जळगाव - गेल्या काही दिवसांपासून सोने व चांदीच्या भावातील चढ-उतार सुरुच आहे. चालू आठवड्याचा विचार केला तर सोन्याच्या भावात सुमारे २ हजार रुपयांची तर चांदीच्या भावात हजार रुपयांची चढ-उतार झाले आहेत.
कोरोना लसीकरण त्याचप्रमाणे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक या दोन्ही कारणांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील व्यवहारांमध्ये मोठे बदल झाले. आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील सोने-चांदीच्या भावातील चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्याचाच एक परिणाम सोने व चांदीच्या भावांवर झाल्याचे जळगावातील सुवर्ण व्यवसायिकांनी सांगितले.जळगावातील सुवर्ण बाजारात बुधवारी (२० जानेवारी) सोन्याच्या भावात २०० रुपयांनी वाढ होऊन ते ५० हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले होते. मात्र, यावेळी चांदीच्या भावात दोन दिवसात ५०० रुपयांनी घसरण झाली होती. त्यामुळे चांदीचा भाव ६७ हजार रुपये प्रति किलोवर आला होता.
हेही वाचा-इंधन दरवाढीचा नवा उच्चांक; मुंबईत पेट्रोल ९२.८ रुपये प्रति लिटर
आठवड्यात असे राहिले भाव-
सोन्याच्या भावात १८ जानेवारीला १५० रुपयांनी वाढ होऊन ते ५० हजार रुपयांवर पोहोचले होते. दोन दिवस याच भावावर स्थिर राहिल्यानंतर बुधवारी त्यात २०० रुपयांनी वाढ होऊन ते ५० हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले होते. शनिवारी जळगावात सोन्याचे भाव ५० हजार ७०० रुपये प्रति तोळा (३ टक्के जीएसटीसह) होते. एकीकडे सोन्याच्या भावात वाढ झालेली असताना चांदीच्या भावात मात्र या आठवड्याच्या प्रारंभी ५०० रुपयांनी घसरण झाली होती. १८ जानेवारीला ६७ हजार ५०० रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात १९ जानेवारीला ५०० रुपयांनी घसरण झाली. तर चांदी ६७ हजार रुपये प्रति किलोवर आली होती. चांदी याच भावावर २० जानेवारीला स्थिर होती. त्यानंतर तीन दिवसांनी शनिवारी मात्र चांदीचे भाव वाढून ते ६८ हजार ४०० रुपयांवर (३ टक्के जीएसटीसह) आल्याचे जळगाव शहर सराफ असोसिएशनचे सचिव स्वरुप लुंकड यांनी सांगितले. सट्टाबाजारात खरेदी-विक्री कमी-अधिक होत असल्याने सोने-चांदीच्या भावात चढ-उतार सुरू असल्याचेही लुंकड यांनी सांगितले.
हेही वाचा-इंधन दरवाढीचा नवा उच्चांक; मुंबईत पेट्रोल ९२.८ रुपये प्रति लिटर
- जळगावातील आजचे (२३ जानेवारी) सोने-चांदीचे भाव
- सोने - ५० हजार ७०० रुपये प्रति तोळा (३ टक्के जीएसटीसह)
- चांदी : ६८ हजार ४०० रुपये प्रति किलो (३ टक्के जीएसटीसह)