ETV Bharat / state

फडणवीस सरकारच्या काळात एकनाथ खडसेंचाही फोन टॅप?

महाराष्ट्रातील काही नेत्यांसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर विरोधी पक्षातील नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप केला होता.

former minister eknath khadse
माजी मंत्री एकनाथ खडसे
author img

By

Published : Feb 6, 2020, 1:23 PM IST

जळगाव - भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचाही फोन टॅप केल्याचा आरोप होत असल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात विरोधकांप्रमाणे खडसेंचाही फोन टॅप करण्यात आला, अशी बातमी एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे. दरम्यान, या प्रकरणावर एकनाथ खडसेंनी मात्र, स्पष्ट बोलण्यास नकार दिला आहे. चौकशीअंती या प्रकरणातील सत्य बाहेर येईल, अशी सावध प्रतिक्रिया खडसेंनी दिली आहे.

महाराष्ट्रातील काही नेत्यांसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर विरोधी पक्षातील नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. याप्रकरणी अनिल देशमुख यांनी एक चौकशी समिती नेमली आहे. या समितीत दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दोन अधिकाऱ्यांच्या समितीमध्ये श्रीकांत सिंग आणि अमितेश कुमार हे दोन अधिकारी आहेत. कोण कोण अधिकारी इस्त्रायलला गेले होते? त्याचा तपास होईल. चौकशी समितीला सहा आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.

हेही वाचा - गुलाबरावांनी मुलासारखं वागायला हवं होतं; खडसेंचे पाटील यांना प्रत्युत्तर

फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे हे महसूल मंत्री होते. मात्र, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांना मंत्रिपद सोडावे लागले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकांपूर्वी आणि त्यानंतरही खडसेंनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली. दरम्यान, ऑक्टोबर 2019 मध्ये इस्त्राईलच्या एनएसओ ग्रुपच्या पिगासिस सॉफ्टवेअर वापरुन 1400 लोकांची हेरगिरी केल्याची माहिती व्हॉट्सअॅपने दिली होती. यात 121 भारतीयांचाही समावेश होता. त्यानंतर जगभरात याचे पडसाद उमटले. भारतातही राजकीय नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांचे आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप झाला होता.

हेही वाचा - मेगा भरतीमुळेच भाजपने सरकार घालवले; एकनाथ खडसेंनी पुन्हा डागली तोफ!

ठाकरे सरकारने सत्तास्थापनेनंतर फडणवीस सरकारच्या काळातील अनेक मोठ्या निर्णयांना पलटवले आहे. तसेच फडणवीस सरकारवर झालेल्या अनेक आरोपांची नव्याने चौकशी करण्यास सुरुवात केली. आता हेरगिरीप्रकरणाची चौकशीही सुरु होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे.

Intro:Please use file photo for this news

जळगाव
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचाही फोन टॅप केल्याचा आरोप होत असल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात विरोधकांप्रमाणे खडसेंचाही फोन टॅप करण्यात आला, अशी बातमी एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे. दरम्यान, या प्रकरणावर एकनाथ खडसेंनी मात्र, स्पष्ट बोलण्यास नकार दिला आहे. चौकशीअंती या प्रकरणातील सत्य बाहेर येईल, अशी सावध प्रतिक्रिया खडसेंनी दिली आहे.Body:महाराष्ट्रातील काही नेत्यांसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर विरोधी पक्षातील नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. याप्रकरणी अनिल देशमुख यांनी एक चौकशी समिती नेमली आहे. या समितीत दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दोन अधिकाऱ्यांच्या समितीमध्ये श्रीकांत सिंग आणि अमितेश कुमार हे दोन अधिकारी आहेत. कोण कोण अधिकारी इस्त्रायलला गेले होते? त्याचा तपास होईल. चौकशी समितीला सहा आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.Conclusion:फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे हे महसूल मंत्री होते. मात्र त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांना मंत्रिपद सोडावे लागले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकांपूर्वी आणि त्यानंतरही खडसेंनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली. दरम्यान, ऑक्टोबर 2019 मध्ये इस्त्राईलच्या एनएसओ ग्रुपच्या पिगासिस सॉफ्टवेअर वापरुन 1400 लोकांची हेरगिरी केल्याची माहिती  व्हॉट्सअॅपने दिली होती. यात 121 भारतीयांचाही समावेश होता. त्यानंतर जगभरात याचे पडसाद उमटले. भारतातही राजकीय नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांचे आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप झाला होता. ठाकरे सरकारने सत्तास्थापनेनंतर फडणवीस सरकारच्या काळातील अनेक मोठ्या निर्णयांना पलटवले आहे. तसेच फडणवीस सरकारवर झालेल्या अनेक आरोपांची नव्यानं चौकशी करण्यास सुरुवात केली. आता हेरगिरीप्रकरणाची चौकशीही सुरु होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.