जळगाव : गो हत्या, लव जिहाद व धर्मांतर विरोधात जळगाव मध्ये विविध हिंदुत्ववादी संघटना व हिंदू समाज बांधवांच्या वतीने विराट हिंदू जनसंघर्ष मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. (Hindu Jan Sangharsh Morcha in Jalgaon). छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा जन संघर्ष मोर्चा काढण्यात आला. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयावर झालेल्या जाहीर सभेत पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी देखील सहभाग नोंदवत विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने निवेदन स्वीकारले. राज्य सरकार हिंदुत्ववादी संघटना व हिंदू बांधवांच्या मागण्या पूर्ण करण्यास कटिबद्ध असल्याचे गुलाबराव पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
संजय राऊतांवर सडकून टीका : आमच्यावर सातत्याने टीका केल्या जातात. संजय राऊत हे देखील सातत्याने आमच्यावर टीका करतात. पण एकनाथ शिंदे यांनी दाढीवर नुसता हात ठेवला असता तर आज संजय राऊत खासदार झाले नसते, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. संजय राऊत यांना जी 41 मते मिळाली ती फक्त एकनाथ शिंदे यांच्यामुळे मिळाली असून तुम्ही पक्ष बाजूला ठेवला, धर्मच टिकला नाही तर तुमचा पक्ष कुठे वाचणार, असा हल्लाबोलही गुलाबराव पाटलांनी केला आहे.
धर्माच्या बाबतीत आम्ही गांधीजी नाही : 'इस देश मे रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा', अशा शब्दात ओवेसीच्या कुत्र्यांना विधानसभेत ठणकावले असल्याचे गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले. आम्ही कुणाच्या धर्माकडे वाकड्या नजरेने बघत नाही पण जर कोणी आमच्या धर्माकडे वाकड्या नजरेने बघत असणार तर आम्ही गांधीजी नाही, असा थेट इशारा गुलाबराव पाटलांनी विरोधकांना दिला आहे. सत्तेसाठी नाही तर हिंदुत्वासाठी आम्ही चार महिन्यापूर्वी गाडी बदलली आणि इस मार्ग की सभी लाईन व्यस्त असल्याचे म्हणत गुवाहाटी गाठल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. सत्तेसाठी सतराशे साठ पण आमच्यासाठी एकच हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
खुर्चीपेक्षा धर्म महत्त्वाचा : खुर्चीपेक्षा धर्म महत्त्वाचा असल्याचे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. मी मंत्री आहे की आमदार आहे यापेक्षा आम्ही आपल्यातला हिंदू आहे, खुर्ची देणारे पण तुम्ही खुर्ची हलवणारे पण तुम्ही त्यामुळे धर्म महत्त्वाचा असून आम्ही कुणाच्या धर्माला दुखवत नाही, पण आमच्या धर्माबाबत कोणी वाकडी नजर करत असेल तर आम्ही सहन करणार नसल्याचे म्हणत धर्मांतरावरून गुलाबराव पाटलांनी थेट इशारा दिला आहे.