ETV Bharat / state

जळगाव : हातले येथे दाम्पत्याचा निर्घृण खून; कारण अस्पष्ट

जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील हातले येथे एका प्रौढ दाम्पत्याचा धारदार शस्त्राने वार करत निर्घृण खून झाल्याची घटना घडली आहे. रविवारी सकाळी ही घटना उजेडात आली.

हातले येथे दाम्पत्याचा निर्घृण खून; कारण अस्पष्ट

author img

By

Published : Jun 28, 2020, 8:09 PM IST

Updated : Jun 28, 2020, 8:18 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील हातले येथे एका प्रौढ दाम्पत्याचा धारदार शस्त्राने वार करत निर्घृण खून झाल्याची घटना घडली आहे. रविवारी सकाळी ही घटना उजेडात आली आहे. कोणाशी काही वाद किंवा भांडण नसताना धरणाजवळ एका लहान झोपडीत राहणाऱ्या या भिल्ल समाजाच्या दाम्पत्याचा खून कोणत्या कारणाने झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. सुधाकर सुका मोरे (वय 55) आणि साखराबाई सुधाकर मोरे (वय 50) दोघे रा. हातले, ता. चाळीसगाव, अशी खून झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत.

मोरे दाम्पत्य हातले गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या धरणालगत एका झोपडीत राहत होते. झोपडीजवळच त्यांनी शेती करायला घेतली होती. त्यांची दोन मुले गावात राहतात. शनिवारी पती-पत्नीने शेतात पेरणीचे काम केले होते. शेती केली असल्याने दोघेही रोज दिवसभर शेतीच्या कामातच व्यस्त असत. यामुळे कोणाशी त्यांचे काही घेणेदेणे नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. या घटनेत अज्ञात मारेकऱ्यांनी कुऱ्हाडीसारख्या धारदार शस्त्राने वार करून दोघांचा खून केला आहे. त्यांचा खून नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समजू शकले नाही. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे आदींनी भेट देऊन पाहणी केली.

अशी आली घटना उजेडात -

रविवारी सकाळी धरणात मासे पकडण्यासाठी काही लोक आले होते. त्या लोकांना चहा करायचा होता. त्यांनी सोबतच्या लहान मुलींना झोपडीतील आजी-बाबांकडून साखर आणायला पाठवले. मुली साखर आणायला गेल्या असता त्यांना झोपडीत साखराबाई या रक्‍ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेल्या दिसल्या. हे भयावह चित्र पाहून मुलींनी पळत जात मासे पकडणाऱ्यांना हा प्रकार सांगितला. त्यावेळी ही घटना उघडकीस आली. झोपडीपासून अवघ्या 50 फुटांवर सुधाकर मोरे यांचाही मृतदेह आढळून आला.

Last Updated : Jun 28, 2020, 8:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.