ETV Bharat / city

Gulabrao Patil : गुलाबराव पाटलांच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? - Shinde group cabinet

अखेर मुख्यमंत्री शिंदेंच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ( CM Shinde's cabinet expansion ) ठरला असून लवकरच शिंदे गटाचे मंत्रिमंडळ ( Shinde group cabinet ) अस्तित्वात येईल. राजकीय तज्ज्ञांच्या मते महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या काही आमदारांना ( Gulabrao Patil ) पुन्हा मंत्रिपदी संधी मिळू शकते. यामध्ये पानटपरी चालकापासून कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत वाटचाल करणाऱ्या गुलाबराव पाटील या खंद्या नेत्याचाही समावेश असण्याची शक्यता आहे.

MLA Gulabrao Patil
गुलाबराव पाटील
author img

By

Published : Aug 4, 2022, 9:46 PM IST

Updated : Aug 9, 2022, 7:28 AM IST

मुंबई - महाराष्ट्रात सत्तांतर ( Political changes in Maharashtra ) होऊन एक महिना उलटला. मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार ( Cabinet expansion of Maharashtra ) न झाल्याने विरोधी गट नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. या मंत्रिमंडळाबाबत काही याचिका कोर्टातही आहेत. ( cabinet of Shinde government ) त्यावर आणखी निर्णय झालेला नाही. त्यामुळेही हा विस्तार रखडलेला होता. अखेर मुख्यमंत्री शिंदेंच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ( CM Shinde's cabinet expansion ) ठरला असून लवकरच शिंदे गटाचे मंत्रिमंडळ ( Shinde group cabinet ) अस्तित्वात येईल. राजकीय तज्ज्ञांच्या मते महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या काही आमदारांना पुन्हा मंत्रिपदी संधी मिळू शकते. यामध्ये पानटपरी चालकापासून कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत वाटचाल करणाऱ्या गुलाबराव पाटील या खंद्या नेत्याचाही समावेश असण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया त्यांची राजकीय कारकीर्द

गुलाबराव पाटील ( MLA Gulabrao Patil ) - जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार गुलाबराव पाटील हे शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेशी एकनिष्ठ असलेले गुलाबराव पाटील महाविकास आघाडी सरकारमध्ये पाणीपुरवठा मंत्री म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत जळगावतील कुसुंबा या गावी गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात शिंदे सरकारची स्थापना झाली होती. गुलाबराव पाटील हे गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले होते. यांच्यासोबत आणखी दोन शिवसेनेचे आमदारही तिथे गेले होते.

गुलाबराव पाटील राजकीय कारकीर्द ( Gulabrao Patil Political Career ) - 1999: विधानसभेवर पहिल्यांदा निवडून गेले. 2004: विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा विजयी. 2009 : विधानसभेला पराभव, शिवसेना उपनेतेपदी निवड. 2014: विधानसभा निवडणुकीत विजयी. 2016-2019: फडणवीसांच्या मंत्रिमंडळात सहकार राज्यमंत्री म्हणून कामकाज. 2019 : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा विजय. जानेवारी 2020: ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी

बाळासाहेबांमुळे मंत्री झालो- 5 जून 1966 रोजी जन्मलेल्या गुलाबराव पाटलांचा मंत्रिपदाचा प्रवास थक्क करणारा आहे. साधा पानटपरीवाला ते थेट मंत्रीपदापर्यंत त्यांची राजकीय वाटचाल राहिली आहे. त्यांच्या वाटेला पदोपदी प्रचंड संघर्ष आला. ( gulabrao patil’s political journey ) गुलाबराव पाटील हे बहुतेक भाषणात आपण पानटपरीवाला होतो. पानटपरीवाल्याला बाळासाहेबांनी मंत्री बनवलं, अशी आठवण सांगतात. साधा पण आक्रमक, सरळ आणि निष्ठावान अशी गुलाबराव पाटलांची ओळख राहिली आहे.

शिंगाडे मोर्चामुळे मिळाली प्रसिद्धी - गुलाबरावांची आंदोलने हटकी राहिली आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेक मोर्चे काढले. वीज प्रश्नावर तर त्यांनी शिंगाडे मोर्चा काढला होता. त्यांच्या याच आंदोलनामुळे ते लोकप्रिय झाले. अफाट वक्तृत्वामुळे त्यांना खानदेशची मुलुख मैदानी तोफ आणि शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ म्हणूनही संबोधले जाऊ लागले. 1992 मध्ये ते पंचायत समिती सदस्य झाले. तर 1997मध्ये जिल्हा परिषद सदस्य झाले. 1999मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. 2009चा अपवाद वगळता ते सातत्याने आमदार म्हणून निवडून आले.

‘नशीब’ नावाने पानटपरी प्रसिद्ध - गुलाबराव पाटील हे जळगावजवळच्या पाळधी या खेड्यात पानटपरी चालवत होते. या पानटपरीचं नाव ‘नशीब’ असं होतं. तरुण वयात गुलाबराव पाटीलही शिवसेनेच्या संपर्कात आले आणि बघता बघता कट्टर शिवसैनिक झाले. अनेक आंदोलनात गुलाबराव पाटील सहभागी होऊ लागले. गावरान भाषणांनी सभा गाजवू लागले. अल्पावधीतच शिवसेनेचा फायरब्रँड नेता म्हणून उदयास आला. गुलाबराव पाटील हे 1999 मध्ये आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले.

तमाशातही काम केले - गुलाबराव पाटील यांनी गरीबी नुसती पाहिली नाही तर अनुभवली आहे. पोट जगवण्यासाठी त्यांनी ऐन उमेदीत तमाशात कामं केली. आजही ते मंत्री असोत नसोत, लोकांच्या मदतीला धावून जातात. विभागातील विकास कामांपासून ते कौटुंबिक कलहापर्यंतच्या समस्या त्यांच्याकडे येत असतात. त्यामुळे त्यांचे गावातील कार्यालय नेहमी गजबजलेले असते. लोकांची कायम वर्दळ असते. गुलाबराव पाटीलही जमेल तेवढी आणि शक्य होईल तेवढी मदत करण्याचा आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात.

हेही वाचा - Cabinet Expansion Of Shinde Govt: शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; वाचा संभाव्य मंत्रिमंडळाची यादी

Last Updated : Aug 9, 2022, 7:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.