ETV Bharat / state

शिवसेना करणार सत्ता स्थापन? जळगावच्या पालकमंत्री पदाची रंगली चर्चा

गेल्यावेळी सहकार राज्यमंत्री पद मिळवणारे गुलाबराव पाटील यावेळी कॅबिनेट मंत्रिपदाचे दावेदार आहेत. त्या सोबतच सेनेचे पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील आणि एरंडोलचे आमदार चिमणराव पाटील हे देखील मंत्रिपदाचे दावेदार मानले जात आहेत.

author img

By

Published : Nov 11, 2019, 4:24 PM IST

गुलाबराव पाटील

जळगाव - भाजप-शिवसेनेतील युती तुटण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर शिवसेना भाजपशिवाय राज्यात सरकार स्थापन करेल, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. पाठिंबा कुणाचाही असला तरी शिवसेना सत्तेत राहिलच हे स्पष्ट होत असल्याने शिवसेनेत सध्या जळगावच्या पालकमंत्रीपदाची चर्चा पुढे आली आहे. जिल्ह्यात भाजपला रोखण्यासाठी गुलाबराव पाटील यांना पालकमंत्रीपद मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

गेल्यावेळी सहकार राज्यमंत्री पद मिळवणारे गुलाबराव पाटील यावेळी कॅबिनेट मंत्रिपदाचे दावेदार आहेत. त्या सोबतच सेनेचे पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील आणि एरंडोलचे आमदार चिमणराव पाटील हे देखील मंत्रिपदाचे दावेदार मानले जात आहेत.

हेही वाचा - जळगावात नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे अद्याप अपूर्ण; मुख्य सचिवांच्या आदेशाला हरताळ

युतीत असून सुद्धा भाजपने शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण, पाचोरा, एरंडोल आणि चोपडा या चारही मतदारसंघात बंडखोर उभे केले होते. तरी देखील शिवसेनेच्या सर्वच्या सर्व 4 जागा निवडून आल्या. मुक्ताईनगरमध्ये आमदार चंद्रकांत पाटील हे अपक्ष असले तरी मुळचे शिवसैनिक असल्याने ते देखील शिवसेना आमदार म्हणूनच गणले जातात. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक 5 आमदार असलेली शिवसेना ही पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. लोकसभेत प्रामाणिकपणे मदत करून देखील भाजपने विधानसभेला दगा दिल्याचा राग स्थानिक शिवसेना आमदारांत आहे.

लोकसभेला देखील स्थानिक पातळीवर विरोध असताना केवळ पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशामुळे शिवसैनिकांनी भाजपला मदत केली होती. विधानसभेत मात्र, भाजपने पुन्हा त्रास दिल्याने यावेळी प्रक्षप्रमुखांसह सर्व शिवसेना भाजपच्या विरोधात आहे. आमदार गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या मतदारसंघात भाजपच्या बंडखोरांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे हे तिनही नेते भाजपवर नाराज आहेत. सत्तेत आल्यानंतर बंडखोरांच्या पाठिराख्यांचा राजकीय बंदोबस्त करण्याची जबाबदारी शिवसेना आमदारांवर राहणार आहे.

हेही वाचा - महायुतीकडून जनादेशाचा अवमान - एकनाथ खडसे

महाआघाडीच्या बाहेरून पाठिंब्यावर शिवसेनेचे सरकार स्थापन झाल्यास जळगाव जिल्ह्यातून दोन आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागू शकते. त्यात गुलाबराव पाटील आणि ज्येष्ठ आमदार चिमणराव पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार किशोर पाटील हे देखील स्पर्धेत आहेत. दरम्यान, युतीत दोन्ही पक्षात ताणले गेलेल्या संबधांच्या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांना जळगावचे पालकमंत्रिपद मिळावे म्हणून शिवसैनिक विशेष आग्रही आहेत.

जळगावच्या पालकमंत्रिपदावर शिवसेनेचाच दावा-

भाजपला जशास तसे उत्तर देण्यासाठी जळगावचे पालकमंत्रिपद शिवसेनेच्या मंत्र्याला मिळावे. विशेषत: गुलाबराव पाटील यांच्याकडे ते द्यावे, अशी भावना शिवसैनिकांतून पुढे येत आहे. दोन्ही पक्षातील युती तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, युती झाली आणि नाही झाली तर जळगावच्या पालकमंत्रिपदावर शिवसेनेचाच दावा राहणार असल्याचे संकेत यानिमित्ताने मिळत आहेत.

गिरीश महाजनांची गच्छंती?

दरम्यान, भाजपला सत्तेपासून दूर जावे लागले तर जळगाव जिल्ह्यातून माजी मंत्री गिरीश महाजन यांची गच्छंती अटळ आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकटमोचक म्हणून राजकीय पटलावर उदयास आल्यानंतर महाजन हे राज्यभर राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करण्यात यशस्वी ठरले होते. जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने विचार केला तर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यापेक्षा वरचढ ठरण्यात देखील ते काही अंशी यशस्वी झाले होते. परंतु, आता भाजपच सत्तेपासून अलिप्त होऊन विरोधात बसणार असण्याची शक्यता असल्याने गिरीश महाजन बॅकफूटवर जाणार आहेत.

