ETV Bharat / state

भुसावळ रेल्वे यार्डात मालगाडीचे सात डबे घसरले; वाहतूक काही काळासाठी ठप्प

भुसावळ रेल्वे यार्डातून मध्यप्रदेशातील खांडव्याच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीचे सात डबे घसरले. रेल्वे यार्डातील मेन लाईनवर असलेल्या आरओएच डेपोजवळ हा अपघात घडला. या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाच्यावतीने तातडीने वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले.

Goods Train's seven bogies misplaced
मालगाडीचे सात डबे घसरले
author img

By

Published : Mar 15, 2020, 1:37 PM IST

जळगाव - भुसावळ रेल्वे जंक्शनमध्ये असलेल्या यार्डात मालगाडीचे सात डबे घसरल्याची घटना रविवारी सकाळी घडली. यामुळे अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेत जीवीत हानी आणि वित्तहानी झालेली नाही.

भुसावळ रेल्वे यार्डात मालगाडीचे सात डबे घसरले

भुसावळ रेल्वे यार्डातून मध्यप्रदेशातील खांडव्याच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीचे सात डबे घसरले. रेल्वे यार्डातील मेन लाईनवर असलेल्या आरओएच डेपोजवळ हा अपघात घडला. या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाच्यावतीने तातडीने वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले. सकाळी साडेनऊ वाजता अपलाईनवरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र, तोपर्यंत अनेक एक्सप्रेस गाड्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावल्या.

हेही वाचा - 'कोरोनामुळे बेरोजागारी न वाढण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत'

या अपघातामुळे जवळपास दहा एक्सप्रेस गाड्या उशिराने धावल्या. यात पुणे ते कटनी हमसफर एक्सप्रेस, मुंबई ते अमृतसर पठाणकोट एक्सप्रेस, मुंबई ते हटिया एक्सप्रेस, भुसावळ ते बडनेरा मेमू तसेच नवजीवन एक्सप्रेस यांचाही समावेश होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.