ETV Bharat / state

इथे फक्त वजीर चाल चालतोय; गुलाबराव पाटलांचे फडणवीसांवर टीकास्त्र - देवेंद्र फडणवीस लेटेस्ट न्यूज

बुद्धिबळ खेळाकडे पाहिले की राजकारणाची आठवण येते. राजकारणातही एकमेकांचे पत्ते कापले जातात. बुद्धिबळात अडीच घर चालणारी चाल आहे. तिरपी चाल आहे, हत्तीची सरळ चाल आहे. वजीर चौफेर चाल चालतो. तशाच पद्धतीने राजकारणात चालत असल्याचे पाटील म्हणाले.

गुलाबराव पाटील
गुलाबराव पाटील
author img

By

Published : Feb 19, 2021, 12:58 PM IST

Updated : Feb 19, 2021, 1:43 PM IST

जळगाव- राजकारणात बुद्धिबळ सारखाच खेळ खेळला जातो. आपला प्यादा कसा सरकवायचा, हे बुद्धिबळात बघितले जाते. पण आजची राजकीय परिस्थिती लक्षात घेतली तर इथे फक्त वजीर चाल चालतोय, अशा शब्दांत शिवसेना नेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.

गुलाबराव पाटलांचे फडणवीसांवर टीकास्त्र

शिवजयंतीनिमित्त बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
लोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने जळगावात शिवजयंतीचे औचित्य साधून बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

बुद्धिबळ आणि राजकारण सारखेच
बुद्धिबळ खेळाकडे पाहिले की राजकारणाची आठवण येते. राजकारणातही एकमेकांचे पत्ते कापले जातात. बुद्धिबळात अडीच घर चालणारी चाल आहे. तिरपी चाल आहे, हत्तीची सरळ चाल आहे. वजीर चौफेर चाल चालतो. तशाच पद्धतीने राजकारणात चालत असल्याचे पाटील म्हणाले.

आमची चाल हत्तीसारखी अगदी शांततेत-
विरोधकांना चिमटा काढताना गुलाबराव पाटील म्हणाले की, आमच्यावर विरोधक कितीही चाल करत असतील तरी आमची चाल मात्र हत्तीसारखी अगदी शांततेत आहे. ती शांततेत असली तरी गजकेसरिया योगाची चाल आहे. आमची चाल ही पूर्ण उद्दिष्टापर्यंत पोहोचणारी असल्याचेही पाटील म्हणाले.

Last Updated : Feb 19, 2021, 1:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.