ETV Bharat / state

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची वातावरण निर्मिती; पहा त्यांचा 'हा' व्हिडिओ होतोय व्हायरल - एकनाथ खडसे राष्ट्रवादी प्रवेश बातमी

बुधवारी दुपारनंतर जळगावात खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हॉट्सअ‌ॅपच्या अनेक राजकीय ग्रुपमध्ये हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

eknath khadse
हा व्हायरल झालेला व्हिडिओ आहे
author img

By

Published : Oct 7, 2020, 7:48 PM IST

जळगाव - भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. आपल्याला न्याय मिळत नसल्याच्या भावनेतून ते नाराज आहेत. सध्या त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू असून, जळगावात या विषयाबाबत वातावरण निर्मिती सुरू आहे. बुधवारी दुपारनंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात खडसेंचा फोटो असून, राष्ट्रवादीचे गीत त्यात वापरले आहे. या व्हिडिओची चर्चा होत आहे.

हा व्हायरल झालेला व्हिडिओ आहे

हेही वाचा - प्राप्तिकर विभागाचा दणका; शशिकला यांची २ हजार कोटींची मालमत्ता जप्त

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आज (बुधवारी) खडसे हे मुंबईत असल्याने ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेणार असल्याचेही सांगितले जात होते. एकीकडे या साऱ्या घडामोडी सुरू असताना दुसरीकडे जळगावातही खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत वातावरण निर्मिती सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

बुधवारी दुपारनंतर जळगावात खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हॉट्सअ‌ॅपच्या अनेक राजकीय ग्रुपमध्ये हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गतकाळात झालेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे असलेले पक्षाचे गीत या व्हिडिओत ध्वनिमुद्रित केलेले असून त्यात खडसेंची प्रसन्न भावमुद्रा असलेला एक फोटोही जोडलेला आहे. या व्हिडिओने एकच खळबळ माजली असून, त्याची चर्चा होत आहे. दरम्यान, हा व्हिडिओ कुणी बनवला, कुणी व्हायरल केला, याची मात्र कोणत्याही प्रकारची खात्रीशीर माहिती नाही.

दरम्यान, एकनाथ खडसेंनी मात्र राष्ट्रवादी प्रवेशाबाबत अधिकृतपणे स्पष्टीकरण दिलेले नाही. मुंबईत आपण उपचारासाठी आल्याचे त्यांनी सांगितले आहे. उद्या (गुरुवारी) मुंबईत होणाऱ्या भाजपच्या बैठकीला ते उपस्थित राहणार असल्याचेही सांगितले जात आहे. परंतु, याबाबत खात्रीशीर माहिती नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.