ETV Bharat / state

स्वातंत्र्यानंतर प्रथमच दुर्गम पाड्यांवर पोहोचले डॉक्टर - जळगाव कोरोना अपडेट्स

किनगावपासून ८५ किमी अंतरावर सातपुड्याच्या दुर्गम भागात सग्यादेव आणि माथान या दोन आदिवासी पाड्यांमध्ये, पायी जाऊन त्यांनी आदिवासींची नुकतीच आरोग्य तपासणी केली.

doctors reached at tribal area in jalgaon
author img

By

Published : Apr 22, 2020, 4:18 PM IST

Updated : Apr 23, 2020, 9:48 AM IST

जळगाव - कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहे. या संकटाच्या काळात किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा महाजन आदिवासी बांधवांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. किनगावपासून ८५ किमी अंतरावर सातपुड्याच्या दुर्गम भागात सग्यादेव आणि माथान या दोन आदिवासी पाड्यांमध्ये, पायी जाऊन त्यांनी आदिवासींची नुकतीच आरोग्य तपासणी केली. या वेळी स्वयंसेवी संस्था निरभ्र निर्भय फाउंडेशनचे पदाधिकारी व आरोग्य विभागाचे पथक त्यांच्यासोबत होते.

स्वातंत्र्यानंतर दुर्गम पाड्यांवर प्रथमच पोहोचले डॉक्टर

डॉ. महाजन यांच्या रुपाने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ७३ वर्षांत पहिल्यांदाच या पाड्यांवरील रहिवाशांनी डॉक्टर पाहिला. सग्यादेव आणि माथान हे आदिवासी पाडे सातपुडा पर्वतातील अत्यंत दुर्गम भागात आहेत. तेथे जाण्यासाठी पर्वतराजीतून पायपीट करत जावे लागते. सोबतीला घनदाट जंगल व वन्यप्राण्यांची भीती असते. मात्र, कोरोनाच्या संकटात या पाड्यांवर आरोग्य सेवा पोहोचणे गरजेचे होते. त्यामुळे निश्चय करून डॉ.महाजन यांनी सग्यादेव येथे जाण्याचा निर्णय घेतला. सातपुडा पर्वत रागांमधून प्रवास करत रुईखेडापर्यंत त्या दुचाकीने गेल्या. पुढील १० किमीचा पायी प्रवास अधिक खडतर होता. अरुंद पायवाटेने भर उन्हात जंगलातून जाताना त्यांच्याकडे औषधांची बॅग होती.

डोंगर, दऱ्यांमधून साहित्य घेऊन पायी जाताना अनेक अडचणी येत होत्या. कुठेकुठे वाट इतकी चिंचोळी होती की, दरीत पडण्याची भीती वाटायची, असेही डॉ.महाजन यांनी सांगितले. साधारण ३०० ते ३५० लोकसंख्या असलेल्या या पाड्यांवर आजपर्यंत कधीही डॉक्टर पोहोचले नव्हते. त्यामुळे व्यवस्थित नियोजन करून डॉ.महाजन तेथे पोहोचल्या. आदिवासी बांधवांची आरोग्य तपासणी करून, कोरोनाबाबत त्यांनी जागृती केली. तसेच आदिवासी पाड्यांवरील बालकांचे लसीकरण व गरजूंना साहित्याचे वाटप केले.

यांनी घेतले परिश्रम -
डॉ. मनीषा महाजन आणि निरभ्र निर्भय फाउंडेशनने आदिवासी बांधवांच्या मदतीसाठी घेतलेल्या पुढाकाराचे प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, तहसीलदार जितेंद्र कुंवर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हेमंत बऱ्हाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पोटोडे यांनीही कौतुक केले. आदिवासी बांधवांसाठी तहसीलदारांनी गहू उपलब्ध करून दिला. या उपक्रमासाठी उषा पाटील, भावना वारके यांच्या सह अनेकांनी परिश्रम घेतले.

Last Updated : Apr 23, 2020, 9:48 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.