ETV Bharat / state

जळगावात पूर्ववैमनस्यातून टोळक्याचा दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला

author img

By

Published : Sep 15, 2019, 8:14 PM IST

Updated : Sep 15, 2019, 8:33 PM IST

अंबादास वंजारी हे रिक्षाचालक असून त्यांचा १० वर्षांपूर्वी प्रशांत कोळी नावाच्या तरुणाशी वाद झाला होता. त्याचा राग डोक्यात ठेवून रविवारी दुपारी प्रशांतने त्याच्या चार ते पाच साथीदारांसह वंजारी दाम्पत्याला मारहाण केली. मारहाण करणारे तरुण रिक्षातून आले होते. त्यांनी सुरुवातीला सुनीता वंजारी यांना मारहाण केली.

जळगावात पूर्ववैमनस्यातून टोळक्याचा दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला

जळगाव - पाच ते सहा जणांच्या टोळक्याने पूर्ववैमनस्यातून एका दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना जळगावमध्ये घडली. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मेहरुण परिसरातील एकनाथ नगर परिसरात ही घटना घडली. अंबादास सुखदेव वंजारी (वय ४५) आणि सुनीता अंबादास वंजारी (वय ४०) अशी या हल्ल्यात जखमी झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत.

हे ही वाचा - बेकायदा पिस्तुल बाळगल्याप्रकरणी उत्तरप्रदेशातील दोघांना अटक, नवी मुंबई गुन्हे शाखेची कारवाई

अंबादास वंजारी हे रिक्षाचालक असून त्यांचा १० वर्षांपूर्वी प्रशांत कोळी नावाच्या तरुणाशी वाद झाला होता. त्याचा राग डोक्यात ठेवून रविवारी दुपारी प्रशांतने त्याच्या चार ते पाच साथीदारांसह वंजारी दाम्पत्याला मारहाण केली. मारहाण करणारे तरुण रिक्षातून आले होते. त्यांनी सुरुवातीला सुनीता वंजारी यांना मारहाण केली. प्रशांत कोळी याने ओट्यावर बसलेल्या सुनीता यांच्या डोक्यात बियरची बाटली फोडली. यानंतर घरात घुसून त्यांची गर्भवती सून सोनू राहुल वंजारी हिला देखील धक्का देऊन जमिनीवर फेकले. हा प्रकार पाहून अंबादास वंजारी त्याठिकाणी धावले असता टोळक्याने त्यांच्याही डोक्यात बियरची बाटली फोडून गंभीर जखमी केले. टोळक्याने वंजारी दाम्पत्याला लाठ्या-काठ्या व फायटरने मारहाण करून जखमी केले. सुनीता यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोनसाखळी ओढून घेत टोळक्याने पळ काढला.

हे ही वाचा - परभणीत जिल्ह्याच्या गुन्हे विषयक बातम्या फक्त एका 'क्लिक'वर

दरम्यान, या घटनेनंतर शेजारी राहणाऱ्या लोकांनी जखमी वंजारी दाम्पत्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी उशिरापर्यंत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

हे ही वाचा - तब्बल ३६ तासानंतर तापी नदीपात्रात सापडला युवकाचा मृतदेह

Intro:जळगाव
पूर्ववैमनस्यातून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने एका दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास मेहरुण परिसरातील एकनाथ नगरात घडली. अंबादास सुकदेव वंजारी (वय ४५) तसेच सुनीता अंबादास वंजारी (वय ४०, दोघे रा. एकनाथनगर, जळगाव) असे या घटनेतील जखमी झालेल्या दाम्पत्याची नावे असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.Body:अंबादास वंजारी हे रिक्षाचालक आहेत. त्यांचा १० वर्षांपूर्वी प्रशांत कोळी नामक तरुणाशी वाद झालेला होता. त्याचा राग डोक्यात ठेऊन रविवारी दुपारी प्रशांतने त्याच्या चार ते पाच साथीदारांना सोबत घेऊन वंजारी दाम्पत्याला मारहाण केली. मारहाण करणारे तरुण रिक्षातून आले होते. त्यांनी सुरुवातीला सुनीता वंजारी यांना मारहाण केली. प्रशांत कोळी याने ओट्यावर बसलेल्या सुनीता यांच्या डोक्यात बियरची बाटली फोडली. यानंतर घरात घुसून त्यांची गर्भवती सून सोनू राहुल वंजारी हिला देखील धक्का देऊन जमिनीवर फेकले. हा प्रकार पाहून अंबादास वंजारी त्याठिकाणी धावले असता टोळक्याने त्यांच्याही डोक्यात बियरची बाटली फोडून गंभीर जखमी केले. टोळक्याने वंजारी दाम्पत्यास लाठ्या-काठ्या व फायटरने मारहाण करुन जखमी केले. सुनीता यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोनसाखळी ओढून घेत टोळक्याने पळ काढला. Conclusion:या घटनेनंतर शेजारच्या लोकांनी जखमी वंजारी दाम्पत्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी उशिरापर्यंत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
Last Updated : Sep 15, 2019, 8:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.