ETV Bharat / state

Amalner-Indore Bus Accident : अमळनेर-इंदोर बस अपघात प्रकरणी हेल्पलाईन क्रमांक जारी

author img

By

Published : Jul 18, 2022, 8:33 PM IST

अमळनेर-इंदोर बस अपघात ( Amalner-Indore bus accident) प्रकरणी हेल्पलाईन क्रमांक ( Help Line Numbers ) जारी धुळे, जळगांव जिल्हाधिकाऱ्यांनी हेल्पलाईन नंबर जाहीर केले आहेत. ज्या कोणा नागरिकाचे नातेवाईक, मित्र, आप्त-स्वकीय या बसने प्रवास करत होते त्यांनी त्यांच्या ओळखपत्रासह नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आले आहे.

Amalner-Indore Bus Accident
अमळनेर-इंदोर बस अपघात

जळगांव - मध्यप्रदेशातील इंदूरहून जळगाव जिल्ह्याच्या अमळनेरकडे जाणारी बस खरगोन येथे नर्मदा नदीत ( Maharashtra Bus Accident ) कोसळली. या भीषण अपघातात वाहनचालक आणि वाहकांसह 13 जणांचा मृत्यू झाला ( Msrtc Bus Fall Into Narmada River 13 Dead ) आहे. या अपघातानंतर मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सरकारकडून बचाव कार्य सुरु आहे. प्रशासनाने बसचा सांगाडा नदीतून बाहेर काढला असून, यातील 8 जणांची ओळख पटली आहे. यात एका लहान बालकासह ८ पुरुष , ४ स्त्रियांचा समावेश आहे.

Helpline number of control room announced by Jalgaon District Collector
जळगांव जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेले नियंत्रण कक्षाचे हेल्पलाईन नंबर

बसमध्ये चालक वाहकासह ४० प्रवाशी होते. उर्वरित प्रवाशांचा शोध सुरु आहे. दरम्यान, या अपघात प्रकरणी धुळे, जळगांव जिल्हाधिकाऱ्यांनी हेल्पलाईन नंबर जाहीर केले आहेत. ज्या कोणा नागरिकाचे नातेवाईक, मित्र, आप्त-स्वकीय या बसने प्रवास करत होते त्यांनी त्यांच्या ओळखपत्रासह नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आले आहे.

धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेले नियंत्रण कक्षाचे हेल्पलाईन नंबर -

(१) धुळे जिल्हाधिकारी कार्यालय, नियंत्रण कक्ष :- ०२५६२- २८८०६६.
(२) शिरपूर तहसील कार्यालय , नियंत्रण कक्ष :- ०२५६३- २५५०४३
(३) नायब तहसीलदार, पेंढारकर ,शिरपूर . :- ९०६७७९०१९१
(४) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जितेंद्र सोनवणे.धुळे . :- ८६९८८६२८९०

जळगांव जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेले नियंत्रण कक्षाचे हेल्पलाईन नंबर -

(१) घटनास्थळी मदतीसाठी संपर्क :- ०९५५५८९९०९१
(२) जळगांव जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष :- ०२५७ - २२२३१८०, ०२५७ -२२१७१९३

Helpline number of control room announced by Dhule Collectorate
धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेले नियंत्रण कक्षाचे हेल्पलाईन नंबर

हेही वाचा - शौचालयाचा खड्डा खोदताना मजुरांना सापडली सोन्याची नाणी; पुढे झाले असे काही...वाचा!

दरम्यान, या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी तत्काळ मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान ( Chief Minister Shivraj Singh Chouhan ) यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यांच्याकडून या घटनेसंदर्भात माहिती घेतली. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी याबाबत सांगितले की, इंदूरहून अंमळनेरकडे येणाऱ्या बस अपघाताची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. आम्ही अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या दुःखात सहभागी आहोत. मुख्यमंत्री यासंदर्भात मध्यप्रदेश प्रशासनाशी संपर्क साधून आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून 10 लाखांची मदत - या अपघातात झालेल्या मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्याच्या परिवहन खात्याकडून देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. तर, अपघातातील जखमींवर राज्य सरकारतर्फे तातडीने उपचार मिळवण्यासाठी सुविधा उपलब्ध केल्या जाती, असेही मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं आहे.

पंतप्रधान कार्यालयाकडून मदतीची घोषणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांनी या बस अपघाताबाबत तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु असून स्थानिक प्रशासन जखमींना आवश्यक त्या सेवा पुरवत असल्याचे ट्विट त्यांनी केले. तसेच, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख, तर अपघातातील जखमींना 50 हजारांच्या मदत जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा - Monsoon Session Begin Today : देशासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा - पंतप्रधान; संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.