ETV Bharat / state

एकनाथ खडसेंच्या 'जय महाराष्ट्र'ने राजकीय वर्तुळात खळबळ; पवारांच्या भेटीनंतर वाढला 'सस्पेन्स'

पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे नाराज असलेले भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. जळगावात नुकत्याच पार पडलेल्या भाजपच्या उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीच्या बैठकीत खडसेंनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली. खडसेंनी प्रथमच निर्णायक भूमिका मांडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.

eknath khadse
एकनाथ खडसें
author img

By

Published : Dec 9, 2019, 10:54 PM IST

जळगाव - पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे नाराज असलेले भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. जळगावात नुकत्याच पार पडलेल्या भाजपच्या उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीच्या बैठकीत खडसेंनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली. 'आपल्याला वेगळा विचार करावा लागेल', असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला होता. खडसेंनी 'जय हिंद, जय महाराष्ट्र' असे उद्गार काढल्याने त्याचे निरनिराळे अर्थ लावले जात आहेत. खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचे ठरवले, तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यापैकी कोणता पर्याय ते निवडतील? याबाबत सध्या उत्सुकता आहे. दरम्यान, खडसेंनी आज(सोमवार) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची दिल्लीत भेट घेतल्याने हा सस्पेन्स अजून वाढला आहे.

एकनाथ खडसे

आजवरच्या राजकीय वाटचालीत अभ्यासू व्यक्तिमत्त्व, आक्रमक नेतृत्त्व आणि मुरब्बी राजकारणी म्हणून एकनाथ खडसेंची ओळख राहिली आहे. मात्र, गेल्या 4 ते साडेचार वर्षांपासून खडसेंना भाजपमध्ये सतत डावलले जात आहे. मंत्रिपद गेल्यानंतर लोकसभा निवडणुकीत सुनेच्या तिकिटासाठी देखील त्यांना खूप प्रयत्न करावे लागले. विधानसभा निवडणुकीत ते स्वतःला तिकीट मिळवू शकले नाही. परंतु, त्यांच्याऐवजी पक्षाने कन्या रोहिणी खडसे यांना तिकीट दिले. विधानसभा निवडणुकीत रोहिणी यांचा पराभव झाल्यामुळे खडसेंच्या 40 ते 42 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीला जबर धक्का बसला.

कन्या रोहिणी हिच्या पराभवाला पक्षांतर्गत कुरघोड्या कारणीभूत असल्याची भूमिका घेऊन खडसेंनी भाजप विरोधात मोट बांधली आहे. तिकडे पंकजा मुंडे यांनी देखील ओबीसी नेतृत्त्वाचा मुद्दा पुढे करत भाजपवर आगपाखड केल्याने खडसेंच्या बंडाची धग तीव्र झाली आहे. पक्षातील काही नेत्यांकडून सतत अपमानित केले जात असल्याने आता आपल्याला वेगळा विचार करावा लागेल, अशा शब्दांत खडसेंनी इशारा देऊन टाकला आहे. मात्र, त्यांच्या इशाऱ्याला नेत्यांनी फारसे मनावर घेतलेले दिसत नाही. त्यामुळे खडसे आता अंतिम निर्णय घेण्याच्या मनःस्थितीत दिसत आहेत. तर, दिल्लीवारी हा त्याचाच भाग असल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा - शासन आदेशामुळे जळगावातील १०० कोटींच्या कामांना ब्रेक; भाजपच्या अडचणीत भर

