ETV Bharat / state

राज्यसभेविषयी खडसेंचे 'नो कमेंट्स' - rajya sabha election

राज्यसभेच्या उमेदवारीविषयी एकनाथ खडसेंना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी 'नो कमेंट्स' असे उत्तर देत याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. यावरून खडसेंच्या नाराजीचा प्रत्यय येत आहे.

एकनाथ खडसे
एकनाथ खडसे
author img

By

Published : Mar 7, 2020, 1:41 PM IST

जळगाव - येत्या एप्रिल महिन्यात राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे. राज्यसभेसाठी भाजपकडून ज्येष्ठ आणि नाराज नेते एकनाथ खडसे, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले तसेच माजी खासदार उदयनराजे भोसले या 3 जणांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यसभेच्या उमेदवारीविषयी एकनाथ खडसेंना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी 'नो कमेंट्स' असे उत्तर देत याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. यावरून खडसेंच्या नाराजीचा प्रत्यय येत आहे.

राज्यसभेविषयी खडसेंचे 'नो कमेंट्स'

खडसेंना राज्यसभेवर पाठवून त्यांची नाराजी दूर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र, दुसरीकडे खडसे राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक नाहीत. ते राज्यसभेऐवजी विधानपरिषदेवर जाण्यास आग्रही होते, असे बोलले जात आहे. आता याबाबत काय निर्णय होतो, याकडे खडसे समर्थकांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या 7 खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. या 7 जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. भाजपकडून खडसेंची नाराजी दूर करण्यासाठी राज्यसभेचे तिकीट दिले जाण्याचे संकेत आहेत. एकनाथ खडसे हे गेल्या अनेक दिवसांपासून नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे नेते प्रयत्न करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर खडसेंचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे हे महसूल मंत्री होते. मात्र, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांना मंत्रिपद सोडावे लागले होते. त्यानंतर पक्षाकडून सातत्याने डावलले जात असल्याने खडसे नाराज आहेत. म्हणूनच विधानसभा निवडणुकांपूर्वी आणि त्यानंतरही खडसेंनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली होती. आता भाजपकडून खडसेंची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा - चोरीच्या गुन्ह्यात वडिलांना अटक; बदनामीच्या भीतीने तरुणाची आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.