ETV Bharat / state

जळगाव : वरणगावात 15 लाखांचा गुटखा जप्त; नाकाबंदी सुरू असताना कारवाई - जळगावच्या वरणगावमध्ये गुटखा जप्त

नाकाबंदी दरम्यान वरणगाव पोलिसांनी गुटख्याचा मोठा साठा जप्त केला आहे. शनिवारी दुपारी ही कारवाई झाली. पोलिसांनी जप्त केलेल्या गुटख्याची किंमत सुमारे 15 लाख रुपयांच्या घरात आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात चारचाकी चालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

gutka worth of 15 lakh seized in varangaon
जळगाव : वरणगावात 15 लाखांचा गुटखा जप्त; नाकाबंदी सुरू असताना कारवाई
author img

By

Published : Apr 24, 2021, 8:05 PM IST

जळगाव - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या नाकाबंदी दरम्यान वरणगाव पोलिसांनी गुटख्याचा मोठा साठा जप्त केला आहे. शनिवारी दुपारी ही कारवाई झाली. पोलिसांनी जप्त केलेल्या गुटख्याची किंमत सुमारे 15 लाख रुपयांच्या घरात आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात चारचाकी चालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडीचा चालक रियाज अली लियाकत अली, सिकंदरकुमार साहनी तसेच गुटख्याचा मालक गणेश चव्हाण अशी संशयित आरोपींची नावे आहेत. हे तिघेही जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील रहिवासी आहेत.

प्रतिक्रिया

गाडी जप्त करून संशयितांना अटक -

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात अवैध धंद्यांवर कारवाई सुरू आहे. दुसरीकडे, राज्य शासनाने कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी लॉकडाऊन घोषित केला आहे, अशा परिस्थितीत वरणगाव शहरात बस स्थानकाच्या जवळ पोलिसांकडून वाहनांच्या तपासणीसाठी नाकाबंदी पॉईंट उभारण्यात आला आहे. शनिवारी दुपारी पोलीस वाहनांची तपासणी करत असताना एक मालवाहू चारचाकी त्याठिकाणी आली. गाडीत काय आहे म्हणून पोलिसांनी विचारणा केली असता, चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना संशय आल्याने गाडीची तपासणी करण्यात आली. त्यात राज्यात प्रतिबंधित असलेला विमल पानमसाला व विमल सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी गाडी जप्त करून संशयितांना अटक केली.

गुटखा मध्यप्रदेशातून आणल्याचा संशय -

गाडीत आढळून आलेल्या गुटख्याच्या साठ्याची किंमत 14 लाख 96 हजार रुपये इतकी आहे. हा गुटखा संशयित आरोपींनी मध्यप्रदेशातून आणल्याचा संशय आहे. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात गुटखा विक्रीचे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता असून पोलीस त्या दृष्टीने तपास करत आहेत. या कारवाईत पोलिसांनी गुटखा तसेच मालवाहू गाडी, असा सुमारे 18 लाख 96 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हेही वाचा - कोव्हिशिल्डची किंमत बाजारपेठेत सर्वात कमी; सीरमकडून दराबाबत स्पष्टीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.