ETV Bharat / state

देवेंद्र फडणवीसांनी माझे जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, एकनाथ खडसेंचा घणाघात

एकनाथ खडसे यांनी संपूर्ण पत्रकार परिषदेत त्यांची आजवरची भाजपतील वाटचाल, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून झालेला त्रास यासंदर्भात माहिती दिली. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच भाजप सोडल्याचे ते म्हणाले.

एकनाथ खडसे
एकनाथ खडसे
author img

By

Published : Oct 21, 2020, 4:29 PM IST

Updated : Oct 21, 2020, 5:14 PM IST

जळगाव - गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते तथा माजीमंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आहे. आज एकनाथ खडसे यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच भाजप सोडल्याचे ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी खालच्या स्तरावर राजकारण केल असून त्यांनी जीवन उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, असे एकनाथ खडसे म्हणाले. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

'मला काही मिळालं, नाही मिळालं, याचं दु:ख नाही. पण मला देवेंद्र फडणवीसांनी छळले आहे. माझा आजही भाजपवर रोष नाही. पण, मी फक्त फडणवीसांवर खूप नाराज आहे. माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल झाला आणि तो देवेंद्र फडणवीसांना करायला लावला. याचा मला खूप मन:स्ताप झाला. यासर्व मानसिक छळामुळेच मी पक्षांतराचा निर्णय घेतला, अशी खळबळजनक प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर ते मुक्ताईनगरात पत्रकारांशी बोलत होते.

एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद...

ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकरांसारखे कितीतरी नेते होते. त्यांच्यासोबत आजतागातयत भाजपचे काम केले. भाजपने मला अनेक मोठी पदे दिली. मी ती नाकारु शकत नाही. मी भाजपवर किंवा केंद्रातील एकाही नेत्यावर टीका केली नाही. माझ्यासोबत एकही आमदार, एकही खासदार नाही. खासदार रक्षा खडसे या देखील भाजप सोडणार नाहीत, असेही खडसेंनी सांगितले. त्यांचा निर्णय घेण्यासाठी त्या सक्षम आहेत, असे सूचक विधान खडसे यांनी केले.

त्या कालखंडात राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना किंवा इतर कोणत्याही पक्षाने माझ्या राजीनाम्याची मागणी केलेली नसताना, माझा राजीनामा घेण्यात आला. माझी भाजपाविषयी तक्रार नाही. केंद्रीय नेतृत्वाविषयी किंवा प्रदेश कार्यकारिणीवर मी नाराज नाही. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर नाराज असल्यानेच मी भाजपाला सोडचिठ्ठी देत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

भाजपसाठी उभे आयुष्य घालवले. मात्र, माझ्या चौकशा फडणवीसांनी लावल्या व त्यामुळे प्रचंड बदनामी सहन करावी लागली. मला काय मिळाले वा नाही, याच्याशी घेणे देणे नाही. माझ्या कथित पीएवर नऊ महिन्यांपासून पाळत ठेवण्यात आली. ही एकप्रकारे मंत्र्यावर पाळत होती. पुढे जाऊन त्याची कबुली सभागृहात देवेंद्र फडणवीसांनी दिली. जे पद मिळवले, ते मी स्वतःच्या ताकदीवर मिळवल्याचे त्यांनी सांगतले. आजही मोठे आक्षेप असलेले नेते भाजपत कार्यरत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

माझ्या मागे भ्रष्टाचारविरोधी विभागाचा ससेमिरा लावण्यात आला. भूखंड प्रकरणात आरोप करण्यात आले. विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. अंजली दमानिया यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. पोलीस गुन्हा दाखल करून घेत नव्हते. पण देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून पोलिसांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या, असा घणाघाती आरोप खडसेंनी केला.

मी 15 दिवसांपूर्वी खोट्या खटल्यातून बाहेर पडलो. मात्र, यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला गेले काही महिने प्रचंड मन:स्ताप भोगावा लागला, असेही खडसे म्हणाले. जनतेची ताकद माझ्यासोबत असल्याचेही ते म्हणाले.

भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देताना, आज खूप वाईट वाटत आहे. भाजपसाठी मी 40 वर्ष काम केले. तेव्हा भाजप खेड्यापाड्यात पोहोचली नव्हती. लोकं शिव्या द्यायचे, दगडधोंडे मारायचे, थुंकायचे तेव्हा आम्ही पक्षासाठी पायपीट केली. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, नितीन गडकरी, फरांदे, फुंडकर, मुनंगटीवार यांच्यासोबत प्रामाणिक काम केले. पण नंतरच्या काळात खूप त्रास सहन करावा लागला. पक्षाने अनेक मोठी पदे दिली. माझा भाजपवर रोष नाही, केंद्रीय नेत्यावर कधीही मी टीका केली नाही, असेही खडसे यांनी सांगितले.

दरम्यान, संपूर्ण पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे यांनी त्यांची आजवरची भाजपतील वाटचाल, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून झालेला त्रास यासंदर्भात माहिती दिली. राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात विचारणा केली असता, त्यांनी आता तूर्तास राजीनामा दिला आहे, याच विषयावर बोलतो, असे सांगत अधिक बोलणे टाळले.

Last Updated : Oct 21, 2020, 5:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.