ETV Bharat / state

जळगाव: रेशनच्या धान्य वितरणात ७५ लाखांचा अपहार, ७ जणांविरूध्द गुन्हा - बोदवड तालुका रेशन धान्य वितरण अपहार न्यूज

महाराष्ट्रीय सहकारी ग्रामीण महिला औद्योगिक संस्थेतर्फे रेशनचा धान्य पुरवठ्याचे काम करण्यात येते. या संस्थेने धान्य वितरणात घोळ केल्याची फिर्याद येथील पुरवठा निरीक्षकांनी दिली.

fir registered against 7 persons for ration grain distribution frauds in jalgaon district
जळगाव: रेशनच्या धान्य वितरणात ७५ लाखाचा अपहार, ७ जणांविरूध्द गुन्हा
author img

By

Published : Feb 24, 2021, 7:18 PM IST

जळगाव - बोदवड तालुक्यात रेशनच्या धान्य वितरणात तीन वर्षांमध्ये तब्बल ७५ लाख ७५ हजार ८१६ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी महाराष्ट्रीय सहकारी ग्रामीण महिला औद्योगिक संस्थेच्या चेअरमनसह सात जणांविरूध्द बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, महाराष्ट्रीय सहकारी ग्रामीण महिला औद्योगिक संस्थेतर्फे रेशनचा धान्य पुरवठ्याचे काम करण्यात येते. या संस्थेने धान्य वितरणात घोळ केल्याची फिर्याद येथील पुरवठा निरीक्षकांनी दिली. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार संबंधीत संस्थेने ४३ लाख ४२ हजार ६१६ रुपयांचा गहू, २७ लाख ८ हजार ४७५ रुपयांचा तांदूळ आणि ५ लाख २४ हजार ७२५ रुपयांची साखर, अशा एकूण ७५ लाख ७५ हजार ८१६ रुपये किमतीच्या शासकीय धान्याचा अपहार केला.

संस्थेचे चेअरमन व संचालकांवर गुन्हा दाखल -
याप्रकरणी पुरवठा निरीक्षक रसिक रत्नाकर सातपुते यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्रीय सहकारी ग्रामीण महिला औद्योगिक उत्पादक संस्थेचे चेअरमन व संचालक सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहिदा परवीन गुलशेर खा पठाण, रेहानाबी नजीर बेग, सायमा परवीन हाफिज, कमल संतोष पाटील, नाशिया बानो हाफिस, गौसिया मतीन, रुहिना जुनेद खान पठाण (सर्व रा.बोदवड) या संशयितांच्या विरूध्द भादंवि कलम ४२०, ४०९, ४७७ अ प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक मालचे करत आहेत.

हेही वाचा - बीएचआर गैरव्यवहारप्रकरणी पाच संशयितांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल; सुमारे 62 कोटींच्या अपहाराचा ठपका

हेही वाचा - जळगाव : विवाहितेचे सव्वा लाखाचे दागिने चोरट्यांनी लांबविले; शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.