'जय महाराष्ट्र'चा अर्थ काय?
जळगावात 2 दिवसांपूर्वी पार पडलेल्या भाजपच्या उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीच्या बैठकीनंतर खडसेंनी आपली खदखद मांडल्यानंतर शेवटी 'जय महाराष्ट्र' असा जाणीवपूर्वक उल्लेख केला. यापूर्वी अशा रितीने त्यांनी उल्लेख केल्याचे उदाहरण नाही. त्यामुळे खडसे पक्षांतर करून शिवसेनेत जातील की काय? अशी चर्चा रंगली आहे. 'जय महाराष्ट्र' हा उल्लेख करताना त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना एकप्रकारे सूचक टिप्पणी केल्याचे बोलले जात आहे. आक्रमकता हा शिवसेनेचा आत्मा आहे. खडसे देखील आपल्या आक्रमक शैलीमुळे ओळखले जातात. त्यामुळे 'जय महाराष्ट्र' असा उल्लेख करत आपण शिवसेनेचा पर्याय स्वीकारत असल्याचे सुतोवाच तर त्यांनी केले नाही ना? अशीही चर्चा आहे. सध्या राज्यातील सत्तांतराच्या घडामोडींमुळे भाजप आणि सेनेत विळ्या-भोपळ्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी सेना खडसेंना पायघड्या घालू शकते. त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रात सेना वाढीसाठी खडसेंच्या अनुभवाचा देखील फायदा सेनेला होऊ शकतो.

हेही वाचा - मामाकडे आलेल्या दोन भावंडांचा शॉक लागून मृत्यू; भुसावळमधील घटना

राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता कमीच -
खडसे राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता तशी कमीच आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपने तिकीट नाकारल्यानंतर खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, ती चर्चाच राहिली. आताही शरद पवारांच्या दिल्लीतील भेटीनंतर या चर्चेला उधाण आले आहे. खडसेंनी सेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी असा कोणताही पर्याय निवडला, तरी ते थेट विधानपरिषदेवर जाऊन मंत्रिपद मिळवू शकतात. उत्तर महाराष्ट्रात पक्षसंघटन बळकटीसाठी राष्ट्रवादी त्यांना आग्रह करू शकते, असेही बोलले जात आहे. परंतु, राष्ट्रवादीपेक्षा त्यांचे प्राधान्य सेनेला असेल, असे काही राजकीय जाणकारांचे मत आहे. महाविकास आघाडीकडून बहुमत सिद्ध झाले, त्यादिवशी खडसे मुंबईत होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपला लक्ष्य केले होते. या घडामोडींनंतर त्यांनी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटीत झालेल्या चर्चेचा सारांश बाहेर आला नाही. मात्र, त्या दिवसापासून खडसेंनी भाजप विरोधात जोरदार मोहीम उघडली आहे, हे नाकारता येण्यासारखे नाही. आज शरद पवारांची भेट घेऊन सर्वांना गुंगारा देऊन ते सेनेच्या वाटेवर जाऊ शकतात, असाही अंदाज आहे.

हेही वाचा - 'भाजपमध्ये ओबीसींना डावलले जातेय, त्यांच्या परिश्रमांना विसरून चालणार नाही'

Intro:जळगाव
पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे नाराज असलेले भाजपचे माजीमंत्री एकनाथ खडसे सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. जळगावात नुकत्याच पार पडलेल्या भाजपच्या उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीच्या बैठकीत खडसेंनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत आपल्या नाराजीला वाट मोकळी करून देत 'आपल्याला वेगळा विचार करावा लागेल', असा निर्वाणीचा इशारा दिला होता. यावेळी खडसेंनी 'जय हिंद...जय महाराष्ट्र...' असे उद्गार काढल्याने त्याचे निरनिराळे अर्थ लावले जात आहेत. खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचे ठरवले तर शिवसेना, काँग्रेस की राष्ट्रवादी असा कोणता पर्याय ते निवडतील? याची उत्सुकता आहे. दरम्यान, खडसेंनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची दिल्लीत भेट घेतल्याने हा सस्पेन्स अजून वाढला आहे.Body:आजवरच्या राजकीय वाटचालीत अभ्यासू व्यक्तिमत्त्व, आक्रमक नेतृत्त्व आणि मुरब्बी राजकारणी म्हणून एकनाथ खडसेंची ओळख राहिली आहे. मात्र, गेल्या चार ते साडेचार वर्षांपासून खडसेंना भाजपत सतत डावलले जात आहे. मंत्रिपद गेल्यानंतर लोकसभा निवडणुकीत सुनेच्या तिकिटासाठी देखील त्यांना खूप प्रयत्न करावे लागले. विधानसभा निवडणुकीत तर ते स्वतःला तिकीट मिळवू शकले नाहीत. त्यांच्याऐवजी पक्षाने कन्येला तिकीट दिले. दुर्दैवाने त्यांच्या कन्येचा पराभव झाला. त्यामुळे खडसेंच्या 40 ते 42 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीला जबर धक्का बसला. कन्येच्या पराभवाला पक्षांतर्गत कुरघोड्या कारणीभूत असल्याची भूमिका घेऊन खडसेंनी भाजप विरोधात मोट बांधली आहे. तिकडे पंकजा मुंडे यांनी देखील ओबीसी नेतृत्त्वाचा मुद्दा पुढे करत भाजपवर आगपाखड केल्याने खडसेंच्या बंडाची धग तीव्र झाली आहे. पक्षातील काही नेत्यांकडून सतत अपमानित केले जात असल्याने आता आपल्याला वेगळा विचार करावा लागेल, अशा शब्दांत खडसेंनी इशारा देऊन टाकला आहे. मात्र, त्यांच्या इशाऱ्याला नेत्यांनी फारसे मनावर घेतलेले दिसत नाही. त्यामुळे खडसे आता अंतिम निर्णय घेण्याच्या मनःस्थितीत दिसत आहेत. दिल्लीवारी हा त्याचाच भाग असल्याचे पाहायला मिळत आहे.

