ETV Bharat / state

'या' कारणांमुळे साडेतीन मुहूर्तांवर होते सोने-चांदीची खरेदी; महत्त्व जाणून घ्या...

हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यासाठी मुहूर्ताला महत्त्व दिले जाते. चांगल्या कार्याची सुरुवात शुभ मुहूर्त पाहूनच केली जाते. शुभ मुहूर्तावर केलेले कार्य हे सिद्धीस जाते, असा प्रघात आहे.

buying gold
buying gold
author img

By

Published : Oct 14, 2021, 1:32 PM IST

जळगाव - सोने व चांदी हे दोन्ही धातू ऐश्वर्याचे प्रतीक मानले जातात. म्हणूनच फार पूर्वीपासून सोने व चांदीच्या खरेदीला विशेष असे महत्त्व राहिले आहे. हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तांवर सोने व चांदीच्या खरेदीला खूप महत्त्व असल्याचे सांगितले जाते. मात्र, हे महत्त्व नेमकं काय आहे, त्या मागे काय इतिहास आहे? असे प्रश्न आपल्याला पडतात. याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा 'ईटीव्ही भारत'ने या स्पेशल स्टोरीमधून प्रयत्न केला आहे.

साडेतीन मुहूर्तांवर होते सोने-चांदीची खरेदी

सध्या सणासुदीचा काळ सुरू आहे. नवरात्रौत्सव अंतिम टप्प्यात आला आहे. दसऱ्याचा सणही अवघ्या काही तासांवर आहे. चैतन्य आणि प्रकाशाचा उत्सव असलेला दिवाळीचा सणही पुढच्या महिन्यात येतोय. सणासुदीच्या याच काळात नेहमी चर्चा असते ती सोने व चांदीच्या खरेदीची. या काळात सोने तसेच चांदीच्या खरेदीला एवढं महत्त्व का आहे, याचा प्रश्न पडतो. याच अनुषंगाने आम्ही सुवर्णनगरी म्हणून लौकिक असलेल्या जळगावातील काही जाणकार पुरोहितांसह सोने व चांदीचा व्यापार करणाऱ्या सराफांकडून माहिती जाणून घेतली आहे.

'असे' आहेत हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्त
हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यासाठी मुहूर्ताला महत्त्व दिले जाते. चांगल्या कार्याची सुरुवात शुभ मुहूर्त पाहूनच केली जाते. शुभ मुहूर्तावर केलेले कार्य हे सिद्धीस जाते, असा प्रघात आहे. हिंदू धर्म कालगणनेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, विजयादशमी म्हणजे दसरा आणि दिवाळी पाडवा हे साडेतीन मुहूर्त मानले जातात. या मुहूर्तांवर शुभ कार्य करण्यावर प्रत्येकाचा भर असतो. फार पूर्वीपासून ही धार्मिक परंपरा राहिली आहे.

साडेतीन मुहूर्त आणि सोने-चांदी खरेदीचे महत्त्व
जळगावातील सराफ बाजारात असलेल्या प्रसिद्ध भवानी माता मंदिराचे मुख्य पुजारी पंडित महेशकुमार त्रिपाठी यांनी साडेतीन मुहूर्त आणि सोने-चांदीच्या खरेदीचे महत्त्व यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'ला सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, दसरा आणि दिवाळी पाडवा हे साडेतीन मुहूर्त हिंदू धर्मशास्त्रात परमोच्च मुहूर्त आहेत. सोने व चांदी हे ऐश्वर्याचे प्रतीक आहेत. त्यामुळे या साडेतीन मुहूर्तांवर दोन्ही धातूंची खरेदी विशेष मानली जाते. पंडित महेशकुमार त्रिपाठी यांनी साडेतीन मुहूर्तांची दिलेली माहिती अशी

१) चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा : हा सर्वात पहिला मुहूर्त. हिंदू धर्माच्या नूतन वर्षाची सुरुवात याच दिवशी होते. हा दिवस म्हणजे वातावरणातील बदल, ऋतूचे समागम होणारा दिवस असतो. त्यामुळे गुढीपाडव्याचा मुहूर्त हा उत्तम मुहूर्त असतो. हिंदू धर्माच्या पंचांगाची म्हणजेच कालगणनेची सुरुवातही येथूनच होते. त्यामुळे हा मुहूर्त अतिशय शुभ असतो. मांगल्याचे प्रतीक म्हणून या दिवशी पूर्वीपासून सोने व चांदी खरेदी केली जाते.

