ETV Bharat / state

दिलासादायक..! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रविवारी पहिल्यांदा जळगावात एकही मृत्यू नाही

author img

By

Published : Jun 20, 2021, 9:53 PM IST

जिल्ह्यासाठी रविवार (20 जून) हा दिवस खूपच आशादायी आणि दिलासादायक ठरला. कारण कोरोनाची दुसरी लाट उसळल्यानंतर रविवारी पहिल्यांदा कोरोनाने जिल्ह्यात एकही बळी गेला नाही. यापूर्वी 19 फेब्रुवारी 2021 रोजी कोरोना बळींची संख्या शून्य इतकी नोंदवली गेली होती. त्यानंतर तब्बल 4 महिन्यांनी हा दिवस उजाडला.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

जळगाव - जिल्ह्यासाठी रविवार (20 जून) हा दिवस खूपच आशादायी आणि दिलासादायक ठरला. कारण कोरोनाची दुसरी लाट उसळल्यानंतर रविवारी पहिल्यांदा कोरोनाने जिल्ह्यात एकही बळी गेला नाही. यापूर्वी 19 फेब्रुवारी 2021 रोजी कोरोना बळींची संख्या शून्य इतकी नोंदवली गेली होती. त्यानंतर तब्बल 4 महिन्यांनी हा दिवस उजाडला.

हेही वाचा - ... म्हणून गॅंग प्रमुखाच्या नादाला लागू नका'; गुलाबराव पाटलांचा मुनगंटीवारांना टोला

जिल्ह्यात साधारणपणे फेब्रुवारीच्या अखेरीस कोरोनाची दुसरी लाट उसळली होती. एप्रिल आणि मे महिन्यात तर कोरोनाने अक्षरशः कहर माजवला होता. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक तीव्र होती. या लाटेत वयोवृद्धांसह तरुणांच्या मृत्यूच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. या लाटेच्या काळात जिल्ह्यात एका दिवसाला 22 ते 24 रुग्णांचा मृत्यू होत होता. जसजशी लाट ओसरू लागली, तसतसे मृत्यूचे प्रमाणही कमी झाले होते. रविवारी दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. ही बाब जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासा देणारी ठरली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 568 मृत्यूची नोंद

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 2 हजार 568 रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. त्यात 50 किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील 1 हजार 361 जणांचे, तर 1 हजार 297 को-मोर्बिड रुग्णांचा समावेश आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा मृत्यूदर 1.81 टक्के इतका आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 572 रुग्णांचे मृत्यू हे एकट्या जळगाव शहरात, तर त्याखालोखाल 334 रुग्णांचे मृत्यू हे भुसावळ तालुक्यात नोंदवले गेले आहेत.

रविवारी 48 नवे बाधित

जळगाव जिल्ह्यात रविवारी 48 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर, 117 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 41 हजार 934 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, तर 1 लाख 38 हजार 1 रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. जिल्ह्यातील अ‌ॅक्टिव्ह रुग्णसंख्या सध्या 1 हजार 365 इतकी आहे.

हेही वाचा - वाटायला लागलं इथं लग्न आहे, की हे लगेच वाजा घेतात; गुलाबराव पाटलांचा रक्षा खडसेंवर हल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.