'जय महाराष्ट्र'चा अर्थ काय?

जळगावात दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या भाजपच्या उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीच्या बैठकीनंतर खडसेंनी आपली खदखद मांडल्यानंतर शेवटी 'जय महाराष्ट्र' असा जाणीवपूर्वक उल्लेख केला. यापूर्वी अशा रितीने त्यांनी उल्लेख केल्याचे उदाहरण नाही. त्यामुळे खडसे पक्षांतर करून शिवसेनेत जातील की काय? अशी चर्चा रंगली आहे. 'जय महाराष्ट्र' हा उल्लेख करताना त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना एकप्रकारे सूचक टिप्पणी केल्याचे बोलले जात आहे. आक्रमकता हा शिवसेनेचा आत्मा आहे. खडसे देखील आपल्या आक्रमक शैलीमुळे ओळखले जातात. त्यामुळे 'जय महाराष्ट्र' असा उल्लेख करत आपण शिवसेनेचा पर्याय स्वीकारत असल्याचे सूतोवाच तर त्यांनी केले नाही ना? अशीही चर्चा आहे. सध्या राज्यातील सत्तांतराच्या घडामोडींमुळे भाजप आणि सेनेत विळ्या-भोपळ्याचे सख्ख्य निर्माण झाले आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी सेना खडसेंना पायघड्या घालू शकते. त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रात सेना वाढीसाठी खडसेंच्या अनुभवाचा देखील फायदा सेनेला होऊ शकतो.Conclusion:राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता कमीच-

खडसे राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता तशी कमीच आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपने तिकीट नाकारल्यानंतर खडसे राष्ट्रवादीच्या वाट्यावर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, ती चर्चाच राहिली होती. आताही शरद पवारांच्या दिल्लीतील भेटीनंतर या चर्चेला उधाण आले आहे. खडसेंनी सेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी असा कोणताही पर्याय निवडला तरी ते थेट विधानपरिषदेवर जाऊन मंत्रिपद मिळवू शकतात. उत्तर महाराष्ट्रात पक्षसंघटन बळकटीसाठी राष्ट्रवादी त्यांना आग्रह करू शकते, असेही बोलले जात आहे. परंतु, राष्ट्रवादी पेक्षा त्यांचे प्राधान्य सेनेला असेल, असे काही राजकीय जाणकारांचे मत आहे. महाविकास आघाडीकडून बहुमत सिद्ध झाले त्या दिवशी खडसे मुंबईत होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपला लक्ष केले होते. या घडामोडींनंतर त्यांनी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटीत झालेल्या चर्चेचा सारांश बाहेर आलेला नसला तरी त्या दिवसापासून खडसेंनी भाजप विरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. हे नाकारता येण्यासारखे नाही. आज शरद पवारांची भेट घेऊन सर्वांना गुंगारा देऊन ते सेनेच्या वाटेवर जाऊ शकतात, असाही अंदाज आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.