ETV Bharat / state

पाणी फांउडेशनच्या कामावर जलसंपदामंत्री महाजन; ग्रामस्थांचा वाढला उत्साह

अभिनेता आमीर खानच्या पाणी फाउंडेशनमार्फत घेण्यात येत असलेल्या वॉटर कप स्पर्धेत चिंचोली पिंपरी गावाने सहभाग घेतला असून, त्याअंतर्गत गावात श्रमदानाची कामे सुरू आहेत.

गिरीश महाजन यांनी केले श्रमदान
author img

By

Published : May 13, 2019, 8:01 PM IST

जळगाव - राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने सध्या गावागावातील ग्रामस्थ जलसंधारणाच्या कामासाठी एकत्र येत आहेत. गावकऱ्यांच्या या विधायक प्रयत्नांना लोकप्रतिनिधींनीही मदत करताना दिसत आहेत. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर तालुक्यातील चिंचोली पिंपरी गाव शिवारात श्रमदान केले.

गिरीश महाजन यांनी केले श्रमदान

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजेत. त्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे आवाहन करत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पाणी फाउंडेशनच्या संकल्पनेचे देखील कौतुक केले. यावेळी खासदार रक्षा खडसे या देखील उपस्थित होत्या. त्यांनीही श्रमदान करत ग्रामस्थांना वॉटर कप स्पर्धेतील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अभिनेता आमीर खानच्या पाणी फाउंडेशनमार्फत घेण्यात येत असलेल्या वॉटर कप स्पर्धेत चिंचोली पिंपरी गावाने सहभाग घेतला असून, त्याअंतर्गत गावात श्रमदानाची कामे सुरू आहेत. गावाच्या आजूबाजूला असलेल्या डोंगरदऱ्यावर समतल चर खोदणे, शेतशिवारात बांधबंदिस्ती, नाले व तलावांचे खोलीकरण करणे अशी कामे केली जात असून, ग्रामस्थांनी या सर्वच ठिकाणी सक्रिय सहभाग घेतला आहे.

Intro:जळगाव
राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने सध्या गावागावातील ग्रामस्थ जलसंधारणाच्या कामासाठी एकत्र येत आहेत. गावकऱ्यांच्या या विधायक प्रयत्नांना लोकप्रतिनिधींनीही मदत होताना दिसते आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर तालुक्यातील चिंचोली पिंप्री गाव शिवारात श्रमदान केले.Body:दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजेत. त्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे आवाहन करत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पाणी फाउंडेशनच्या संकल्पनेचे देखील कौतुक केले. यावेळी खासदार रक्षा खडसे या देखील उपस्थित होत्या. त्यांनीही श्रमदान करत ग्रामस्थांना वॉटर कप स्पर्धेतील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.Conclusion:अभिनेता आमीर खानच्या पाणी फाउंडेशनमार्फत घेण्यात येत असलेल्या वॉटर कप स्पर्धेत चिंचोली पिंप्री गावाने सहभाग घेतला असून, त्याअंतर्गत गावात श्रमदानाची कामे सुरु आहेत. गावाच्या आजूबाजूला असलेल्या डोंगरदऱ्यांवर समतल चर खोदणे, शेतशिवारात बांधबंदिस्ती, नाले व तलावांचे खोलीकरण करणे अशी कामे केली जात असून, ग्रामस्थांचा सर्वच ठिकाणी सक्रिय सहभाग आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.