ETV Bharat / state

संततधार पावसामुळे गूळ प्रकल्प ७७ टक्के भरले - यावर्षी पाऊस चांगला झाला

जळगाव जिल्ह्यात तुलनेने यावर्षी पाऊस चांगला झाला आहे. चोपडा तालुक्यात सरासरी ७१९ मिलिमीटर एवढ्या म्हणजे १०० टक्के पावसाची नोंद शासकीय दप्तरी आहे. मालापूर येथील गूळ प्रकल्पात एकूण जिवंत जलसाठयाच्या ७७ टक्के भरला आहे.

rains-gool-project
जळगाव जिल्ह्यात तुलनेने यावर्षी पाऊस
author img

By

Published : Aug 29, 2020, 6:08 PM IST

जळगाव - चोपडा तालुक्यात सरासरी ७१९ मिलिमीटर एवढ्या म्हणजे १०० टक्के पावसाची नोंद शासकीय दप्तरी आहे. त्या तुलनेत दिनांक २९ ऑगस्ट पर्यंत ७१९.५ मिमी एवढा पाऊस पडला आहे. त्यात मालापूर येथील गूळ प्रकल्पात एकूण जिवंत जलसाठयाच्या ७७ टक्के भरला आहे.

दमदार पाऊस तालुक्यात पडल्याने या वर्षी या प्रकल्पात पाणी भरपूर जमा झाले आहे. एवढेच नाही तर दररोज या मध्यम प्रकल्पातून ५०० क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. तालुक्यात सध्या पर्यंत १००.०६ टक्के पावसाची नोंद शासकीय दप्तरी करण्यात आली आहे. तसेच या गूळ प्रकल्प परिसरात ९७० मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे, अशी माहिती शाखा अभियंता प्रीती पोटदुखे यांनी दिली.

गूळ प्रकल्पात सध्याच्या पाणीसाठ्याची लेव्हल २६६.६९० मीटर एवढी आहे. या धरणात एकूण २३.२५ दलघमी एवढा एकूण साठा क्षमता आहे. त्यापैकी ०.४९ दलघमी एवढा मृत साठा आहे आणि जिवंत पाणी साठा २२.७६ दलघमी एवढा आहे.

जीवंत पाणी साठ्याच्या तुलनेत सध्याचा पाणी साठा १७.२९ दलघमी एवढा झालेला आहे. तर एकूण पाणी साठा १७.७८ दलघमी आहे. अजून काही दिवसात जोरदार पाऊस होऊ शकतो त्यामुळे हा प्रकल्प या वर्षी पूर्ण पाणी भरण्याची आशा आहे. ऑगस्ट अखेर पाण्याचा विसर्ग थांबविण्यात येतो व त्यानंतर पाऊस पडला तर धरणाची पाणी पातळी शंभरी कडे जाईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.