ETV Bharat / state

महापुरुषांवर होणारी टीका रोखण्यासाठी कायदा व्हावा - गिरीश महाजन - मेगाभरती

आज कोणीही महापुरुषांबद्दल टीका-टिपण्णी करत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने याबाबतीत कायदा करण्याची गरज आहे. ज्या महापुरुषांबद्दल टीका होत आहे, ते राजकारणापलीकडे आहेत. मात्र, काही राजकीय मंडळी आपल्या स्वार्थासाठी हे उद्योग करत आहेत. हे कुठेतरी थांबायला हवे, अशी अपेक्षा गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.

गिरीष महाजन, भाजप नेते
गिरीष महाजन, भाजप नेते
author img

By

Published : Jan 20, 2020, 6:09 PM IST

जळगाव - आज कोणीही राजकारणी व्यक्ती महापुरुषांवर टीका-टिप्पणी करत आहेत. आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी असे प्रकार केले जात आहेत. हे अतिशय चुकीचे असून, केंद्र तसेच राज्य सरकारने याबाबतीत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. असे प्रकार रोखण्यासाठी कायदा कडक व्हायला हवा, असे मत भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आज (सोमवार) जळगावात व्यक्त केले.

गिरीष महाजन, भाजप नेते

जळगाव जिल्हा नियोजन समितीची बैठक प्रदीर्घ काळानंतर आज (सोमवारी) दुपारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर गिरीश महाजन पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, आज कोणीही महापुरुषांबद्दल टीका-टिपण्णी करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, आतातर आपण साईबाबांच्या बाबतीत देखील हा प्रकार अनुभवतोय. केंद्र आणि राज्य सरकारने याबाबतीत कायदा करण्याची गरज आहे. सातत्याने असे प्रकार घडत असल्याने ही मंडळी लोकशाहीचा गैरफायदा घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्या महापुरुषांबद्दल टीका होत आहे, ते राजकारणापलीकडे आहेत. मात्र, काही राजकीय मंडळी आपल्या स्वार्थासाठी हे उद्योग करत आहेत. हे कुठेतरी थांबायला हवे, अशी अपेक्षा गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - 'साले सेटींग करतात'... गुलाबराव पाटलांची घसरली जीभ!

महाजनांनी खोडला खडसेंचा दावा -
मेगा भरतीमुळे भाजपचे सरकार गेले, असे मला वाटत नाही. मेगा भरतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या ज्या नेत्यांना आम्ही भाजपमध्ये प्रवेश दिला, त्यातील अनेकजण चांगल्या मताधिक्याने निवडून आले आहेत. असे सांगत महाजन यांनी भाजप नेते एकनाथ खडसेंचा मेगा भरतीमुळे भाजप सरकार गेल्याचा दावा खोडून काढला. मेगा भरतीत ज्या नेत्यांना भाजपमध्ये स्थान दिले, ते सर्व पराभूत झाले आणि भाजपने सरकार घालवले, असे नसल्याचे सांगत महाजन यांनी खडसेंच्या वक्तव्यावर नकारात्मक प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा - जो आडवा येईल, त्याला पाणी पाजणार - गुलाबराव पाटील

Intro:जळगाव
आज उठसुट कोणीही राजकारणी व्यक्ती महापुरुषांवर टीका-टिप्पणी करत आहेत. आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी असे प्रकार केले जात आहेत. हे अतिशय चुकीचे असून, केंद्र तसेच राज्य सरकारने याबाबतीत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. हे प्रकार रोखण्यासाठी कडक कायदा व्हायला हवा, असे मत भाजपचे माजीमंत्री गिरीश महाजन यांनी आज जळगावात व्यक्त केले. Body:जळगाव जिल्हा नियोजन समितीची बैठक प्रदीर्घ काळानंतर आज (सोमवारी) दुपारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. गिरीश महाजन पुढे म्हणाले, आज कोणीही महापुरुषांबद्दल टीका-टिपण्णी करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, आता तर आपण साईबाबांच्या बाबतीत हा प्रकार अनुभवतोय. केंद्र आणि राज्य सरकारने याबाबतीत कायदा करण्याची गरज आहे. सातत्याने असे प्रकार घडत असल्याने ही मंडळी लोकशाहीचा गैरफायदा घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्या महापुरुषांबद्दल टीका होत आहे, ते राजकारणापलीकडे आहेत. मात्र, काही राजकीय मंडळी आपल्या स्वार्थासाठी हे उद्योग करत आहे. हे कुठेतरी थांबायला हवे, अशी अपेक्षा गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.Conclusion:महाजनांनी खोडला खडसेंचा दावा-

मेगा भरतीमुळे भाजपचे सरकार गेले, असे मला वाटत नाही. मेगा भरतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या ज्या नेत्यांना आम्ही भाजपत प्रवेश दिला त्यातील अनेक जण चांगल्या मताधिक्याने निवडून आले आहेत. असे सांगत गिरीश महाजन यांनी भाजप नेते एकनाथ खडसेंचा मेगा भरतीमुळे भाजप सरकार गेल्याचा दावा खोडून काढला. मेगा भरतीत ज्या नेत्यांना भाजपत स्थान दिले, ते सर्व पराभूत झाले आणि भाजपने सरकार घालवले, असे नसल्याचे सांगत महाजन यांनी खडसेंच्या वक्तव्यावर नकारात्मक प्रतिक्रिया दिली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.