ETV Bharat / state

जळगाव शहराच्या सुरक्षेसाठी चार अग्निशमन बंब दाखल

जळगाव शहराच्या सुरक्षेसाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागा चार सुसज्ज अग्निशमन बंब दाखल झाले आहेत.

author img

By

Published : Dec 23, 2020, 7:39 PM IST

Updated : Dec 23, 2020, 10:44 PM IST

लोकार्पण वेळचे छायाचित्र
लोकार्पण वेळचे छायाचित्र

जळगाव - शहराच्या सुरक्षेसाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागात चार सुसज्ज अग्निशमन बंब दाखल झाले आहे. बुधवारी (दि. 24 डिसें.) आमदार सुरेश भोळे व महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते बंबांचे लोकार्पण करण्यात आले.

जळगाव शहराच्या सुरक्षेसाठी चार अग्निशमन बंब दाखल

जळगाव शहराच्या सुरक्षेसाठी आणि अग्निशमन विभाग अधिक बळकट करण्यासाठी महापालिकेत 4 बंब नव्याने दाखल झाले आहेत. आग सुरक्षा निधी अंतर्गत एक, जिल्हा नियोजन निधी अंतर्गत एक, पालिका फंडातून 2 बंब खरेदी करण्यात आले आहेत.

सत्ताधारी, विरोधकांनी केला होता पाठपुरावा

जळगाव शहरासाठी नव्याने दाखल होणारे बंब मे महिन्यातच महापालिकेला मिळणार होते. परंतु टाळेबंदीमुळे ते काम प्रलंबित राहिले. वाहन विक्रेत्याचे शोरूम बंद, उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि थर्ड पार्टी तपासणी होऊ शकत नसल्याने वाहने अग्निशमन विभागाला मिळू शकत नव्हती. दरम्यान, टाळेबंदीतील शिथिलता झाल्यानंतर स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील व महापौर भारती सोनवणे यांनी याबाबत पाठपुरावा केला. नगरसेवक नितीन बरडे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाकडे चार वर्षे पाठपुरावा केला होता. सर्वांच्या पाठपुराव्याने चारही बंब महापालिकेला प्राप्त झाले आहेत.

हेही वाचा - जळगाव: मक्तेदारांना वर्कऑर्डर मिळाल्या परंतु अमृत, भूमीगत गटारींच्या कामामुळे रखडली रस्त्यांची डागडुजी!

हेही वाचा - जिल्ह्यात शंभरावर ठिकाणी भरणार 'रयत बाजार'; शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना फायदा

Last Updated : Dec 23, 2020, 10:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.