ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करा; गुलाबराव पाटील यांची मागणी - stand with government

कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रत्येकाने सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. राज्यातील सेवाभावी संस्था, संघटनांनी आपल्या परीने शक्य ती मदत मुख्यमंत्री सहायता निधीला करावी, असे आवाहन देखील यावेळी गुलाबराव पाटील यांनी केले.

gulabrao patil demands corona testing lab starts in jalgoan
जळगाव जिल्ह्यात कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करा; गुलाबराव पाटील यांची मागणी
author img

By

Published : Apr 8, 2020, 8:52 AM IST

Updated : Apr 8, 2020, 2:00 PM IST

जळगाव-जिल्ह्यात कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करण्यात यावी, कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या गोळ्या-औषधींसह २ हजार पीपीई किटचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी कॅबिनेटच्या बैठकीत केल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिली.

जळगाव जिल्ह्यात कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करा; गुलाबराव पाटील यांची मागणी

राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसीमधून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सहभाग घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करण्याची मागणी कॅबिनेटच्या बैठकीत केली असून तिला राज्य सरकारने तत्त्वत: मान्यता दिली आहे. लॅबसाठी लवकर प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आमदार फंडातून ५० लाख रुपये कोरोनासाठी देता येणार आहेत. केशरी कार्डधारकांना धान्य मिळत नाही. धान्य देण्याबाबत सरकारने सकारात्मक पाऊल उचलले आहे.

संचारबंदीच्या काळात पोलीस यंत्रणेवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. त्यामुळे पोलिसांना मदत म्हणून बंदोबस्तासाठी होमगार्डसची नियुक्ती करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. तालुकास्तरावर शिवभोजन केंद्र सुरू करण्यात यावीत. कामगारांची उपासमार होणार नाही. त्यासाठी कामगार कल्याण मंडळाने मदत करावी, अशा सूचना सरकारने दिल्या आहेत, असेही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

जळगाव जिल्ह्यात एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण रुग्णालयात दाखल आहे. इतर जिल्ह्यांपेक्षा जळगाव जिल्ह्यातील स्थिती चांगली आहे. मात्र, मध्यप्रदेश व गुजरात राज्य जवळच असल्याने या राज्यांच्या सीमा बंद करण्यात याव्यात, अशीही मागणी सरकारकडे केल्याचे पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील पहिल्या कोरोनाग्रस्ताला लागण कशी झाली, याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारणा केली. त्या रुग्णाला कोरोनाची लागण कशी झाली, हे आजपर्यंत कळलेले नाही. कोरोनाशी लढत असल्याने सध्याच्या बिकट परिस्थितीला सामोरे जावेच लागेल. मात्र, याबाबत चौकशी करुन माहिती घेण्यात येईल. सद्यस्थितीत चौकशी करण्यापेक्षा काम करुन घेणे महत्त्वाचे आहे, असे उत्तर देऊन त्यांनी अधिक बोलणे टाळले. बैठकीत जळगाव जिल्ह्यातील केळीबाबत प्रश्न मांडला. केळीच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची केळी खरेदी करण्याबाबत जैन इरिगेशन सिस्टीम्सला विनंती करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

तबलिगी जमातीच्या लोकांनी तपासणीसाठी पुढे यावे

राज्यातील तबलिगी जमातीच्या नागरिकांकडून दिल्लीतील निजामुद्दीनच्या मरकझ कार्यक्रमाबाबत माहिती लपवण्यात येत आहे. एक प्रकारे आपल्या देशासाठी ही घातक बाब आहे. तबलिगी जमातीच्या व्यक्तींनी स्वत:हून कोरोना चाचणीसाठी समोर आले पाहिजे. आपली तपासणी करुन घेतली पाहिजे. त्यांनी तपासणी केल्यास निष्पाप लोकांना कोरोनाची लागण होणार नाही, असेही आवाहन गुलाबराव पाटील यांनी केले.

...अन्यथा डॉक्टरांवर कारवाई करू

आवश्यक त्या सुविधा, साधने उपलब्ध नसल्याने काही डॉक्टर व नर्सने कामावर येण्यास नकार दिला आहे. हा विषय राज्यातील सर्व पालकमंत्र्यांनी बैठकीत मांडला. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्यापर्यंत मास्क पोहोचवण्यात येतील. २५ हजार किट सरकार जिल्हास्तरावर पाठवणार आहे. जिल्ह्यात गोळ्या-औषधांसह २ हजार पीपीई किटची मागणी केली आहे. उपलब्धता होईल, त्याप्रमाणे पुरवठा करण्यात येईल. खासगी डॉक्टरांना कामावर येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही समाज, देशसेवा आहे. त्यांनी कामावर यावे. अशा पद्धतीने काही लोक काम करत नसतील तर त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, अशी कॅबिनेटमध्ये चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. टँकर सुरू करण्याबाबत परवनगी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांऐवजी तहसीलदारांना देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले.

Last Updated : Apr 8, 2020, 2:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.