ETV Bharat / state

कोरोनाच्या कठीण काळात तरी केंद्र सरकारने राजकारण बाजूला ठेवावे; एकनाथ खडसे यांनी साधला निशाणा

देवेंद्र फडणवीस सातत्याने महाविकास आघाडी सरकार पडेल अशा वल्गना करत आहेत. पण, आपले कार्यकर्ते टिकून राहावेत म्हणून फडणवीस हा आटापिटा करत आहेत. मला वाटलं फडणवीस उत्तम भविष्यकार असतील. त्यांनी आतापर्यंत चार ते पाचवेळा सरकार पडणार म्हणून सांगितले. आता त्यांनी पुन्हा दोन तारीख दिली आहे. मी दोन तारखेची वाट पाहतो आहे. जर दोन तारखेला सरकार पडले नाही, तर त्यांचा भविष्यकार म्हणून अभ्यास कमी आहे, असे मी समजेल, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी यांनी केली आहे.

author img

By

Published : Apr 18, 2021, 3:02 PM IST

Updated : Apr 18, 2021, 3:16 PM IST

एकनाथ खडसे
एकनाथ खडसे

जळगाव - 'कोरोनाच्या काळात राज्य सरकार आपल्या अखत्यारीत जे काही शक्य आहे, ते प्रयत्न करत आहे. पण, रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने मर्यादा येत आहेत. ज्या ठिकाणी कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. किमान अशा ठिकाणी तरी केंद्र सरकारने राजकारण बाजूला ठेऊन मदत करायला हवी', अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

बोलताना एकनाथ खडसे

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने रविवारी (दि. 18 एप्रिल) दुपारी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या ठिकाणी उपस्थिती लावल्यानंतर खडसे माध्यमांशी बोलत होते.

रेमडेसिवीरची वेळीच निर्यातबंदी का केली नाही?

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तारेवरची कसरत करणाऱ्या महाराष्ट्राला केंद्र सरकार सापत्न वागणूक देत असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेचा धागा पकडून एकनाथ खडसे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधताना सांगितले की, राज्यातच नव्हे तर देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत रेमडेसिवीर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे. केंद्र सरकारने वेळीच रेमडेसिवीरची निर्यातबंदी केली असती तर आपल्याला मोठ्या प्रमाणावर साठा उपलब्ध झाला असता. पण, आपल्याकडे टंचाई असताना केंद्राने निर्यात सुरू ठेवली होती. म्हणून ही परिस्थिती उद्भवली आहे. केंद्राने वेळीच निर्यातबंदी का केली नाही? आता निर्यातबंदी झाली आहे. त्यामुळे लवकरच साठा उपलब्ध होईल, अशी आशा आहे. केंद्र सरकारने कोरोनाच्या या कठीण काळात राजकारण बाजूला ठेवून मदत करण्याची गरज आहे. ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, त्या ठिकाणी ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन तसेच इतर औषधांचा पुरवठा करायला हवा, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

फडणवीसांचा भविष्यकार म्हणून अभ्यास कच्चा

यावेळी खडसेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीकास्त्र डागले. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस सातत्याने महाविकास आघाडी सरकार पडेल अशा वल्गना करत आहेत. पण, आपले कार्यकर्ते टिकून राहावेत म्हणून फडणवीस हा आटापिटा करत आहेत. मला वाटलं फडणवीस उत्तम भविष्यकार असतील. त्यांनी आतापर्यंत चार ते पाचवेळा सरकार पडणार म्हणून सांगितले. आता त्यांनी पुन्हा दोन तारीख दिली आहे. मी दोन तारखेची वाट पाहतो आहे. जर दोन तारखेला सरकार पडले नाही, तर त्यांचा भविष्यकार म्हणून अभ्यास कमी आहे, असे मी समजेल, असेही खडसेंनी सांगितले.

आम्ही कधी असा कुत्र्या-मांजरांचा नाही खेळला खेळ

राज्यात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना विरोधी पक्षाकडून सुरू असलेल्या राजकारणाचा समाचार घेताना एकनाथ खडसे म्हणाले की, महाराष्ट्र राज्याची एक परंपरा राहिली आहे. ज्या-ज्या वेळी राज्य संकटात आले किंवा आकस्मिक संकटाचा प्रसंग उद्भवला; मग तो किल्लारीचा भूकंप असो किंवा मुंबईत झालेले साखळी बॉम्बस्फोट असोत, अशा वेळी राजकारण बाजूला ठेवून विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षाने हातात हात घालून काम केले आहे. मी स्वतः विरोधी पक्षात होतो. विरोधी पक्षनेता म्हणूनही मी काम केले आहे. पण, आम्ही संकटाच्या काळात असा कुत्रा-मांजराचा खेळ कधी खेळला नाही. देवेंद्र फडणवीस जे करत आहेत, मला वाटते विरोधी पक्षनेत्याकडून हे अपेक्षित नव्हते, असे खडसे म्हणाले.

हेही वाचा - जळगावात दिवसभरात २१ रुग्णांचा मृत्यू, तर १ हजार १०३ कोरोनामुक्त

हेही वाचा - जळगाव जिल्ह्यात ऑक्सिजन सिलिंडरचे दर तिप्पटीने वाढले; वाढीव मागणीचा परिणाम

Last Updated : Apr 18, 2021, 3:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.