ETV Bharat / state

'भाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण आणि तुम्ही ठरवाल तेच धोरण', खडसे समर्थकांकडून मुक्ताईनगरमध्ये बॅनरबाजी - मुक्ताईनगर

गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू आहे. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे अनेक मुहूर्त हुकल्यानंतर आता ते दोन दिवसात आपली कन्या ऍड. रोहिणी खडसे-खेवलकर यांच्यासह राष्ट्रवादीत जाणार असल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर खडसेंचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुक्ताईनगरात त्यांच्या समर्थकांकडून जोरदार बॅनरबाजी सुरू आहे.

Jalgaon_khadse
खडसे समर्थकांकडून बॅनरबाजी
author img

By

Published : Oct 20, 2020, 4:55 PM IST

जळगाव - गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू आहे. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे अनेक मुहूर्त हुकल्यानंतर आता ते दोन दिवसात आपली कन्या अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांच्यासह राष्ट्रवादीत जाणार असल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर खडसेंचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुक्ताईनगरात त्यांच्या समर्थकांकडून जोरदार बॅनरबाजी सुरू आहे. यातून खडसेंच्या पक्षांतराचे संकेत मिळत आहेत.

राष्ट्रवादी प्रवेशासाठी एकनाथ खडसे हे उद्या काही मोजक्या कार्यकर्त्यांसह मुंबईला जाणार असल्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांचा प्रवेश सोहळा हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात होणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. परंतु, या माहितीला अद्याप खडसेंनी कोणत्याही प्रकारचा दुजोरा दिलेला नाही, असे असताना खडसे समर्थकांचा उत्साह मात्र शिगेला पोहोचला आहे. मुक्ताईनगर तालुक्यात ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आलेले आहेत. त्यात खडसेंच्या पक्षांतराबाबत सूचक मजकूर लिहिलेला आहे. 'भाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण आणि तुम्ही ठरवाल तेच धोरण', अशा आशयाचा मजकूर बॅनरवर आहे. या बॅनरबाजीची जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू आहे. परंतु, खडसेंनी आपण अद्याप भाजपातच आहोत, असे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. असे असताना मुक्ताईनगर तालुक्यात खडसे समर्थकांनी लावलेल्या बॅनरवर भाजपाचे चिन्ह असलेले कमळ किंवा भाजप नेत्यांची छायाचित्रे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे खडसे पक्षांतर करणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.