जळगाव - राज्यात होणाऱ्या 367 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहे. तसेच, या निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न केल्यास तो न्यायालयाचा अवमान समजला जाईल, अशी सक्त ताकीद सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. मात्र, ओबीसी आरक्षणाबाबात सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे, तो दुर्दैवी असून ओबीसींवर अन्याय करणार आहे. 92 नगरपालिकेच्या निवडणुका या जर आरक्षणाविना झाल्या तर ते योग्य होणार नाही. ओबीसी आरक्षण मिळालं त्यावेळी शिंदे-फडणवीसांच्या कार्यकर्त्यांनी मोठा गाजावाजा करत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. आता आरक्षण घालवण्याचा ढोल वाजवा, असा टोला खडसेंनी शिंदे फडणवीसांना लगावला आहे. ते जळगावात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत ( eknath khadase taunt shinde fadnavis ) होते.
'...तर सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार केला असता' - एकनाथ खडसे म्हणाले, ओबीसी आरक्षणाबाबात सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे, तो दुर्दैवी असून ओबीसींवर अन्याय करणार आहे. 92 नगरपालिकेच्या निवडणुका या जर आरक्षणाविना झाल्या तर ते योग्य होणार नाही. ओबीसी आरक्षण मिळालं त्यावेळी शिंदे-फडणवीसांच्या कार्यकर्त्यांनी मोठा गाजावाजा करत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. आता आरक्षण घालवण्याचा ढोल वाजवा. सरकारच्या दुर्लक्षपणामुळे ओबीसींवर हा अन्याय झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयात सरकारने योग्य भूमिका न मांडल्यामुळे हा निर्णय दिलेला आहे. सरकारने जर योग्य भूमिका सर्वोच्च न्यायालयात मांडळी असती तर, कदाचित याबाबत फेरविचार केला असता. काय असेल नसेल ती शक्ती वापरा आणि सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करा. कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसी आरक्षणाविना निवडणुका होऊ देऊ नका. अन्यथा ओबीसींवर कायमचा अन्याय होईल, असेही खडसे यांनी म्हटलं.
'मुख्यमंत्री पस्तीस जिल्ह्यांतील प्रत्येक तालुक्यात जातील असे...' - सद्यस्थितीत महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. महाराष्ट्रात मंत्रिमंडळ स्थापन व्हायलाच पाहिजे. राज्यात अनेक भागात पूरग्रस्त परिस्थिती असून, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ठिकाणी मदत करण्यासाठी सरकारने तातडीने निर्णय करण्याची आवश्यकता आहे. प्रशासन याबाबत मदत करत आहे. मात्र, एखादा पालकमंत्री प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन मदत करणे यामध्ये फार मोठे अंतर आहे. राज्यात पालकमंत्री ही नाही मंत्री ही नाही, त्यामुळे दोघांच्या भरोशावर राज्य चालले आहे. मुख्यमंत्री राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहे. पण, मुख्यमंत्री पस्तीस जिल्ह्यांमध्ये प्रत्येक तालुक्यात जातील असे नाही. त्यामुळे लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री नेमले गेले पाहिजे. डीपीडीसीच्या माध्यमातून विकासाच्या कामांना वेग यायला पाहिजे, असेही खडसे यांनी सांगितलं आहे.
'आजही ते उद्धव ठाकरेंसोबत' - विधान परिषदेमध्ये अजून तरी एकही आमदाराने उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली नाही. जर त्या ठिकाणी आमदार फुटले तर त्यांनी किती खोके घेतले काय डोंगर पाहिला, काय हवा पाहिली, कोणते हॉटेल पाहिलं सर्व जनतेसमोर आहे. मात्र, विधान परिषदेच्या आमदारांनी या सर्वांना बळी न पडता आजही ते उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सभागृहाच्या आमदार जास्त आहेत. त्यांचाच विरोधी पक्षनेता होणार आहे. शिवसेनेच्या तीरापैकी एक आमदार शिंदे गटात गेल्याने बारा आमदार सद्यस्थितीत शिवसेनेकडे आहे. दहा आमदार राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे त्यांचे आमदार जास्त त्यांचा विरोधी पक्ष नेता होईल, असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा - Pravin Darekar : 'संजय राऊतांनी पक्षाचा कोसळणारा डोलारा थांबवण्यासाठी तोंडाला...'; प्रवीण दरेकरांचा टोला