ETV Bharat / state

जळगावकरांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे; झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर गिरीश महाजन हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याचा दावा करत महाजन समर्थकांनी शहरात ठिकठिकाणी 'महाराष्ट्राचे लोकनेते व भावी मुख्यमंत्री' अशा आशयाचे बॅनर लावले

भावी मुख्यमंत्री, गिरीश महाजन !
author img

By

Published : May 30, 2019, 12:02 PM IST

Updated : May 30, 2019, 3:05 PM IST

जळगाव - लोकसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. मात्र, जळगावात नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याची नाही तर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या भावी मुख्यमंत्रीपदाच्या विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर गिरीश महाजन हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याचा दावा करत महाजन समर्थकांनी शहरात ठिकठिकाणी 'महाराष्ट्राचे लोकनेते व भावी मुख्यमंत्री' अशा आशयाचे बॅनर लावले आहेत.

भावी मुख्यमंत्री, गिरीश महाजन ! जळगावात झळकले बॅनर; चर्चेला उधाण

2014 मध्ये एकनाथ खडसे मुख्यमंत्री होतील अशी आशा जळगावकरांना होती. मात्र, त्याचे ते स्वप्नच राहिले. आता 2019 मध्ये गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री पद मिळावे याचे डोहाळे पुन्हा एकदा जळगावकरांना लागले आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातही खांदेपालटाचे जोरदार वारे वाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील विश्वासू सहकारी असलेले केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी प्रकृती अस्वस्थतेचे कारण पुढे करत आपल्याला मंत्रिपदाची जबाबदारी नको असल्याचे पत्र मोदींना दिले आहे. त्यामुळे मोदींच्या जवळचे मानले जाणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत वर्णी लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत फडणवीस यांच्या जागी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडू शकते, असा विश्वास महाजन यांच्या समर्थकांना आहे. हीच शक्यता गृहित धरून गिरीश महाजन यांच्या समर्थकांनी शहरात, महाजन यांना महाराष्ट्राचे लोकनेते व भावी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा प्रदान करणारे बॅनर लावले आहेत. या विषयाची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Intro:जळगाव
लोकसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. मात्र, जळगावात नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याची नाही तर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या भावी मुख्यमंत्रीपदाच्या विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर गिरीश महाजन हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याचा दावा करत महाजन समर्थकांनी शहरात ठिकठिकाणी 'महाराष्ट्राचे लोकनेते व भावी मुख्यमंत्री' अशा आशयाचे बॅनर लावले आहेत.Body:लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातही खांदेपालटाचे जोरदार वारे वाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील विश्वासू सहकारी असलेले केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी प्रकृती अस्वस्थतेचे कारण पुढे करत आपल्याला मंत्रिपदाची जबाबदारी नको असल्याचे पत्र मोदींना दिले आहे. त्यामुळे मोदींच्या जवळचे मानले जाणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत वर्णी लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत फडणवीस यांच्या जागी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडू शकते, असा विश्वास महाजन यांच्या समर्थकांना आहे. हीच शक्यता गृहीत धरून गिरीश महाजन यांच्या समर्थकांनी शहरात, महाजन यांना महाराष्ट्राचे लोकनेते व भावी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा प्रदान करणारे बॅनर लावले आहेत. या विषयाची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.Conclusion:खडसेंपाठोपाठ महाजन 'सीएम' पदाच्या शर्यतीत-

2014 मध्ये झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर भाजप पक्ष बहुमताने सत्तेत आला होता. तेव्हा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आले होते. परंतु, संघ आणि नागपूर कनेक्शनमुळे खडसेंच्या तुलनेत पारडे जड ठरलेले देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली होती. आता खडसेंच्या पाठोपाठ गिरीश महाजन यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आले आहे. संघाशी असलेली नाळ, भाजपच्याच नव्हे तर विरोधकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, सरकारचे संकटमोचक म्हणून असलेली प्रतिमा, आजवरची नेतृत्वक्षम वाटचाल अशा गिरीश महाजन यांच्या जमेच्या बाजू असल्याने त्यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागू शकते, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. दरम्यान, 2014 मध्ये खडसेंना डावलून फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद दिल्याने उत्तर महाराष्ट्रावर अन्याय झाल्याची भाजप कार्यकर्त्यांची भावना होती. आता गिरीश महाजन यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभा निवडणुकीतही आपल्या नेतृत्वाचे कौशल्य सिद्ध केल्याने उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्रीपद देऊन भाजप कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्षश्रेष्ठींकडून होऊ शकतो, असाही मतप्रवाह जळगावातील बॅनरबाजीमुळे पुढे आला आहे.
Last Updated : May 30, 2019, 3:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.