जळगाव - मला जेलमध्ये टाकून यांना निवडणुका सुखरूप करायच्या आहेत असा आरोप एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) यांनी सरकारवर केला आहे. कूच ना कूच होणे वाला है मात्र, कूच नही होनेवाला है.. मै तुम्हारे उरा पे बैठणे वाला हू..या शब्दात एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकारवर जोरदार प्रहार ( Eknath Khadse strongly attacked the Shinde government ) केला आहे.
मी सर्वांच्या उरावर बसेन - रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची जनसंवाद ( NCP Jan Samswad Yatra ) यात्रेनिमित्ताने सभा पार पडली. यावेळी एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकारवर कडाडून टीका केली. विरोधकांकडून सातत्याने छळ करून मला अडकविण्यात येत आहे. काहीना काही खोटे नाटे करून मला जेलमध्ये टाकायचे आहे. निवडणुका सुरळीत करायच्या असा यांचा प्रयत्न असून तुम्हा जनतेच्या आशीर्वादाने मी सर्वांना पुरून उरेल असे म्हणत एकनाथ खडसेंनी सरकारला आव्हान दिले. आहे. माझा कितीही छळ केला, मला कितीही त्रास दिला तरी, मी सर्वांच्या उरावर बसेन या शब्दात एकनाथ खडसेंनी शिंदे सरकारवर निशाणा ( Eknath Khadse targeted the Shinde government ) साधला आहे.
बच्चू कडू अल्टिमेटम - बच्चू कडू व रवी राणा यांच्या वादावर एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे सरकारच्या आमदारांमध्ये जे स्वस्त आहे ते बच्चू कडू व रवी राणा यांच्या वादावरून समोर आली आहे . ज्यांनी शिंदे सरकारला पाठिंबा दिला आहे, त्या अपक्ष असो की इतर सर्व आमदार यांच्यात अस्वस्थता आहे. आणि तीच अस्वस्थता आता हळू हळू बाहेर पडायला लागली आहे. आणि बच्चू कडू यांच्या माध्यमातून त्याची सुरुवात झालेली आहे. आणि पुढे अजून काय होत ते पहा या या शब्दात एकनाथ खडसे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.