ETV Bharat / state

जळगावात ‘कोरोना’ नंतर डेंग्यूचा प्रादुर्भाव, संशयित अकरा रुग्ण दाखल - जळगावात डेंग्यू रुग्णात वाढ बातमी

शहरात काही रुग्णांना डेंग्यूची लक्षणे आढळून आली आहेत. मात्र, त्यांना डेंग्यू आहे असे अजून निष्पन्न झालेले नाही. मात्र, ११ डेंग्यू संशंयित रुग्ण शहरात आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर, महापालिकेच्या ढिसाळ कामामुळे शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.

जळगावात ‘कोरोना’ नंतर डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला

author img

By

Published : Oct 18, 2020, 2:00 PM IST

जळगाव - गेल्या सात महिन्यांपासून कोरोनाविरोधात आरोग्य यंत्रण लढा देत असून आता कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव काही अंशी कमी होताना दिसत आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना दूसरीकडे शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. दरम्यान डेंग्यू रोखण्यासाठी महापालिकेने अद्याप कोणतीही उपाययोजना केली नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

जळगावात ‘कोरोना’ नंतर डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला

नगरसेवक अ‍ॅड. दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे, चेतन सनकत, प्रतीभा पाटील, प्रतीभा देशमुख, शिवसेनेचे प्रशांत नाईक, एमआयएमचे गटनेते रियाज बागवान यांनी छत्रपती शाहू महाराज रुग्णालयाला भेट दिली. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलाणी यांच्याकडून शहरातील मनपाच्या कोविड केअर सेंटरमधील रुग्णसंख्येची माहिती घेतली. काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्यामुळे महापालिकेने काही कोविड केअर सेंटर बंद केल्याची माहिती देण्यात आली.

महापालिकेची रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू करा -

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे कोविड केअर सेंटरमध्ये काम करत असलेल्या मनपा वैद्यकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांना आता महापालिका रुग्णालयात आणून, महापालिकेचे रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा सूचना नगरसेवकांनी दिल्या. महापालिकेच्या काही रुग्णालयात सध्या ओपीडी सुरू असून, इतर तपासण्या बंद आहेत. आता त्या देखील सुरू करण्याच्या सूचना नगरसेवकांनी दिल्या आहेत.

महापालिकेने रुग्णांची माहिती लपवली -

शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना महापालिकेने डेंग्यूच्या रुग्णसंख्येबाबत पदाधिकाऱ्यांना कोणतीही माहिती दिली नव्हती. नगरसेवकांनी पाहणी केल्यानंतर मनपाने ही माहिती दिली आहे. डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना मनपाकडून शहरात अबेटींग, फवारणी अशा कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यातच स्थायी समितीने मंजुरी देऊनही डेंग्यूवरील उपाययोजनांसाठी औषधीखरेदी व अतिरीक्त कर्मचारी पुरविण्याच्या ठरावाची अंमलबजावणी प्रशासनाकडून केली जात नसल्याचा आरोप अ‍ॅड. पोकळे यांनी केला आहे. महापालिकेच्या ढिसाळ कामामुळे शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.

शहरात काही रुग्णांना डेंग्यूची लक्षणे आढळून आली आहेत. मात्र, त्यांना डेंग्यू आहे असे अजून निष्पन्न झालेले नाही. मात्र, ११ डेंग्यू संशंयित रुग्ण शहरात आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. असे मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलाणी यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - सिंचन घोटाळ्याची 'ईडी'कडून चौकशी... गृहमंत्री अनिल देशमुखांनी घेतला काढता पाय!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.