ETV Bharat / state

बीएचआर गैरव्यवहारात गिरीश महाजन यांचाही सहभाग? जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांचा आरोप

author img

By

Published : Dec 3, 2020, 1:50 AM IST

बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने जामनेर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्यावर थेट आरोप केले आहेत. त्यामुळे महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

MLA Girish Mahajan Latest News
गिरीश महाजन

जळगाव - राज्यातील बहुचर्चित बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहारात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने जामनेर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर बुधवारी जामनेरात आल्यानंतर पारस ललवाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर खुलासे केले आहेत. यावेळी त्यांनी भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्यावर थेट आरोप केले आहेत. त्यामुळे महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गिरीश महाजन यांनी बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहारात थेट लाभार्थी दिसू नये म्हणून कार्यकर्त्यांच्या नावावर मालमत्ता घेतल्या. त्यानंतर त्या स्वत:सह पत्नी साधना महाजन यांच्या नावे करून घेतल्या. याबाबत आपल्याकडे ढिगभर पुरावे असून ते पुणे आर्थिक गुन्हे शाखेला दिल्याची माहिती पारस ललवाणी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यासंदर्भात पुरावे हवे असल्यास काही गटनंबर घेऊन जनतेने ऑनलाईन उतारे तपासून पहावे, त्यात सत्य बाहेर येईल, असे आवाहनही ललवाणी यांनी केले.

कंडारेंच्या नियुकक्तीमागे महाजनच

​बीएचआर पतसंस्था डबघाईस येऊन अवसायनात गेली. त्यावेळी तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनी अवसायक म्हणून आपल्या मर्जीतील जितेंद्र कंडारे याची नियुक्ती करवून घेतली. पाच वर्ष त्यांची बदली होऊ दिली नाही. अवसायक कंडारे यांच्या माध्यमातून लिलावाचा देखावा करून सुनील झंवरसह काही मोजक्या कार्यकर्त्यांच्या नावे कवडीमोल दराने मालमत्ता घेतल्या. त्यातही मालमत्तांच्या लिलावातून आलेली रक्कम ठेवीदारांना परत करणे अपेक्षित होते. मात्र रक्कम न भरता बहुतांशी ठेवीदारांच्या पावत्या कमिशनवर घेऊन त्यांचा भरणा केला. अशा प्रकारे ठेवीदारांची सोयीस्कर पद्धतीने फसवणूक केल्याचा आरोप ललवाणी यांनी केला आहे.

अशी आहे बनवाबनवी

जामनेरातील गट क्रमांक २२६ व २२७ ही १८ कोटींची मालमत्ता बीएचआरकडून भंसाली यांच्या नावे केवळ तीन कोटीत घेतली होती. ही मालमत्ता दोन महिन्यांपूर्वी गिरीश महाजन यांनी स्वतःसह पत्नी साधना महाजन यांच्या नावे करून घेतली. याचबरोबर पुणे येथील ढोले रोडवरील १२५ कोटींची मालमत्ता झंवर यांच्या नावे केवळ १४ कोटीत घेतली. ही ठेवीदारांची फसवणूक नाही का? असा प्रश्नही ललवाणी यांनी उपस्थित केला. शेतकरी आत्महत्येप्रकरणी सरकारवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करणाऱ्या आमदार महाजन यांच्यावरही ठेवीदारांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही यावेळी ललवाणी यांनी केली.

ललवाणी यांनी पात्रता ओळखून आरोप करावेत- चंद्रकांत बाविस्कर

आमदार गिरीश महाजन हे बीएचआरचे कर्जदार किंवा ठेवीदार नाहीत. त्यांचा या संस्थेशी कुठलाही संबंध नाही. त्यामुळे ललवाणी यांनी स्वत:ची पात्रता ओळखून आरोप करावेत. उगाच बिनबुडाचे आरोप करू नयेत, असे प्रत्युत्तर भाजपचे जामनेर तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी पारस ललवाणी यांना दिले आहे. बीएचआरच्या मालमत्ता ज्यांनी घेतल्या आहेत, त्यांची यादीच प्रसिद्ध झालेली आहे. ललवाणी यांनी चार वर्षानंतर आता उगाच जावईशोध लावू नये, असा टोलाही बाविस्कर यांनी लगावला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.