ETV Bharat / state

जळगावात १८ कापूस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक; लाखोंचा कापूस घेऊन 3 भामटे पसार - व्यापाऱ्यांकडून कापूस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक

जळगाव तालुक्यातील धानवड गावातील १८ शेतकऱ्यांची तीन व्यापाऱ्यांनी आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीनही व्यापाऱ्यांनी संगनमताने शेतकऱ्यांकडून ३५ लाख ११ हजार रुपये किंमतीचा कापूस मोजून घेत पैसे न देताच पोबारा केला आहे.

eighteen Cotton growers farmers jalgaon cheated by three traders
कापूस
author img

By

Published : Jul 24, 2020, 3:07 AM IST

जळगाव - तालुक्यातील धानवड गावातील १८ शेतकऱ्यांची तीन व्यापाऱ्यांनी आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीनही व्यापाऱ्यांनी संगनमताने शेतकऱ्यांकडून ३५ लाख ११ हजार रुपये किंमतीचा कापूस मोजून घेत पैसे न देताच पोबारा केला आहे. याप्रकरणी गुरुवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल व्यास, गोलू तिवारी आणि प्रदीप, अशी संशयित आरोपींची नावे असून तिघे जळगावातील अयोध्यानगरातील रहिवासी आहेत. धानवड गावातील शेतकऱ्यांकडून तिघांनी २० मे २०२० रोजी कापूस खरेदी केला होता. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना १५ दिवसात कापसाचे पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. सर्व शेतकऱ्यांचा विश्वास त्यांनी संपादन केला होता. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून गावातील १८ शेतकऱ्यांनी कमी-अधिक प्रमाणात कापूस विकला होता. तीनही व्यापाऱ्यांनी (एम.एच. १९ सी.वाय. ०७१७) क्रमांकाच्या ट्रकमधून शेतकाऱ्यांचा कापूस नेला.

सर्वांचे मिळून ३५ लाख ११ हजार २८९ रुपयांचे पेमेंट झाले होते. १५ दिवस उलटल्यानंतरही त्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिले नाही. पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वाल्मीक पाटील (वय ४०, रा. धानवड) या शेतकऱ्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरुन तीनही व्यापाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - दुचाकीच्या मदतीने पिकांची मशागत; लातुरातील तरुण शेतकऱ्याने लढवली शक्कल

या शेतकऱ्यांना गंडवले...

वाल्मीक एकनाथ पाटील, ५० क्विंटल १३ किलो २ लाख ३५ हजार ६००), पंढरीनाथ बाबुराव पाटील, ८४ क्विंटल ४० किलो (३ लाख ९६ हजार ६८०), कैलास आत्माराम पाटील, ११० क्विंटल (५ लाख १७ हजार), बाबुराव तुळशीराम पाटील, ६१ क्विंटल (२ लाख ८६ हजार ७००), पंडित मधुकर पाटील, ९७ क्विंटल ८५ किलो (४ लाख ६० हजार), रंगनाथ यशवंत पाटील २१ क्विंटल (९८ हजार ७००), समाधान भावराव पाटील, ५२ क्विंटल ८० किलो (२ लाख ४८ हजार १६०), शांताराम एकनाथ पाटील, ३७ क्विंटल ५० किलो (१ लाख ७६ हजार २५०), राजेंद्र शिवराम पाटील, ५३ क्विंटल ४५ किलो (२ लाख ५१ हजार २१५)

बापू सदाशिव भावसार, १२ क्विंटल ७७ किलो (६० हजार ११९), प्रभुदास बाबुराव पाटील, ८६ क्विंटल ६० किलो (४ लाख ७ हजार २०), नामदेव गोविंदा पाटील, ३९ क्विंटल ५७ किलो (१ लाख ८५ हजार ९८९) अशोक शेनफडू पाटील, १०० क्विंटल ८० किलो (४ लाख ७३ हजार ७०७), राजाराम लक्ष्मण आवारे, २० क्विंटल ४५ किलो (९६ हजार ११५), अर्जुन लक्ष्मण अवारे, ६४ क्विंटल ८० किलो (३ लाख ४५ हजार ६०), सखाराम लक्ष्मण आवारे, ९ क्विंटल (४२ हजार ३००), बंडू गोबा पाटील, २१ क्विंटल (१ लाख १हजार ९९०), नाना माधव पाटील, ६ क्विंटल (२८ हजार २००), चंद्रकांत नामदेव आवारे, २७ क्विंटल २८ किलो (१ लाख ७ ५ हजार २१६).

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.