ETV Bharat / state

रोझोदा येथे वयोवृद्ध दाम्पत्याची निर्घृण हत्या, कारण अस्पष्ट - Rozoda Elderly couple brutally murdered

प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे आरोग्यसेवक डॉ. हारुन काझी हे रोझोदा येथे कंटेनमेंट झोनमध्ये आरोग्य तपासणीसाठी गेले होते. भारंबे दाम्पत्याच्या घराचा दरवाजा उघडा होता. म्हणून डॉ. काझी हे घरात गेले. घरात प्रवेश केल्यानंतर दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लागलीच ग्रामस्थांना ही माहिती दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, सावदा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राहुल वाघ यांनी घटनास्थळी उपस्थित होते.

रोझोदा येथे वयोवृद्ध दाम्पत्याची निर्घृण हत्या

author img

By

Published : Sep 10, 2020, 7:19 PM IST

जळगाव - अज्ञात व्यक्तींनी एका वयोवृद्ध दाम्पत्याची धारदार शस्त्राने निर्घृणपणे हत्या केली. ही धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या रोझोदा येथे बुधवारी मध्यरात्रीनंतर घडली. गुरुवारी सकाळी ही घटना उजेडात आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

रोझोदा येथे वयोवृद्ध दाम्पत्याची निर्घृण हत्या

ओंकार पांडुरंग भारंबे (वय 90) व सुमनबाई ओंकार भारंबे (वय 84) अशी हत्या झालेल्या वृद्ध दाम्पत्याची नावे आहेत. ते रोझोदा येथील मूळ रहिवासी होते. ओंकार भारंबे हे सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी होते. आपल्या राहत्या घरात असताना पती-पत्नीची अज्ञात व्यक्तींकडून धारदार शस्त्राने गळा चिरुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. मृत भारंबे दाम्पत्याला सुनील व संजय ही दोन मुले असून, ते मुंबईत नोकरीस आहेत. दरम्यान, भरवस्तीत ही घटना घडल्याने रोझोदा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

अशी आली घटना उजेडात-

प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे आरोग्यसेवक डॉ. हारुन काझी हे रोझोदा येथे कंटेनमेंट झोनमध्ये आरोग्य तपासणीसाठी गेले होते. भारंबे दाम्पत्याच्या घराचा दरवाजा उघडा होता. म्हणून डॉ. काझी हे घरात गेले. घरात प्रवेश केल्यानंतर दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लागलीच ग्रामस्थांना ही माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलीस पाटील वासुदेव हिवरे यांनी घटनेची माहिती सावदा पोलिसांना दिली. तेव्हा पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी आले. घटनेबाबत पुराव्यांचे संकलन करण्यासाठी घटनास्थळी फॉरेन्सिक लॅब व्हॅन आणण्यात आली होती. घटनास्थळावरील परिस्थिती लक्षात घेता, दोघांची हत्या ही चोरीच्या उद्देशाने करण्यात आवई असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, सावदा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राहुल वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.