ETV Bharat / state

दोन सराईत गुन्हेगारांना पिस्तूल, चॉपरसह अटक; जळगाव वाहतूक पोलिसांची कारवाई

शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करून दोन सराईत गुन्हेगारांना पकडले आहे. या दोघांकडून एक पिस्तूल व चॉपर जप्त करण्यात आले आहे. रविवारी मध्यरात्री १२.४५ वाजता कालिका माता मंदिर ते रथचौका दरम्यान ही कारवाई करण्यात आली.

jalgaon crime
दोन सराईत गुन्हेगारांना पिस्तूल, चॉपरसह अटक; जळगाव वाहतूक पोलिसांची कारवाई
author img

By

Published : Sep 1, 2020, 5:26 PM IST

जळगाव - शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करून दोन सराईत गुन्हेगारांना पकडले आहे. या दोघांकडून एक पिस्तूल व चॉपर जप्त करण्यात आले आहे. रविवारी मध्यरात्री १२.४५ वाजता कालिका माता मंदिर ते रथचौका दरम्यान ही कारवाई करण्यात आली. आकाश उर्फ सोनू सुरेश सपकाळे (वय-२३), जगदीश भगवान सपकाळे (वय २४) अशी अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. हे दोघेही जळगावातील कोळी पेठेतील रहिवासी आहेत.

पोलिसांनी पकडलेल्या दोघांपैकी आकाश सपकाळे याच्याविरुद्ध यापूर्वी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देवीदास कुनगर हे पोलीस कर्मचारी योगेश पाटील व संदीप पाटील यांच्यासह रविवारी रात्री ९ वाजता भुसावळ येथे पेट्रोलिंगसाठी गेले होते. परतीच्या वेळी रात्री १२.४५ वाजता कालिका माता मंदिराजवळून आकाश व जगदीश हे एका महागड्या चारचाकीतून जात असताना पोलिसांना दिसले. पोलिसांचे वाहन पाहून त्याने चारचाकीची गती वाढवताच पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी आपले वाहन वळवून थेट आकाशचा पाठलाग सुरू केला.

हे पाहताच आकाशने कालिका माता मंदिराजवळून वळण घेत ओंकार हॉटेल, जुना खेडी रोड, गोपाळपुरामार्गे आंबेडकरनगरपासून रथचौक गाठला. त्याच्या मागे पोलिसांनी पाठलाग सुरूच ठेवला होता. रथचौकात एका मालवाहू रिक्षाला आकाशच्या चारचाकीने धडक दिली. यामुळे त्याला थांबावे लागले. याचवेळी पोलिसांनी आकाश, जगदीश यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली. यावेळी त्यांच्याकडे एक पिस्तूल व चॉपर सापडले.

त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. दोघांविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी दुपारी दोघांना न्यायालयात हजर केल्यानंतर २ सप्टेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.