Intro:जळगाव
भाजप-शिवसेनेतील युती तुटण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर शिवसेना भाजपशिवाय राज्यात सरकार स्थापन करेल, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. पाठिंबा कुणाचाही असला तरी शिवसेना सत्तेत राहिलच हे स्पष्ट हाेत असल्याने शिवसेनेत सध्या जळगावच्या पालकमंत्रीपदाची चर्चा पुढे आली आहे. जिल्ह्यात भाजपला राेखण्यासाठी गुलाबराव पाटील यांना पालकमंत्रीपद मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्यावेळी सहकार राज्यमंत्री पद मिळवणारे गुलाबराव पाटील यावेळी कॅबिनेट मंत्रिपदाचे दावेदार आहेत. त्या सोबतच सेनेचे पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील आणि एरंडोलचे आमदार चिमणराव पाटील हे देखील मंत्रिपदाचे दावेदार मानले जात आहेत.Body:युतीत असून सुद्धा भाजपने शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण, पाचोरा, एरंडोल आणि चोपडा या चारही मतदारसंघात बंडखाेर उभे केले हाेते. तरी देखील शिवसेनेच्या सर्वच्या सर्व चार जागा निवडून आल्या. मुक्ताईनगरमध्ये आमदार चंद्रकांत पाटील हे अपक्ष असले तरी मुळचे शिवसैनिक असल्याने ते देखील शिवसेना आमदार म्हणूनच गणले जातात. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक ५ आमदार असलेली शिवसेना ही पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरली आहे. लाेकसभेत प्रामाणिकपणे मदत करून देखील भाजपने विधानसभेला दगा दिल्याचा राग स्थानिक शिवसेना आमदारांत आहेच.

लाेकसभेला देखील स्थानिक पातळीवर विराेध असताना केवळ पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशामुळे शिवसैनिकांनी भाजपला मदत केली हाेती. विधानसभेत मात्र, भाजपने पुन्हा त्रास दिल्याने या वेळी प्रक्षप्रमुखांसह सर्व शिवसेना भाजपच्या विराेधात आहे. आमदार गुलाबराव पाटील, आमदार किशाेर पाटील, माजी आमदार चंद्रकांत साेनवणे यांच्या मतदारसंघात भाजपच्या बंडखाेरांनी बंडखाेरी केली हाेती. त्यामुळे हे तिनही नेते भाजपवर नाराज आहेत. सत्तेत आल्यानंतर बंडखाेरांच्या पाठिराख्यांचा राजकीय बंदाेबस्त करण्याची जबाबदारी शिवसेना आमदारांवर राहणार आहे. महाअाघाडीच्या बाहेरून पाठिंब्यावर शिवसेनेचे सरकार स्थापन झाल्यास जळगाव जिल्ह्यातून दाेन आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागू शकते. त्यात गुलाबराव पाटील अाणि ज्येष्ठ आमदार चिमणराव पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. दुसऱ्यांदा निवडून अालेले आमदार किशाेर पाटील हे देखील स्पर्धेत आहेत. दरम्यान, युतीत दाेन्ही पक्षात ताणले गेलेल्या संबधांच्या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांना जळगावचे पालकमंत्रिपद मिळावे म्हणून शिवसैनिक विशेष आग्रही अाहेत.

जळगावच्या पालकमंत्रिपदावर शिवसेनेचाच दावा-

भाजपला जशास तसे उत्तर देण्यासाठी जळगावचे पालकमंत्रिपद शिवसेनेच्या मंत्र्याला मिळावे. विशेषत: गुलाबराव पाटील यांच्याकडे ते द्यावे, अशी भावना शिवसैनिकांतून पुढे येत आहे. दाेन्ही पक्षातील युती तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, युती झाली अाणि नाही झाली तर जळगावच्या पालकमंत्रिपदावर शिवसेनेचाच दावा राहणार असल्याचे संकेत यानिमित्ताने मिळत आहेत.Conclusion:गिरीश महाजनांची गच्छंती?
दरम्यान, भाजपला सत्तेपासून दूर जावे लागले तर जळगाव जिल्ह्यातून माजीमंत्री गिरीश महाजन यांची गच्छंती अटळ आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकटमोचक म्हणून राजकीय पटलावर उदयास आल्यानंतर महाजन हे राज्यभर राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करण्यात यशस्वी ठरले होते. जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने विचार केला तर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यापेक्षा वरचढ ठरण्यात देखील ते काहीअंशी यशस्वी झाले होते. परंतु, आता भाजपच सत्तेपासून अलिप्त होऊन विरोधात बसणार असण्याची शक्यता असल्याने गिरीश महाजन बॅकफूटवर जाणार आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.