जळगाव - जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधीत जळगाव आरटीओ विभागातर्फे अत्यावश्यक सेवांना पास दिले जात आहेत. आतापर्यंत 889 पासेस देण्यात आले आहेत. उद्यापासून (रविवारी) अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना घरबसल्या ई-पास देण्याचा उपक्रम सुरू करीत असल्याची माहिती सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी दिली आहे.
लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या मालवाहू वाहनांना ई-पास आता घरच्या घरी मिळणार आहे. त्यासाठी संबंधितांना ई-पास संबंधी कागदपत्रे ऑनलाईनच आरटीओ विभागाला सादर करावी लागतील. त्यांनी कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांचे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर लागलीच ई-पास मिळणार आहे.
अशी आहे ई-पास मिळविण्यासाठी पद्धत -
- https://transport.maharashta.gov.in साईटला भेट द्यावी.
- Apply for e pass goods vehicle select करावे.
- RTO where to apply ठिकाणी एमएच- 19 (जळगाव) सिलेक्ट करावे.
वाहन मालक नाव नोंदवावे. वाहन चालक (driver) नाव नोंदवावे. - वाहन चालकाचा वैध लायसन्स क्रमांक नोंदवावा.
- वैध मोबाईल क्रमांक नोंदवावा (चालक/मालक) आणि ई-मेल आयडी, वाहन क्रमांक नोंदवावे. वाहनाचे चेसिस क्रमांक शेवटचे 5 आकडे द्यावेत.
- वाहनाचा प्रकार नोंदवावा. कोणत्या प्रकारचे माल वाहून नेणार आहे ते नोंदवावे (उदा. Vegetable/grain groceries) माल वाहून नेण्यासाठी मार्ग नमूद करावा (उदा. जळगाव ते मुंबई आदी). ई-पास कालावधी नमूद करावा. एका महिन्यापेक्षा जास्त कालावधी नसावा (दिलेल्या तारखेमधून निवडावा).
- Word verification character भरून ऍप्लिकेशन सबमिट करावे.
- ई-पाससाठी application reference number generate होईल.
उपरोक्त अॅप्लिकेशन क्रमांकानुसार आरटीओ ऑफिसने परवानगी दिल्यानंतर आपल्या वाहनाचा ई-पास जनरेट होईल. तो पीडीएफ स्वरूपात अर्जदाराच्या मेल आयडीवर पाठवण्यात येईल. त्याची अर्जदाराने प्रिंट काढून घ्यावी. अधिक माहितीसाठी कार्यालयीन दूरध्वनी 0257 2261819 किंवा Email -mh19@mahatranscom.in
यावर संपर्क साधावा.