ETV Bharat / state

ईव्हीएममध्ये मतदान होत नसल्याची खोटी माहिती; तरुणावर गुन्हा दाखल - जळगाव

ईव्हीएम यंत्रामध्ये मतदान झाले नसल्याची खोटी माहिती देऊन शासकीय यंत्रणेची दिशाभूल केल्याप्रकरणी एका मतदारावर भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इव्हीएममध्ये मतदान होत नसल्याची खोटी माहिती; तरुणावर गुन्हा दाखल
author img

By

Published : Apr 23, 2019, 5:29 PM IST

जळगाव - ईव्हीएम यंत्रामध्ये मतदान झाले नसल्याची खोटी माहिती देऊन शासकीय यंत्रणेची दिशाभूल केल्याप्रकरणी एका मतदारावर भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेदरम्यान भुसावळमध्ये हा प्रकार घडला आहे.

अमोल रामदास सुरवाडे (वय २४ रा. चांदमारी चाळ, भुसावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. अमोल सुरवाडे याने भुसावळ शहरातील रेल्वे नॉर्थ कॉलनी एज्युकेशन सोसायटीतील मतदान केंद्र क्रमांक ३७ मध्ये सकाळी १० वाजताच्या सुमारास मतदान केले. मात्र, त्याने माझे मतदान झाले नाही. तसेच व्हीव्हीपॅट यंत्रातही मतदान कोणाला केले, याची माहिती अस्पष्ट दिसली. त्यामुळे माझे मतदान दुसऱ्याच उमेदवाराला झाले आहे, असे सांगत मतदानावर आक्षेप घेतला.

मतदान केंद्राच्या अध्यक्षांनी त्यांना असलेल्या अधिकाराचा वापर करून व्हीव्हीपॅट यंत्रातील माहिती पडताळून पाहिली. त्यावेळी अमोल सुरवाडे याचे मतदान व्यवस्थित झाल्याचे समोर आले. सुरवाडे याने खोटी माहिती देऊन शासकीय यंत्रणेची दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाल्याने मतदान केंद्राचे अध्यक्ष योगेश्वर चौधरी यांनी अमोल सुरवाडे याच्याविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार सुरवाडे याच्यावर कलम १७७, १७१ (एफ) व लोकप्रतिनिधी कायदा १९५१ चे कलम २६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी अमोलला अटक केली आहे.

  • आचारसंहितेचा भंग केल्याने ७ कार्यकर्त्यांवर गुन्हे -

मतदान प्रक्रियेवेळी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी अमळनेरमध्ये ७ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश सतीश सोनार (वय २६), काशिफखान इस्माईल पठाण (वय १८), मोहित विजय सोनवणे (वय १८), मुकेश रमेश पारधी (वय १८), चेतन नामदेव मिस्तरी (वय २५), नीलेश धनराज चौधरी (वय २३) आणि सागर महेंद्र बडगुजर (वय १८) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत. हे सर्व जण मतदान केंद्राच्या २०० मीटर अंतराच्या आत उमेदवाराची तसेच राजकीय पक्षाच्या चिन्हांची छायाचित्रे असलेल्या चिठ्ठ्या मतदारांना वाटप करत होते. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:जळगाव
इव्हीएम यंत्रामध्ये मतदान झाले नसल्याची खोटी माहिती देऊन शासकीय यंत्रणेची दिशाभूल केल्याप्रकरणी एका मतदारावर भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेदरम्यान भुसावळात हा प्रकार घडला आहे.Body:अमोल रामदास सुरवाडे (वय 24 रा. चांदमारी चाळ, भुसावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. अमोल सुरवाडे याने भुसावळ शहरातील रेल्वे नॉर्थ कॉलनी एज्युकेशन सोसायटीतील मतदान केंद्र क्रमांक 37 मध्ये सकाळी 10 वाजताच्या सुमारास मतदान केले. मात्र, त्याने माझे मतदान झाले नाही. तसेच व्हीव्हीपॅट यंत्रातही मतदान कोणाला केले, याची माहिती अस्पष्ट दिसली. माझे मतदान दुसऱ्याच मतदाराला झाले आहे, असे सांगत मतदानावर आक्षेप घेतला. त्यानंतर मतदान केंद्राच्या अध्यक्षांनी त्यांना बहाल केलेय अधिकाराचा वापर करून व्हीव्हीपॅट यंत्रातील माहिती पडताळून पाहिली असता अमोल सुरवाडे याचे मतदान व्यवस्थित झाल्याने समोर आले. सुरवाडे याने खोटी माहिती देऊन शासकीय यंत्रणेची दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाल्याने मतदान केंद्राचे अध्यक्ष योगेश्वर चौधरी यांनी अमोल सुरवाडे याच्याविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानुसार सुरवाडे याच्यावर भादंवि कलम 177, 171 (एफ) व लोकप्रतिनिधी कायदा 1951 चे कलम 26 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अमोल याला अटक केली आहे.Conclusion:अमळनेरात आचारसंहितेचा भंग केल्याने 7 कार्यकर्त्यांवर गुन्हे-

दरम्यान, मतदानाच्या प्रक्रियेवेळी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी अमळनेरात 7 कार्यकर्त्यांवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उमेश सतीश सोनार (वय 26), काशिफखान इस्माईल पठाण (वय 18), मोहित विजय सोनवणे (वय 18), मुकेश रमेश पारधी (वय 18), चेतन नामदेव मिस्तरी (वय 25), नीलेश धनराज चौधरी (वय 23) आणि सागर महेंद्र बडगुजर (वय 18) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांची नवे आहेत. हे सर्व जण मतदान केंद्राच्या 200 मीटर अंतराच्या आत उमेदवाराची तसेच राजकीय पक्षाच्या चिन्हांची छायाचित्रे असलेल्या चिठ्ठ्या मतदारांना वाटप करताना मिळून आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.