२) अक्षय्य तृतीया : हिंदू धर्मातील कालगणनेनुसार येणारा दुसरा शुभ मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त. ज्याला क्षय नाही ते म्हणजे अक्षय्य. अशा दिवशी केलेली कोणत्याही वस्तूंची खरेदी ही अविरत टिकते, असा हिंदू धर्मात समज आहे. सोने व चांदी हे ऐश्वर्य मानले जाते. त्यामुळे या दिवशी सोने व चांदीच्या खरेदीवर अनेकांचा भर असतो. सोने व चांदी ही एकप्रकारे गुंतवणूक असते. अडीअडचणीच्या काळात मदत म्हणूनही ती उपयोगात येते. याच कारणामुळे अक्षय्य तृतीयेला सोने व चांदीची खरेदी होते. अक्षय्य तृतीयेला घेतलेल्या सोने व चांदीमुळे घरात आर्थिक सुबत्ता येते. याशिवाय अक्षय्य गुणधर्मामुळे सोने व चांदीच्या माध्यमातून घरातील वैभव नेहमी वाढतच राहते, असाही धार्मिक मतप्रवाह रूढ आहे.

३) विजयादशमी अर्थात दसरा : दसऱ्याचा मुहूर्त कोणत्याही प्रकारच्या नवीन खरेदीसाठी अतिशय चांगला मानला जातो. या दिवशी अनेक जण फक्त सोने व चांदीचीच नाही तर नवे घर, ऑफिस, वाहन त्याचप्रमाणे टीव्ही-फ्रीज, मोबाईल अशा चैनीच्या वस्तू खरेदी करत असतात. विजयादशमी अर्थात दसऱ्याचा मुहूर्त हा विजयाचे प्रतीक आहे. याच दिवशी सत्याने असत्यावर विजय मिळवला. त्यामुळे या मुहूर्ताला ऐतिहासिक महत्व आहे. अशा शुभ मुहूर्तावर सोने-चांदी खरेदीची परंपरा लाभली आहे.

४) दिवाळी पाडवा : फार पूर्वी कार्तिक शुद्ध प्रतिपदेला व्यापारी बांधवांचे नूतन व्यावसायिक वर्ष प्रारंभ होत असे. याच दिवशी व्यापारी काटा तसेच वहीपूजन करायचे. हा मुहूर्त देखील खरेदी-विक्रीसाठी शुभ मानला जातो. पूर्वी याच मुहूर्तावर अनेक जण वार्षिक गुंतवणूक म्हणून सोने व चांदी खरेदी करायचे. ती परंपरा आजतागायत सुरू आहे. दिवाळी पाडव्याला आप्तजणांना काहीतरी विशेष भेट देण्याचीही परंपरा आहे. सोने व चांदी हे ऐश्वर्याचे प्रतीक असल्याने अनेक जण सोने व चांदी आपल्या बजेटनुसार खरेदी करतात.

