्या दोन वर्षात झाली आहे, त्यातील ४० ते ५० टक्के गाठींची आयात बांगलादेशने केली आहे. बांगलादेशला इतर देशांच्या तुलनेत भारतीय कापूस स्वस्त पडतो. भारतातून बांगलादेशात कापसाची पाठवणूक सुकर असते. रस्ते व रेल्वे मार्गे तेथे कापूस पाठवणूक केली जाते. बांगलादेशला अमेरिका, ब्राझील, आफ्रिकन देशांमधून कापसाची आयात करताना अधिक दिवस तर लागतात. तसेच वाहतूक खर्चही मोठ्या प्रमाणावर होतो. शिवाय अमेरिका, आफ्रिकन देशातील कापूस भारताच्या तुलनेत महाग पडतो. बांगलादेशजवळ चीन हा कापसाचा मोठा उत्पादक देश आहे. परंतु, चीनला आपल्या वस्त्रोद्योगासाठी कापसाची आयात करावी लागते. यामुळे चीनकडून बांगलादेशला कापूस मिळत नाही, असे प्रदीप जैन म्हणाले.

कापूस निर्यात सुरू-

चालू वर्षात खरीप हंगामातील कापूस खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू झाले आहेत. त्यामुळे भारतात जिनिंग व प्रेसिंग उद्योग कार्यान्वित झाला आहे. कापसाच्या गाठींची निर्यात सुरू झाली आहे. पुढील महिन्यात कापसावर होणाऱ्या प्रक्रियेचा वेग वाढून गाठींच्या निर्यातीला गती येईल, असेही प्रदीप जैन यांनी सांगितले.

दरम्यान, कोरोनाच्या संकटात देशाच्या निर्यातीला मोठा फटका बसला आहे.

Last Updated : Nov 23, 2020, 5:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.