ETV Bharat / state

खडसेंचा महाजनांच्या गडावर 'सर्जिकल स्ट्राईक'; जामनेरमधील पावणे दोनशे भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल - BJP activist join NCP

माजीमंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंंघातून शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता
एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता
author img

By

Published : Nov 3, 2020, 7:14 PM IST

जळगाव - माजीमंत्री एकनाथ खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर खडसे 'ऍक्शन मोड'मध्ये आले असून, त्यांनी जळगाव जिल्ह्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रवादीच्या पक्षसंघटन वाढीसाठी खडसेंनी पहिला 'सर्जिकल स्ट्राईक' त्यांचे राजकीय हाडवैरी माजीमंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघावर केला आहे. मंगळवारी (दि. 2 नोव्हेंबर) दुपारी जामनेर तालुक्यातील सुमारे पावणे दोनशे भाजप कार्यकर्त्यांनी खडसेंच्या नेतृत्त्वावर विश्वास दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

बोलताना एकनाथ खडसे व अ‌ॅड. रवींद्र पाटील

जळगाव जिल्ह्यातील भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गिरीश महाजनांच्या जामनेर मतदारसंघातील देवपिंपरी, नेरी या गावातील पावणे दोनशे भाजप कार्यकर्त्यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असल्याचे चित्र दिसत आहे. जामनेर तालुका हा गिरीश महाजन यांचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो. गेल्या 5 पंचवार्षिक निवडणुकांपासून ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. असे असताना खडसेंनी याच मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते आपल्या बाजूने वळवल्याने हा गिरीश महाजन यांना मोठा धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक बळकटी येईल - खडसे

जामनेर तालुक्यातील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हे कार्यकर्ते यापूर्वी भाजपचे नि:स्वार्थपणे काम करत होते. त्यातील काही कार्यकर्ते हे भाजपचे पदाधिकारी होते, तर काही कार्यकर्ते हे आजही भाजपचे पदाधिकारी म्हणून काम करत होते. परंतु, अलीकडे ते पक्ष नेतृत्त्वावर नाराज होते. त्यामुळे त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. यापुढच्या काळात असे अनेक भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल होतील. त्यामुळे राष्ट्रवादीला अधिक बळकटी येईल, असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.

जळगाव जिल्हा राष्ट्रवादीमय होणार - रवींद्र पाटील

खडसेंच्या मुक्ताईनगरातील फार्म हाऊसवर झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष प्रवेश सोहळ्याला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‌ॅड. रवींद्र पाटील, जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‌ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर उपस्थित होते. यावेळी अ‌ॅड. रवींद्र पाटील म्हणाले, एकनाथ खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत. ते राष्ट्रवादीत असल्याने पक्षाची ताकद वाढली आहे. त्यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून अनेक भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल होत आहेत. यापुढे जळगाव जिल्ह्यातील अनेक गावे राष्ट्रवादीमय होतील.

खडसेंनी आमच्या कार्यकर्त्यांची काळजी करू नये, असे कालच म्हटले होते आमदार गिरीश महाजन यांनी

भाजपवर अनेक कार्यकर्ते नाराज असल्याने ते आपले राजीनामे देत आहेत, अशी टीका एकनाथ खडसे यांनी भाजपवर केली होती. याबाबत बोलताना गिरीश महाजन यांनी खडसेंनी केलेल्या टीकेला सोमवारी (दि. 2 नोव्हेंबर) प्रत्युत्तर दिले. 'खडसे आता आमच्या पक्षातून गेले आहेत. आम्ही त्यांना शुभेच्छा देखील प्रदान केल्या आहेत. आमच्या कार्यकर्त्यांची काळजी खडसेंनी करू नये. आमचे कार्यकर्ते आहेत; त्याच ठिकाणी आहेत. कार्यकर्त्यांची बांधिलकी पक्षाची आहे. पक्षाच्या विचारांची आहे. कुठल्या व्यक्तीशी नाही. त्यामुळे पक्षाला भगदाड पडेल किंवा पोकळी निर्माण होईल, असे नाही. पक्ष आहे, त्याच ठिकाणी आहे. उलट यापुढच्या काळात जळगाव जिल्ह्यात पक्ष जोमाने वाढेल', अशी आपल्याला खात्री असल्याचे गिरीश महाजन यांनी त्यावेळी सांगितले होते. मात्र, आज शेकडोच्या संख्येने महाजन यांच्या मतदारसंघातील व भाजप पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने महाजन यांना येणाऱ्या काळात राजकीय अडचणींचा सामना करावा लागणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

हेही वाचा - वर्षभरात मुख्यमंत्र्यांनी केले तरी काय; गिरीश महाजनांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.