गुरुपुष्यामृत योग आणि सोने खरेदी-
पंडित महेश कुमार त्रिपाठी यांनी पुढे बोलताना सांगितले की, साडेतीन मुहूर्तांप्रमाणेच गुरुपुष्यामृत योग साधूनही सोने व चांदी खरेदीला विशेष असे महत्त्व आहे. पुष्य नक्षत्र हे बलवान नक्षत्र मानले जाते. पंचांग आणि ज्योतिषशास्त्राप्रमाणे पुष्य योगावर केलेले कार्य सिद्ध होते. त्यामुळे लग्नकार्य सोडून इतर सर्व कार्य या मुहूर्तावर होतात. गुरुपुष्यामृत योगावर केलेली सोने खरेदी ही वर्धन करणारी तसेच संपन्नता प्रदान करणारी मानली जाते. त्यामुळे सोने खरेदीला या दिवशी विशेष महत्त्व आहे. सोने-चांदी खरेदी प्रमाणेच या मुहूर्तावर नवीन घर, चैनीच्या वस्तुंचीही खरेदी होते. विशेष म्हणजे, गुरुवार आणि रविवारी आलेला गुरुपुष्यामृत योग हा विशेष महत्त्वाचा असतो, असेही पंडित त्रिपाठी यांनी सांगितले.

सुवर्णनगरी जळगावचा इतिहास
सोने व चांदीच्या व्यापारामुळे सुवर्णनगरी म्हणून जळगाव शहर प्रसिद्ध आहे. येथील सराफ व्यवसायाला सुमारे दीडशे वर्षांचा इतिहास आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना प्रसिद्ध सराफ व्यावसायिक स्वरूपकुमार लुंकड म्हणाले की, जळगावात राजमल लखीचंद, दिलीपकुमार हिराचंद त्यानंतर रतनलाल बाफना असे प्रसिद्ध सराफ व्यावसायिक होऊन गेले आहेत. यांनी जळगावला सुवर्णनगरी म्हणून लौकिक मिळवून दिला. सचोटी आणि दागिन्यांचे वेगळेपण यामुळे याठिकाणी देशभरातून ग्राहक सोने खरेदीला येत असतात. साडेतीन मुहूर्तांवर तर सोने घेण्यासाठी खूप गर्दी असते. एरवी जेवढी उलाढाल होते, त्याच्या पाचपट उलाढाल साडेतीन मुहूर्तांवर होत असते, असेही स्वरूपकुमार लुंकड म्हणाले.

सराफ बाजाराच्या इतिहासावर एक नजर
जळगावातील सराफ बाजाराच्या इतिहासाबाबत माहिती देताना पंडित त्रिपाठी म्हणाले की, १९२१ च्या आधी जळगाव शहराचा विस्तार हा रथचौक, राम मंदिराच्या काही मीटर पुढे होता. आज ज्याठिकाणी मुख्य सराफ बाजार आहे, त्याठिकाणी भवानी मातेचे शेंदूर लावलेले बाण, त्याच्या मागे झाड आणि त्याच्या मागे मारुतीची मूर्ती होती. मात्र, नंतर हे झाड कोसळून पडले. जळगावचे काही सराफ व्यापारी सोने-चांदीची खरेदी करण्यासाठी मुंबईला जात होते. मुंबईत ज्याप्रमाणे मुंबादेवी, महालक्ष्मी अशी मंदिरे आहेत, त्याचप्रमाणे जळगाव शहरातदेखील असेच महालक्ष्मी मातेचे मंदिर उभारले जावे, असा विचार सराफ व्यापारी व भाविकांच्या मनात आला. त्यानुसार १९२४ मध्ये त्यांनी एकत्र येत मंदिर बांधले. त्यासाठी जयपूरहून मूर्ती मागवण्यात आली. भवानी पेठेत हे मंदिर बांधले गेले. काळ्या दगडाचा ओटा बांधण्यात आला. त्यावर सागवानी लाकडात हे मंदिर बांधले गेले. त्याला श्री महालक्ष्मी मंदिर संस्थान म्हटले जाते. पण मंदिराची ओळख ही भवानी माता मंदिर अशीच आहे. हे मंदिर म्हणजे जळगावातील सराफ बाजाराची प्रमुख ओळख आहे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा - ठाकरी तोफ धडाडणार; शिवसेनेचा दसरा मेळावा शुक्रवारी सायंकाळी पार पडेल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.