जळगाव - भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली आहे. त्यांच्या जागी भाजपने त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाने दिलेला आदेश मान्य करत रात्रीचा दिवस करुन रोहिणी यांनी निवडूण आणण्याचे आवाहन खडसे यांनी यावेळी केले.
पक्षाने घेतलेला निर्णय कटू असला तरी पक्षाचा आदेश मान्य असल्याचे खडसे म्हणाले. गेल्या ४० वर्षापासून मी पक्षाने एकनिष्ठेने काम करत आहे. नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी पक्षाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी रोहिणीताईंचे काम करा असे खडसे म्हणाले. त्यांनी मुक्ताईनगरमध्ये पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली.
हेही वाचा - आदित्य ठाकरेंविरोधात बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले निवडणुकीच्या रिंगणात
हेही वाचा - ..या कारणांमुळेच खडसे, तावडे, मेहता, पुरोहीत यांचा पत्ता झाला कट ?
पक्षासमोरसुद्धा काही अडचणी
पक्षासमोरसुद्धा काही अडचणी आहेत. त्यामुळे उमेदवारी जाहीर करायला विलंब लागला आहे. दुसऱ्या पक्षातील कोणी निवडून येण्यापेक्षा आपल्या पक्षातील निवडणून आलेला केव्हाही चांगले. त्यामुळे आपण सर्वांनी एकदिलाने रोहिणा ताईंचे काम करा असेही खडसे म्हणाले.