ETV Bharat / state

'वादविवाद नाहीत: मागच्या आठवड्यात आम्ही एकाच ताटात जेवलो' - eknath khadse on bjp

जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला जळगाव जिल्हा भाजप कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले होते. बैठक संपल्यानंतर गिरीश महाजन यांनी आमच्यात कोणतेही वाद नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

Girish mahajan comment on Eknath khadse
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र
author img

By

Published : Jan 2, 2020, 11:17 PM IST

जळगाव - भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि माझ्यात कोणत्याही प्रकारचे वादविवाद नाहीत. मागच्याच आठवड्यात खडसे आणि मी मुंबईत एकाच ताटात जेवलो. मात्र, माध्यमांनीच या विषयाचा विपर्यास केला, असल्याचे स्पष्टीकरण माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला जळगाव जिल्हा भाजप कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर गिरीश महाजन प्रसारमाध्यमांशी बोलत होते. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्यानंतर काही तासातच खडसे आणि महाजन एकाच मंचावर आले होते. त्यामुळे दोघेही काय बोलतात, काय भूमिका मांडतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, बैठक आटोपल्यानंतर दोन्ही नेते आपल्यात कोणतेही मतभेद नसल्याचे सांगत हसतमुखाने कार्यालयाबाहेर आले. एकनाथ खडसेंची माझ्याबद्दल काही प्रमाणात नाराजी होती. मात्र, माझ्या बोलण्याचा माध्यमांनी चुकीचा अर्थ लावल्याचे महाजन म्हणाले.

एकनाथ खडसे यांच्यासोबत वाजविवाद नाहीत - गिरीश महाजन

खडसे आणि माझ्यात कोणत्याही प्रकारचा दुरावा नाही. तुम्ही आताच पाहिले खडसे किती मनमोकळेपणाने आम्ही बोलले. आम्ही दोघे हसत हसत बाहेर पडलो, असेही महाजन यांनी सांगितले. दरम्यान, धुळे व नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उद्या (शुक्रवार) खान्देश दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते, खासदार, आमदारांची चर्चा होणार असल्याचेही महाजन यांनी यावेळी सांगितले.

Intro:जळगाव
एकनाथ खडसे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यात आणि माझ्यात कोणत्याही प्रकारचे वादविवाद नाहीत. मागच्याच आठवड्यात खडसे आणि मी मुंबईत एकाच ताटात जेवलो. मात्र, माध्यमांनीच या विषयाचा विपर्यास केला, असे स्पष्टीकरण माजीमंत्री गिरीश महाजन यांनी खडसे-महाजन वादाच्या विषयावर दिले आहे. Body:जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला जळगाव जिल्हा भाजप कोअर कमिटीची बैठक पक्ष कार्यालयात पार पडली. या बैठकीनंतर गिरीश महाजन पत्रकारांशी बोलत होते. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्यानंतर काही तासातच खडसे आणि महाजन एकाच मंचावर आले होते. त्यामुळे दोघेही काय बोलतात, काय भूमिका मांडतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, बैठक आटोपल्यानंतर दोन्ही नेते आपल्यात कोणतेही मतभेद नसल्याचे सांगत हसतमुखाने कार्यालयाबाहेर आले. एकनाथ खडसेंनी माझी काही प्रमाणात नाराजी होती. मात्र, माझ्या बोलण्याचा माध्यमांनी चुकीचा अर्थ लावला, असे सांगत अधिक बोलणे टाळले.Conclusion:गिरीश महाजन हे मात्र, माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांना सामोरे गेले. ते पुढे म्हणाले की, खडसे आणि माझ्यात कोणत्याही प्रकारचा दुरावा नाही. तुम्ही आताच पाहिले खडसे किती मनमोकळेपणाने बोलले. आम्ही दोघे हसत हसत बाहेर पडलो, असे महाजन यांनी सांगितले. दरम्यान, धुळे व नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उद्या खान्देश दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते, खासदार, आमदारांची चर्चा होणार असल्याचेही महाजन यांनी यावेळी सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.