ETV Bharat / state

निकृष्ट जेवणावरून कैदी आणि कारागृह रक्षकांमध्ये तुंबळ हाणामारी

author img

By

Published : Aug 26, 2020, 2:19 PM IST

जेवणाचा निकृष्ट दर्जा असल्याचे सांगत रवीसींग बावरी, राम जाने, मिथूनसिंग यांच्यासह दहा कैद्यांनी एकत्र येत कारागृह कर्मचाऱ्यांशी वाद घातला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.

जळगाव कारागृह
जळगाव कारागृह

जळगाव - जिल्‍हा कारागृहात निकृष्ट जेवण मिळत असल्याचा आरोप करत मिथूनसिंग बावरी आणि कैद्यांनी कारागृह रक्षकांशी वाद घालून तुंबळ हाणामारी केल्याची घटना घडली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने कारागृह अधीक्षकांनी पोलिसांना पाचारण केले. जिल्‍हापेठ व मुख्यालयाचा फौजफाटा दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

जळगाव जिल्हा कारागृहात सुरक्षारक्षकाला पिस्तूल लावून कैद्यांनी मारहाण केल्याचे प्रकरण ताजेच आहे. कैद्यांची सुरक्षारक्षकाला मारहाण करण्याचे प्रकार नित्याचे झाल्याचे वारंवार समोर येत आहे. जिल्‍हाकारागृहात १८ कैदी कोव्हीड पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांना कारागृहातील कलाभवन सभागृहात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून उपचार सुरू आहेत. कारागृहअधीक्षक नव्यानेच बदलून आले असून कैद्यांना बाहेरून मिळणारे साहित्य, जेवणाच्या डब्यांवर आता निर्बंध आले आहे. परिणामी बहुतांश कैद्यांना कारागृहातील जेवणच करावे लागत आहे.

हेही वाचा - निर्दयी..! बार्शी तालुक्यात आईनेच केला पोटच्या तान्ह्या मुलाचा खून

जेवणाचा निकृष्ट दर्जा असल्याचे सांगत रवीसिंग बावरी, राम जाने, मिथूनसिंग यांच्यासह दहा कैद्यांनी एकत्र येत कारागृह कर्मचाऱ्यांशी वाद घातला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यानंतर कैद्यांकडून कर्मचाऱ्यांना मारहाण होत असल्याचे कारागृह अधीक्षकांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रेाहन यांना फोन करून सांगितले. यानंतर निरीक्षक अकबर पटेल आणि मुख्यालयाचे पेालीस कर्मचारी असा फौजफाटा कारागृहात दाखल झाला, त्यामुळे प्रकरण नियंत्रणात आले. दरम्यान, हाणामारी करणाऱ्या दहा कैद्यांना अधीक्षक पेट्रस जोसेफ गायकवाड यांनी तातडीने सशस्त्र पेालिसांच्या मदतीने जालना कारागृहात रवाना केले.

हेही वाचा - राजस्थानातील 'त्रिनेत्र गणेश' जो भक्तांच्या चिठ्ठ्यांमधून मनोकामना करतो पूर्ण..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.