जळगाव : उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे ( Sushma Andhare ) यांची मुक्ताईनगरमधील सभा रद्द झाल्यानंतर अनेक आरोप-प्रत्योरोप सुरू झाले. या सभेवरूनच आता राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील ( Minister Gulabrao Patil ) यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व एकनाथ शिंदे गटाची भविष्यात आघाडी होईल अशी प्रतिक्रिया विधानपरिषदचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे. या मुद्द्यावर पालकमंंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या भेटीत राजकारण असू शकत नाही, सुखदुःखात एकमेकांकडे जाणारी राजकारणाच्या पलीकडचे विषय असतात. मात्र भविष्यात कोणतेही गट एकत्र येऊ शकतात असा सूचक इशारा, मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.
आदित्य ठाकरेंसमोर आम्ही गाढव होतो की काय - आदित्य ठाकरे यांनी आज कबुली दिली आहे की शिवसेनेत फूट पडण्यामागे मी स्वतः जबाबदार आहे यावरही मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मूळ चुका ह्या त्यांच्याच होत्या मात्र तरीही आम्हाला गद्दार म्हटले जाते आम्ही गद्दार नव्हतोच. आम्हाला यांनी समजूनच घेतले नाही. राज्यात आज फिरताहेत, आपण माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र आहात आणि बाळासाहेबांचे नातू आहेत त्यामुळे फिरल्यामुळे, काही ना काही नाराज्या या दूर होतील. समस्या दूर होतील असे वाटले होते, पण गाढवाच्या पुढे वाचली गाथा आणि रात्रीचा गोंधळ बराच होता, असे म्हणत एखाद्या माणसाने सांगावं आणि इतरांनी ते ऐकूच नये याबद्दल मी आदित्य ठाकरे यांना गाढव म्हणणार नाही. त्यांनी आमच्या समोर वाचले पण आम्ही गाढव होतो का काय. त्यांनी आता कबुली दिली मात्र वेळ निघून गेली आहे, असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे लगावला.
सुषमा अंधारेंवर टीका - थोडी फार उरलेली शिवसेना वाचविण्याचा, वाढविण्याचा उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे हे प्रयत्न करत आहेत. मात्र बाहेरची भूत आणून शिवसेना वाढणार नाही, असे म्हणत नाव न घेता गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली. सुषमा अंधारे यांच्या विषयावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की हा विषय माध्यमांनी तापवलं , आम्ही तापवल नाही, एखाद्या राष्ट्रपतींप्रमाणे त्यांच्या सभा या सर्व माध्यमांनी लाईव्ह दाखवल्या. लोकमान्य लोकांना एवढं महत्त्व देत नाही तेवढं महत्त्व त्यांना दिले, असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांवर आक्षेप घेतला.
त्यांना नटीची गरज म्हणून सुषमा अंधारे यांना आणले - सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांचे वाळूचे ठेके गावठी दारूचे अड्डे तसेच दोन नंबरचा पैसा आहे असे गंभीर आरोप केले होते या आरोपांचाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार समाचार घेतला आहे. मला माझा जिल्हा ओळखतो त्यांनाही महाराष्ट्र ओळखतो. त्यांचा कुठेही पिक्चर चालला नाही, म्हणून त्यांना नटीची गरज होती. ज्याप्रमाणे पिक्चर मध्ये एखादी बाई पाहिजे असते, त्याप्रमाणे यांनी आता आमच्या पिक्चर मध्ये या बाईला आणले, असा जोरदार घणाघात मंत्री गुलाबराव पाटील यांनी उध्दव ठाकरे तसेच अंधारे यांच्यावर केला.
सुषमा अंधारे यांची सभा होऊ दिली नसती - सुषमा अंधारे यांनी त्यांची सभा होऊ न देण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांनी दबाव टाकला असा आरोप केला होता. आम्ही दबाव टाकला असता तर सुषमा अंधारे यांची धरणगावची सभा सुद्धा होऊ दिली नसती. मुक्ताईनगर मध्ये माझी सभा होती त्या सभेसाठी आम्ही आधी परवानगी मागितली होती आणि ती मिळाली सुद्धा होती. मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी होती. त्यासाठी दोन्ही सभा रद्द केल्या. त्यामुळे दबाव टाकण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्टीकरण मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
सुषमा अंधारे यांना अनेक जन्म घ्यावे लागतील - देवेंद्रजी यांचा अभय असल्यामुळे मंत्री गुलाब पाटील यांनी माजी सभा होऊ दिली नाही. फडणवीस यांचा अभ्यास नसता तर गुलाबराव पाटील यांची हिम्मत झाली नसती, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला होता. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले आहे. ४० आमदारामध्ये मला फक्त राज्यात गुलाबराव पाटीलच फक्त दिसतोय. मात्र हा एकटा वाघ सर्वांना काफी आहे, माझी स्टाईल कॉपी करायला सुषमा अंधारे ना अनेक जन्म घ्याव लागतील, सुषमा अंधारे बाई आहे अन्यथा माणूस असते तर दाखवल असत, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांना आव्हान दिले आहे.
सुषमा अंधारेंनी सभा घ्यायला पाहिजे होती - मुक्ताईनगर मध्ये परवानगी नाकारल्यानंतर सभा घेणारच असा इव्हेंट केला आणि मी कशी महाराणी आहे अस चित्र त्यांनी निर्माण केलं. अशी टीका सुषमा अंधारे यांच्यावर केली. सभा घेणार नाही अशी प्रशासनाकडे लेखी कबूल केली.. मात्र सभा घेणारच असं पोलिसांना का सांगितलं नाही. हे सांगत असताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी जनता दलाचे उदाहरण दिलं. परवानगी नसल्याने जनता दलाचे आमदारांनी झाडावर बसून सभा घेतली होती. त्याचप्रमाणे यांनीही कुठेतरी बसून सभा घ्यायला पाहिजे होते, हे नाटक आणि नौटंकी आहे, हे कुठेच वसारलेले भांड होत, हे या आता इकडे आलो आणि आम्हाला शिकवत आहे, अशी टीका अंधारे यांच्यावर केली.
गुजरातमध्ये गेलेल्या प्रकल्पांबाबत धनंजय मुंडेंवर टीका - देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर प्रकल्प गुजरातमध्ये गेला नसता, असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. प्रकल्प कसा गेला, कुठे गेला याबाबतचे सर्व स्पष्टीकरण उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यापूर्वीच दिले आहे. प्रकल्पावर टीका करण्यापेक्षा धनंजय मुंडे यांनी राज्याच्या विकाससाठी काय केले पाहिजे याच्या सूचना कराव्यात. विनाकारण प्रकल्पावर टीका करण्यापेक्षा, मात्र अडीच वर्षे आपणच होते त्यावेळी अडीच वर्षात आपण आपल्याकडे का येऊ शकला नाही याचा विचार करणे गरजेचे आहे, असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुंडेंना लावला आहे.