ETV Bharat / state

शिवसेनेचा एकनाथ खडसेंवर थेट वार; शिवसंपर्क अभियानात मुक्ताईनगरच्या विकासावर ठेवले बोट

author img

By

Published : Jul 27, 2021, 3:47 AM IST

Updated : Jul 27, 2021, 11:44 AM IST

एकनाथ खडसेंचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुक्ताईनगरात शिवसेनेने 'पालकमंत्री आपल्या दारी' या संकल्पनेवर नुकतीच आमसभा घेतली. याद्वारे शिवसेनेने खडसेंच्या कारकिर्दीवरच बोट ठेवले.

jalgaon shivsena
शिवसेना आणि एकनाथ खडसे

जळगाव - राज्याच्या सत्तेत महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या शिवसेनेकडून पक्षसंघटन विस्तारासाठी शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. याच अभियानाच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना लक्ष्य करत, त्यांच्यावर थेट वार केल्याचे पाहायला मिळत आहे. गेली 30 वर्षे खडसेंचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुक्ताईनगरात शिवसेनेने 'पालकमंत्री आपल्या दारी' या संकल्पनेवर नुकतीच आमसभा घेतली. या आमसभेत आजवर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात विकासाचा अनुशेष कसा राहिला? हा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेने खडसेंच्या कारकिर्दीवरच बोट ठेवले. शिवसेनेच्या या भूमिकेची जोरदार चर्चा आहे.

प्रतिक्रिया देताना जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील
  • खडसे शिवसेनेच्या रडारवर-

राज्यात भाजप-सेनेत युती असतानाही एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात कधीही शिवसेना वाढू दिली नाही, हे शल्य शिवसैनिकांना नेहमीपासून आहे. याशिवाय युती तोडल्याची घोषणा देखील खडसेंनीच केली होती. तेव्हापासून शिवसैनिक खडसेंवर काहीसे नाराज आहेत. ही नाराजी मुक्ताईनगरात सातत्याने समोर येतच असते. म्हणूनच याठिकाणी खडसे सेनेच्या रडारवर असतात. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी झालेल्या आमसभेत खडसेंच्या नावाचा थेट उल्लेख न करता शिवसेना नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. खडसेंवर निशाणा साधताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, 'हे 30 वर्षे मुक्ताईनगरमध्ये मूलभूत सुविधा देऊ शकले नाहीत. मुक्ताईनगर हे ना धड खेड आहे, ना शहर. याठिकाणी चांगले रस्ते नाहीत. पिण्यासाठी पाणी नाही, अशी अवस्था यांनी शहराची करून ठेवली आहे. एकीकडे मोठमोठ्या गप्पा मारायच्या आणि प्रत्यक्षात मात्र काहीच नाही. आपण दोन वर्षात या मतदारसंघाचा कायापालट करू', असे गुलाबराव पाटील यांनी ठणकावून सांगितले. शिवसेनेने थेट एकनाथ खडसे यांनाच आव्हान दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

  • स्वबळासाठी आमदार चंद्रकांत पाटलांना बळ-

    'पालकमंत्री आपल्या दारी' या संकल्पनेद्वारे शिवसेनेने मुक्ताईनगर मतदारसंघातील आमदार चंद्रकांत पाटील यांना बळ दिल्याचे दिसून येत आहे. मतदारसंघातील प्रश्न आणि विविध विभागातील शासकीय अधिकारी यांना एकत्र बसवून जनतेच्या तक्रारींचा निपटारा करण्यात प्रयत्न यावेळी करण्यात आला. यावेळी नागरिकांची मोठी गर्दीही होती. विशेष म्हणजे, राज्यात तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार असताना मुक्ताईनगर येथील कार्यक्रमावरील प्रमुख बॅनरवर फक्त शिवसेनेच्याच नेत्यांचे फोटो आणि शिवसेनेचे 'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्ह होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या एकाही मंत्र्यांचा फोटो नव्हता. यावरून शिवसेना मुक्ताईनगरात स्वबळाची चाचपणी करत असल्याचेही अधोरेखित झाले आहे. चंद्रकांत पाटील हे मुक्ताईनगरातील खडसेंचे पारंपरिक राजकीय विरोधक आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी खडसेंच्या कन्या ऍड. रोहिणी खडसेंचा पराभव केला आहे. आता खडसे मित्रपक्षात असले तरी चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्याशी जुळवून घेतलेले नाही. मुक्ताईनगरातील कार्यक्रमात झालेली खलबते पाहता यापुढे चंद्रकांत पाटील विरुद्ध खडसे यांच्यात टोकाचा संघर्ष असेल हे मात्र नक्की.
  • खडसेंना सलग तिसरा धक्का-

गेल्या काही महिन्यांपासूनचा घटनाक्रम पाहिला तर मुक्ताईनगरात शिवसेनेने एकनाथ खडसे यांना सलग तिसरा धक्का दिला आहे. खडसेंना सर्वात पहिला धक्का बसला तो कोथळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत. याठिकाणी खडसेंचे वर्चस्व असताना शिवसेनेने 5 जागांवर मुसंडी मारली होती. त्यामुळे खडसेंच्या पॅनलला एकहाती सत्ता स्थापन करता आली नाही. ही निवडणूक होऊन काही महिन्यांचा कालावधी उलटत नाही तोच, शिवसेनेने मुक्ताईनगर नगरपंचायतीतील काही सदस्य फोडले. हे सदस्य भाजपचे असले तरी ते खडसे समर्थक होते. त्यामुळे हा देखील खडसेंना धक्का होता. त्यानंतर आता शिवसेनेने शिवसंपर्क अभियानाच्या कार्यक्रमात मुक्ताईनगरच्या विकासाच्या मुद्द्यावरून खडसेंना लक्ष्य केले. मित्रपक्षात असलेल्या खडसेंना हा धक्काच मानला जात आहे.

  • ताकद वाढवण्यात गुंतली शिवसेना-

जळगाव जिल्ह्यात सध्या शिवसेना ताकद वाढवण्यात गुंतली आहे. शिवसंपर्क अभियानाद्वारे ‌थेट तालुका, गाव पातळीवर जावून मेळावे व कार्यक्रम घेतले जात आहेत. तसेच अनेक महिन्यांपासून रखडलेल्या नियुक्त्या देखील जाहीर केल्या जात आहे. दोन महिन्यांपूर्वीच शिवसेनेने जिल्ह्यात चार जिल्हाप्रमुखांची तर दोन सहसंपर्क प्रमुखांची नियुक्ती केली होती. प्रत्येक विधानसभानिहाय मेळावे जिल्हाप्रमुखांना विभागून देण्यात आले आहेत. दररोज मेळावे घेऊन नवीन कार्यकर्ते जोडण्याचे काम सुरू आहे. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत असल्याचा फायदा शिवसेना आपल्या पक्षसंघटनेच्या विस्तारासाठी करून घेत आहे.

  • ईडीच्या कारवाईचा फायदा करून घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न-

एकनाथ खडसे हे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यामुळे आपली ताकद वाढेल, अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेसला होती. परंतु, पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसीतील भूखंड खरेदीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी खडसेंची ईडीकडून चौकशी सुरू आहे. ईडीच्या फेऱ्यामुळे खडसे अजूनही पक्षाला वेळ देऊ शकलेले नाहीत. या साऱ्या घडामोडींचा फायदा करून घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. ईडीच्या कारवाईत खडसे गुंतलेले आहेत. म्हणून शिवसेनेने त्यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरात लक्ष केंद्रित केले आहे.

Last Updated : Jul 27, 2021, 11:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.